डॉ. मीना प्रभु म्हणजे एक प्रसन्न व्यक्तिमत्त्व. जसं आनंदी स्मित त्यांच्या मुखावर सतत विलसत असतं तसं त्यांचं लेखन कागदावर फुलत असतं. सभोवतीचं जग त्या आपल्या डोळ्यांनी निरखीत असतात आणि कागदावर उमटतो गद्यातील स्वभावोक्ती अलंकार, आपल्या प्रभावी शैलीत त्यांनी सहारा वाळवंटासारखे रुक्ष प्रदेशसुद्धा ओअॅसिस बनवून टाकले आहेत. त्यांची पुस्तकं केवळ प्रवासवर्णनं नसतात तर कधी बोटाला धरून तर कधी मैत्रीचा हात खांद्यावर ठेवून त्या आपल्याला बरोबर घेऊन जातात.
सौंदर्याचा वेध घेत घेत त्यांची लेखणी चालत असते. त्या नावाप्रमाणे साक्षात शब्द-प्रभू आहेत. त्यांच्या लेखनात कुरुपतेला वाव नाही. नचातुर्यार्थ कलाकामिनीङ हा ज्ञानेश्वरांचा शब्द त्यांचं लिखाण वाचणाऱ्या रसिकांना नक्की आठवेल असे मला वाटते. निसर्गप्रेमी बालकवी ठोमरे जर आज असते तर त्यांच्या फुलराणीनं मोगऱ्याची फुलं घेऊनच मीनाताईंचे स्वागत केले असते. आजपर्यंत जवळजवळ चार हजार पानं वाचकांपुढे ठेवून त्यांनी मराठी माणसाला जगाची सुंदर ओळख करून दिली आहे. नव्हे, मराठी साहित्यात नवे दालन खोलून ते एकहाती भरघोस केले आहे. मराठीच काय इंग्रजी वा अन्य कुठल्याही भाषेत, कोणत्याही लेखकानं इतकं प्रचंड काम प्रवासवर्णन प्रकारात केल्याचे माझ्या तरी माहितीत नाही!
Meena Prabhu is an acclaimed author of Marathi travelogues. She lives in London.
माझं लंडन म्हणजे खरं तर एकप्रकारची लंडनची सहलच आहे. कितीतरी गोष्टी इथं नव्यानं भेटतात, मग त्या तिथल्या प्रसिद्ध वास्तु असोत की परंपरागत लंडनकर, तिथल्या रूढी असोत की नाविन्याची कास धरलेलं शहर. कधी आपण उच्चभ्रू रिचमंड वा बाॅंड स्ट्रीटवर फिरून येतो तर कधी टेम्सच्या वळणांवरून हळूच पुढे जातो. तिथल्या निर्सगाची वा एेश्वर्याची उधळण सुखावून जाते. तर जुना वारसा, राजघराणं, महत्वाची ठिकाणं, काही म्हणजे काहीही सुटत नाही या सहलीमधे. इंटरनेट पुर्वीच्या काळात एवढा रिर्सच म्हणजे दिव्यच असेल. त्यात लेखिकेच्या प्रचंड कौतुहलचिकित्सेची झलक दिसून पडते.
काही काही जागी आशयपुर्ण तर कुठे इतकं सुंदर वर्णन आहे की सगळं कसं डोळ्यासमोर तरळून जातं. कलात्मकता, कुतुहल, मेहनत आणि धाडसाचा असा मिलाप फार कमीदा घडून येतो.
बाकी मराठी पुस्तकांप्रमाणे मला याहीबद्दल वाईट हेच वाटतं की आताशा हवी तशी लोकं वाचन करत नाहीत आणि त्यातल्या त्यात मराठी तर मुळीच नाही.
Vacation in India is the best time to read Marathi books. Someone recommended me Meena Prabhu's books. I picked up this book. Maza London is a travelogue. Travelogues are very common in English language however, there are few writers who write travelogues in Marathi. Meena Prabhu went to Englad in 1966. She started writing letters to her family describing the places she visited. Gradually she wrote this book in 1991. Few details may have changed with time. This book gives an insight to the readers about history of London and the places. She has shared her experiences with relevant details. It is written in very easy to understand Marathi. This book is a quick read. I was able to imagine few details about people and places as I have friends from that part of the world. I highly recommend this book to those who want to read about various places. This is the magic of these travelogues, they can take you to places while sitting at the comfort of your favourite reading places.