Jayant Vishnu Narlikar was an Indian astrophysicist and emeritus professor at the Inter-University Centre for Astronomy and Astrophysics (IUCAA). His research was on alternative cosmology. Narlikar was also an author who wrote textbooks on cosmology, popular science books, and science fiction novels and short stories.
पुस्तकाचे नाव - व्हायरस. पुस्तक प्रकार - विज्ञानविषयक कादंबरी. लेखक - जयंत विष्णू नारळीकर. प्रकाशन - मौज प्रकाशन. मूल्य - ९०₹ (तिसरी आवृत्ती २००३ नुसार) पृष्ठ संख्या - १३४.
मराठी साहित्य क्षेत्रात विज्ञानविषयक साहित्य लिहिणारे लेखक/ लेखिका अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतके पण यात ज्यांच्या योगदानाकडे आपल्याला कानाडोळा करता येणार नाही असं नाव म्हणजेच 'डॉ जयंत विष्णु नारळीकर'. मराठी समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा या हेतूने डॉ. नारळीकरांनी लेखणी हाती धरली आणि विज्ञानकथा, विज्ञान कादंबरी असे नवीन प्रकार मराठी साहित्याला लाभले.
"Virus" ही त्यांनी लिहिलेली विज्ञानाधिष्ठित चौथी कादंबरी, जी वाचकाला एका उत्कंठावर्धक प्रवासावर घेऊन जाते. 'एक अज्ञात आणि अत्यंत घातक विषाणू' हा या कथेचा केंद्रबिंदू.
कथेची सुरुवात ही एका रहस्यमय यांत्रिक बिघाडाने होते, ज्याचा प्रसार अतिशय वेगाने सर्वत्र होतो. वैज्ञानिक आणि आरोग्य क्षेत्रातील तज्ञ या विषाणूचा उगम शोधण्याचा आणि त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करतात. या प्रक्रियेत मानवी हव्यास, बेजबाबदार वैज्ञानिक प्रयोग, आणि निसर्गाविरुद्ध चाललेला संघर्ष या सर्व बाबी हळूहळू उलघडत जातात. विषाणूचा प्रसार थांबवण्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न होत असताना, कथेच्या मागे दडलेला एक मोठा गूढसंधान क्रमशः आपल्यासमोर येते.
नारळीकरांची लेखनशैली साधी, प्रवाही आणि प्रभावी आहे. त्यांनी विज्ञानातील कल्पना आणि मानवी नैतिकतेतील प्रश्न यांचा सुरेख मिलाफ या कथेत साधला आहे. आणि म्हणूनच मला असं वाटतं; "Virus" ही केवळ एक विज्ञानकथा नाही, तर ती मानवजातीच्या जबाबदारीवर आणि तंत्रज्ञानाच्या मर्यादांवर भाष्य करणारी आणि त्यावर विचार करायला भाग पाडणारी एक गंभीर कादंबरी आहे.
एकूणच, "Virus" वाचकाला विज्ञानाची गोडी लावत असतानाच विचारप्रवृत्त करणाऱ्या प्रश्नांवर चिंतन करायला लावते. अशी ही विज्ञान, कल्पनाशक्ती आणि मानवी मूल्ये यांचा सुंदर मिलाफ असणारी कादंबरी आपण सर्वांनी ही वाचावी हेच आत्मनिवेदन.
3.5/5 उपन्यास मुझे पसंद आया। अगर आप विज्ञान-गल्प(साइंस-फिक्शन) पढने के शौक़ीन हैं तो इस उपन्यास को एक बार पढ़ सकते हैं। उपन्यास के विषय में विस्तृत तौर पर मैंने अपने ब्लॉग में लिखा है, इसे आप निम्न लिंक से जाकर पढ़ सकते हैं: वाइरस