Jump to ratings and reviews
Rate this book

Romerajya #1

Rate this book

343 pages, Paperback

First published May 1, 2009

6 people are currently reading
85 people want to read

About the author

डॉ. मीना प्रभु म्हणजे एक प्रसन्न व्यक्तिमत्त्व. जसं आनंदी स्मित त्यांच्या मुखावर सतत विलसत असतं तसं त्यांचं लेखन कागदावर फुलत असतं. सभोवतीचं जग त्या आपल्या डोळ्यांनी निरखीत असतात आणि कागदावर उमटतो गद्यातील स्वभावोक्ती अलंकार, आपल्या प्रभावी शैलीत त्यांनी सहारा वाळवंटासारखे रुक्ष प्रदेशसुद्धा ओअॅसिस बनवून टाकले आहेत. त्यांची पुस्तकं केवळ प्रवासवर्णनं नसतात तर कधी बोटाला धरून तर कधी मैत्रीचा हात खांद्यावर ठेवून त्या आपल्याला बरोबर घेऊन जातात.

सौंदर्याचा वेध घेत घेत त्यांची लेखणी चालत असते. त्या नावाप्रमाणे साक्षात शब्द-प्रभू आहेत. त्यांच्या लेखनात कुरुपतेला वाव नाही. नचातुर्यार्थ कलाकामिनीङ हा ज्ञानेश्वरांचा शब्द त्यांचं लिखाण वाचणाऱ्या रसिकांना नक्की आठवेल असे मला वाटते. निसर्गप्रेमी बालकवी ठोमरे जर आज असते तर त्यांच्या फुलराणीनं मोगऱ्याची फुलं घेऊनच मीनाताईंचे स्वागत केले असते. आजपर्यंत जवळजवळ चार हजार पानं वाचकांपुढे ठेवून त्यांनी मराठी माणसाला जगाची सुंदर ओळख करून दिली आहे. नव्हे, मराठी साहित्यात नवे दालन खोलून ते एकहाती भरघोस केले आहे. मराठीच काय इंग्रजी वा अन्य कुठल्याही भाषेत, कोणत्याही लेखकानं इतकं प्रचंड काम प्रवासवर्णन प्रकारात केल्याचे माझ्या तरी माहितीत नाही!

Meena Prabhu is an acclaimed author of Marathi travelogues. She lives in London.

Ratings & Reviews

What do you think?
Rate this book

Friends & Following

Create a free account to discover what your friends think of this book!

Community Reviews

5 stars
15 (31%)
4 stars
21 (43%)
3 stars
9 (18%)
2 stars
2 (4%)
1 star
1 (2%)
Displaying 1 - 5 of 5 reviews
Profile Image for Smit Nikam.
31 reviews19 followers
August 8, 2021
This is the first part of Meena Prabhu's travelogue on Italy and just like any other travelogue by her, it is rich with knowledge of local history and society. This book has sparked my interest in Roman history & arts. I got introduced to a lot of amazing art pieces from ancient & medieval Rome. Descriptions of these arts are so exhaustive that you can almost picture them before actually searching for their photos on the web. She also tells you the history of these arts.

Italy is a small nation with a humongous number of historical sites. Hence, if you're planning a tour to Italy, this book can reduce a lot of pain for you and give you a detailed background of most of the important sites. Also, if you want to get introduced to Roman history & Roman arts, Romrajya can be a good start.
Profile Image for Apurva Nair.
32 reviews13 followers
October 23, 2020
'रोम बघायला एक आयुष्य अपुरं' असं असताना त्यातील महत्त्वाची प्रेक्षणीय स्थळे, जागा निवडून तिथे जाऊन येणे, त्यामागचा इतिहास जाणून घेणे आणि त्या अनुभवांवर पुस्तक लिहिणे हे खरंच प्रचंड अवघड काम! पण Dr. मीना प्रभु यांनी तितक्याच ताकदीने ते पूर्ण केलं आहे. (पुस्तकाच्या शेवटी दिलेली संदर्भसूची वाचतानाच याची कल्पना येते). सुंदर जागा, इतिहास, थोर कलाकार आणि त्यांच्या कलाकृती, त्यामागच्या रंजक कहाण्या आणि काय नाही या पुस्तकात!!

लेखिकेने इटलीचं प्रवासवर्णन 2 पुस्तकात विभागलेलं आहे. या भागात मिलान, Genoa, Turin, Piza, Florence, Siena, Vatican City, Rome आणि अशा इतर काही जागांचे वर्णन लिहिलेले आहे. सुरवात जरी Amsterdam ने केली असली तरी त्यावर 6-7 पानांपेक्षा जास्त काही नाही. निम्म्याहून अधिक पुस्तकात रोमेबद्दल वर्णन आहे. इटली किंवा रोम म्हणजे कलेचं माहेरघर. बऱ्याचदा कदाचित आपलं काम drawings, paintings, sculptures याच्याशी निगडित नसल्याने अशा गोष्टीतले बारकावे समजून येत नाहीत, पण लेखिका त्यांचंही वर्णन इतकं चपखलपणे करते की आपल्यासमोर त्या कलाकृती अक्षरशः उभ्या राहतात. निदान mobile वर फोटो बघून आपण त्यातले बारकावे जाणून घ्यायचा प्रयत्न नक्कीच करतो.

मीना प्रभुंच्या बाकीच्या पुस्तकांप्रमाणेच हेही travel guide (where to stay, where to eat or how to travel etc) नक्कीच नाही. पण इटलीतील थोड्या वेगळ्या जागांबद्दल माहिती करून घ्यायला, वेगवेगळ्या कलाकृतींमधले बारकावे समजून घ्यायला, त्यांच्या थोर कलाकारांबद्दल, रोमन इतिहासाबद्दल थोडक्यात जाणून घ्यायला हे पुस्तक नक्कीच एकदातरी वाचायलाच हवं.



2 reviews23 followers
January 12, 2021
इटलीचा कला, संस्कृती आणि इतिहास याचा आढावा प्रगल्भतेतेने आणि सहजतेने मीना प्रभू यांनी मांडले आहे. इटलीचा प्रवास २-४ वेळा होऊन सुद्धा या पुस्तकाच्या माध्यमातून खूप नवीन गोष्टी माहिती झाल्या. पुन्हा इटली ला जाऊन ते अनुभवायची इच्छा झाली. हेच या पुस्तकाचे यश आहे असे मला वाटते. . चित्रातले, शिल्पातले बारकावे खूप सुंदर पद्धतीने त्यांनी समजावले आहेत. प्रवासातील धडपड, समस्या , नवीन लोकांची ओळख , त्याच्याबरोबर बांधले गेलेले नाते अशा वेग वेगळ्या गोष्टीने पुस्तक कंटाळवाणे होत नाही. खूप इतिहास असताना अशा हलक्या फुलक्या अनुभवांनी पुस्तक अजून इंटरेस्टिंग होते. बाकी इटली च्या प्रवासाला जाताना डोळ्यासमोर हवे असे पुस्तक.
3 reviews1 follower
January 17, 2021
खूपच सुंदर पुस्तक आहे.
Profile Image for Makarand Gosavi.
30 reviews2 followers
December 24, 2020
रोमराज्य १ हे मींप्रभूंचं इटलीचे प्रवास वर्णन नेहेमीप्रमाणेच अतिशय प्रवाही आणि वाचकांना त्यांच्या बरोबर पर्यटन घडवणारा. प्रवास वर्णनाचे २ भाग आहेत आणि पहिला प्रामुख्याने रोम वर्णनाने भरलेला आहे. रोमराज्यात रोमनांच्या प्राचीन संस्कृतीतले भव्य बांधकाम , चित्रकला आणि शिल्पकला हे पर्यटनाचे मुख्य घटक आहेत. तथापि हे वाचण्यापेक्षा बघून अनुभवणे जास्ती आल्हाददायक असावे. मीना प्रभुनी ह्यांचे वर्णन शक्य तितक्या प्रभावी प्रमाणे करून बघण्याची उत्सुकता निर्माण करण्याचा निश्चितच प्रयत्न केलाय पण ह्या वेळी मी प्रत्येक गोष्टीचे वर्णन करून झाल्यावर गूगल करून पहिले (हे तुर्कनाम, गाथा इराणी किंवा इजिप्तायन मध्ये अजिबात झाले नव्हते). कदाचित तेथला वस्तू, शिल्प आणि चित्रांचे वर्णन तितके प्रभावी झाले नसावे किंवा माझे त्या बाबतीतले आकलन कमी असल्याने प्रतिमा तितकी व्यायवस्थित उभे राहिले नसावी

मीना प्रभूंच्या प्रवासाचे अविभाज्य अंग म्हणजे त्यांना तिथले आलेले अनुभव आणि तेथील नागरिकांबरोबर वेळ व्यतीत करणे आणि ह्या गोष्टी रोमराज्यात ही आहेतच आणि मला स्वतःला बाकीच्या वर्णनापेक्षा प्रवासातील बरे वाईट अनुभव आणि नागरिकांची जवळून पाहिलेली संस्कृती है गोष्टीच उत्सुकता वाटते आणि त्या बाबतीत रोमराज्य अजिबात निराश करत नाही.

एकूणच मीना प्रभूंची ३-४ पुस्तके आधी वाचली असल्याने त्यांच्या लिखाण शैलीशी परिचित आहेच आणि रोमराज्य ती शैली काही फारशी बदलत नाही पण निश्चितच पुस्तक वाचनीय आहे आणि रोमराज्य २ वाचण्याविषयी सकारात्मकता.
Displaying 1 - 5 of 5 reviews

Can't find what you're looking for?

Get help and learn more about the design.