श्रीमंत पेशवीण काशीबाई: श्रीमंत बाजीराव पेशव्यांच्या पत्नी काशीबाईंच्या आयुष्यातील विविध पैलू प्रकाशात आणणारी ही पाचशे पानी कादंबरी ‘श्रीमंत पेशवीण काशीबाई’!
मराठेशाहीचा इतिहास अनेक आक्रमक आणि कणखर व्यक्तीरेखांमुळे प्रसिद्ध आहे. परंतु मराठेशाहीत काही अबोल व्यक्तीरेखाही आहेत, ज्यांच्याबद्दल ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये अगदी तुरळक उल्लेख आहे आणि म्हणूनच या व्यक्तीरेखांबद्दल आजही लोकांच्या मनात कुतूहल आहे. काशीबाईंची व्यक्तीरेखा ही त्यातलीच एक. राजकारण धुरंधर श्वशूर पेशवे बाळाजी विश्वनाथ यांची ज्येष्ठ सून, दिगंत पराक्रमी थोरले बाजीरावसाहेब यांच्या पत्नी, ज्यांच्या कारकिर्दीत मराठ्यांचा ध्वज संबंध हिंदुस्थानात फडकला त्या नानासाहेबांच्या मातुश्री काशीबाई! अठराव्या शतकात हिंदुस्थानातल्या राजकारणाची आरी ज्या हातांनी फिरवली ते हात काशीबाईंच्या कुटुंबातलेच होते. तरीही काशीबाई राजकारणापासून सदैव अलिप्त राह