सार्वजनिक पार्किंगमध्ये एखादी रिकामी जागा पाहिली म्हणून काही तिच्यावर आपला हक्क होतो का? वैजयंतीमालानं हेरलेल्या पार्किंग प्लेसमध्ये कुणीतरी तिच्या आधी आपली कार घुसवली त्याचा तिला राग येणं सहाजिक आहे. अशा वेळी वादावादी होणं नित्याची बाब आहे. कार असणाऱ्या सर्वांवर असा प्रसंग कधीतरी येतो. अशावेळी दोन कडक शब्द सुनावून, तिथून पाठ वळताच तो प्रसंग विसरूनही जातो. तो विसरून जाण्यातच व्यवहारीक शहाणपण असतं. मानसिक रोग तज्ज्ञ असूनही हे व्यवहारीक शहाणपण वैजयंतीमालाला सुचलं नाही. रागाच्या भरात तिनं आपल्या जागेवर बळजबरी घुसून गाडी पार्क करणाऱ्याला धडा शिकवण्यासाठी त्याच्या कारची चाकं चाकूनं पंक्चर करून टाकली. रागाच्या भरात हातून घडलेली गोष्ट उघडकीस येण्याची शक्यता &#