What do you think?

जो जे वांछील
'थोडा है थोडे की जरुरत है' असं वातावरण असलेल्या इतर कुठल्याही सर्वसाधारण मध्यमवर्गीय मराठी माणसासारखा अनिकेत जोशी हा एक. इतरांप्रमाणे त्याला आयुष्यात काहीतरी वेगळं करायचं आहे. काहीतरी छान, जबरदस्त ! का, काय, आणि कसं? ह्याची उत्तर खूप प्रयत्न केलेत तरी अजून त्याला सापडत नाहीत आणि सापडली तरी आपल्या आवाक्याबाहेरचं आहे, असं त्याला नेहमी वाटत असतं.
प्रेरणादायी लोकांच्या गोष्टी वाचून, ऐकून त्याला हेच वाटायचं, ह्या फक्त गोष्टी आहेत, खऱ्या आयुष्यात अस काही घडत नसतं. ज्यांचं नशीब बलवत्तर त्यांचीच स्वप्न पूर्ण होतात. स्वप्न पूर्ण होण्यासाठी चांगलं नशीब लागतं किंवा काही असे गुण जे सर्वसाधारण लोकांमध्ये नसतात. आयुष्यात घडलेल्या काही योगायोगांमुळे अनिकेतला आत्मविश्वास, कठोर परिश्रम, कौशल्य विकास आणि चिकाटी ह्यांचं महत्त्व पटत गेलं आणि त्याने ते सगळं आत्मसात केलं. स्वप्नाचा पाठलाग करायला पुढे सुरू झालेल्या प्रवासात त्याला यश मिळालं असेल का ?

188 pages, Paperback
Published November 13, 2023
Ratings & Reviews
Friends & Following
Create a free account to discover what your friends think of this book!
Community Reviews
Displaying 1 - 7 of 7 reviews
December 10, 2023
पुस्तक वाचताना वेळेच भान रहात नव्हते 😄 ओघवती भाषा आणि content यामुळे मजा आली वाचताना. 3 बैठकीत पुस्तक संपूर्ण वाचले.
काल अभिवाचन केलेला चौगुलें आणि अनिकेत यांच्यातील संवाद माझा सगळ्यात आवडता भाग आहे.
Waiting for ur next book. All the best 👍🏻
Congratulations once again 🎉🎊

January 10, 2024
जो जे वाछिंल मधील अनिकेतचे पात्र हे अगदी जवळचे पात्र असल्यासारखे जाणवते. स्वप्न पाहणारा, पण ते प्रत्यक्षात आणण्याबाबत पुढे जायचे कसे यात अडकलेला अनिकेत अगदी ओळखीचा वाटतो. एक छान कथानक, ओघवत्या भाषे मांडणी आणि मुख्य म्हणजे पुण्यात राहून नागपूरी भाषेचा टच न सुटलेला अनिकेत अधिक भावतो. प्रत्येक पात्रातील संवाद उत्तम रंगवले आहेत.
November 24, 2024
जो जे वांछील - नचिकेत क्षिरे
पुस्तक परीक्षण/ Book Review - ओंकार बागल
प्रकाशन - नीमट्री पब्लिशिंग हाऊस, पुणे
पृष्ठ संख्या - १८८ पाने
किमंत - ₹३२५
"जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात" या ओळी संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या 'पसायदान'मधील आहेत. ज्याचा अर्थ आहे "जो जे इच्छितो, त्याला ते मिळवता येईल." ही संकल्पनाच खरं तर या कादंबरीचे केंद्रबिंदू आहे. संत ज्ञानेश्वरांनी त्यांच्या ओवीतून आपल्याला सांगितले की माणूस जे काही इच्छितो त्याला ते मिळवता येईल, त्याला ते सत्यात आणता येईल, त्याला ते प्राप्त करता येईल. मात्र आजच्या आधुनिक युगात संतांच्या ओवी, श्लोक, संतवाणी वगैरे लोकांना जुनाट वाटतात त्यामुळे ते या अमूल्य ज्ञानसागराकडे साफ दुर्लक्ष करतात. शिवाय याच गोष्टी जर एखाद्या परदेशी लेखकाने आधुनिक म्हणवणाऱ्या इंग्रजीतून सांगितल्या तर त्याची मात्र वाहवा करतील. अशा काही पुसटशा आणि अजूनतरी अधोरेखित नसलेल्या काही गोष्टी लक्षात घेऊन लेखक नचिकेत क्षिरे यांनी ही कादंबरी लिहिली आहे. संत ज्ञानेश्वरांच्या ओवीचा मतितार्थ आजच्या तरुण पिढीला अगदी साध्या, सोप्प्या आणि त्यांना समजेल अशा भाषेत सांगितला आहे.
या कादंबरीचा आशय जितका वेगळा आहे, तितकाच त्यातील गाभा लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी निवडलेला मार्ग. तरुणांना आणि आजच्या पिढीतील वाचकांना चटकन समजेल अशा स्वरूपात लिहिलेली ही कादंबरी प्रत्येकाला आपलीच कहाणी वाटेल. कोणत्याही कादंबरीची मुळात गंमतचं अशी असते की त्यातील कथानक जितकं निराळं असतं, तितकंच त्याचं स्वरूप आणि त्या कथानकाशी केलेला एखादा नवखा व आगळावेगळा प्रयोग. लेखक नचिकेत क्षिरे यांनीदेखील हे पुस्तक लिहिताना असाच एक अनोखा प्रयोग केला असून तो उत्तमरीत्या यशस्वी झालेला आहे, असं म्हणायला हरकत नाही. लेखकांनी पॉडकास्टिंग करत असताना त्यांना आलेल्या विविध अनुभवांची या कादंबरीच्या कहाणीत उत्तमरीत्या सांगड घातली आहे. शिवाय ते ज्या रंजक पद्धतीने लिहिले आहे तो मला एक सुंदर मिलाफ वाटतो.
कहाणीचे मुख्य पात्र म्हणजे तिशीतील अनिकेत जोशी नावाचा एक सामान्य मनुष्य. इतरांप्रमाणे अनिकेतलाही त्याच्या आयुष्यात काहीतरी वेगळं करायचं आहे, काहीतरी छानसं, जबरदस्त असं; परंतु कोणतीही नवीन गोष्ट करण्याआधी प्रत्येक माणसाला ज्या ज्या गोष्टींनी पछाडलं जातं त्याप्रमाणेच अनिकेतचीही गत होते. सुरुवात कुठून व कशी करावी? खरंचं करावी का? आपण हे करू शकतो का? आपल्याला हे जमेल का? असे एक ना अनेक प्रश्न त्याच्या समोर उभे ठाकतात. त्यातच तो आयुष्याच्या अशा एका वळणावर येऊन ठेपलेला असतो की कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावं आणि कोणत्या गोष्टींना बाजूला सारावं हे समजण्यास त्याला वाव मिळत नाही. हळूहळू त्याच्या आयुष्यात आमूलाग्र बदल होऊन तो त्याच्या स्वप्नांचा पाठलाग करत पुढे सरकत जातो, सोबत त्याचं हेलकावं खाणारं आयुष्यदेखील नागमोडी वळणं घेत पुढे सरकत जातं.
हे स्वप्न सत्यात आणताना अनिकेतच्या जीवनात अनेक प्रसंग उद्भवतात. अनेक प्रश्न त्याला सतावत राहतात, बऱ्याच समस्या घोंघावत राहतात. त्यातून त्याला मिळणारे मार्ग वाचकाला खूप काही सांगून जातात किंबहुना प्रेरणा देऊन जातात. बारकाईने पाहिल्यास ही कादंबरी केवळ एका स्वप्नांचा पाठलाग करणाऱ्या माणसाची कहाणी, इथवरचं मर्यादित न राहता त्यात कित्येक पैलू आहेत. पॉडकास्टिंग, सिंगल पॅरेंटिंग, स्त्रीचे वांझेपण, वैवाहिक जीवनाच्या डाव्या बाजू, जातीयता, पौराणिक व्यवस्था, मराठी पुस्तकांचे भविष्य आणि मराठी साहित्य इ. अशा बऱ्याच गोष्टींचा मागोसा घेण्याचा प्रयत्न लेखकांनी केला आहे. अनिकेतसमोरही अनेक प्रश्न उभे राहतात मात्र आयुष्यात भेटत गेलेली माणसे, प्रसंग आणि पॉडकास्टिंग दरम्यान ऐकलेले किस्से यातून तो बरेच धडे घेतो. त्यातून तो आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळवू लागतो, समस्येवर मार्ग शोधतो आणि त्याचे प्रश्न हळूहळू सुटूही लागतात.
आयुष्यात प्रत्येक वळणावर 'आपली माणसे' आपल्यासाठी का गरजेची असतात, याची बरीच उदाहरणे कादंबरीतून वाचायला मिळतील. एखाद्या ध्येयाचा पाठलाग करताना जसं आपल्याला अनेक गोष्टींतून, अनुभवांतून, वाचनांतून धागेदोरे सापडतात, एखाद्या समस्येचे निदान सापडते, डोक्यात लख्खपणे प्रकाश पडतो अगदी तसचं. फरक इतकाच की ते अनुभव पॉडकास्टिंगमधले. कादंबरीतील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे लेखकाने कोणतीही तमा न बाळगता, परंपरागत लिखाणाची पद्धत न वापरता खुलेपणाने व बिनधास्त केलेले लिखाण. अहो, आजच्या वाचकाला हेच तर हवंय. आजच्या पिढीतील तार्किक बुद्धीला एखादा अभंग सांगितला तर त्याला तो जुनाट, बुरसटलेला वाटेल; परंतु तोच अभंग त्याच्या रोजच्या जगण्याचा भाग असलेल्या गोष्टी अनुसरून, त्याच्या बोलण्यातील भाषेत वा स्वरूपात सांगितला तर तो त्याच्या डोक्यात नक्कीच घट्ट बसेल आणि त्याच्या बुद्धीला रूचेलही.
सिंगल पॅरेंटिंग म्हणजे एकेरी पालकत्व आणि स्त्रीचा नैसर्गिक वांझपणा हे दोन महत्वाचे विषय कादंबरीतून अतिशय योग्य आणि गंभीरपणे हाताळले आहेत. काही ठिकाणी कहाणी भलत्याच मार्गाने जाते का असं वाटू शकतं मात्र पुन्हा ती तिच्या मार्गाने पुढे चालू राहते. कादंबरीतील "मी मनू बोलत आहे" हा पूर्ण उतारा अतिशय साचेबद्ध लिहिला आहे. जरी लेखकांनी तो तटस्थपणे लिहिला असला तरी नकळत का होईना जातीपातीच्या मुद्द्यावर त्यांनी खोचक प्रहार केला आहे. कादंबरीतील आणखी सर्वात सुंदर अशी गोष्ट कोणती म्हणाल तर मराठी भाषेचा आग्रह! मराठी, अलीकडेच अभिजात दर्जा मिळालेली आपली माय मराठी! इतक्या प्राचीन आणि संपन्न असलेल्या मराठी भाषेतील साहित्याला नेमका कोणत्या गोष्टीमुळे वाव मिळत नाही यावर लेखकाने केलेलं भाष्य अगदी चोख आणि रास्त आहे.
वाचकांच्या मनाचा ठाव घेऊन वेळोवेळी उत्तम उदाहरणे, सवांद आणि विचार प्रकट केले असल्याने कादंबरी वाचताना एक वेगळीच मजा येते. एकंदरीत जो जे वांछील म्हणजे जो जे इच्छितो, त्याला ते मिळवण्यासाठी ही कादंबरी विविध मार्गांनी प्रेरणा देणारी आहे. त्यामुळे कोणत्याही वर्गातील वाचकाला यातून जितकं शिकायला मिळेल तितकीच एक वेगळी अनुभूतीदेखील मिळणार आहे एवढं नक्की!
-©ओंकार दिलीप बागल
7506582341/ bagalomkar2@gmail.com
Insta ID - bookbandhu_reviews

January 2, 2025

9321409890/ bookbandhureviews@gmail.com

December 13, 2023
मस्त कथानक, पिक्चर पहिल्यासारखा फील येतो. लाइट आहे स्टोरी! ओघवती भाषा. मराठी, थोडे इंग्लिश आणि नागपूरी भाषा आहे. कथा खिळवून ठेवते. म्हणायला हि कादंबरी आहे पण यामधून खूप काही शिकण्यासारखे आहे! अनिकेत या कथेच्या नायकाच्या प्रवासात प्रत्येक टप्प्यावर काहीतरी नवीन आपण शिकत जातो! सेल्फ हेल्प ग्यान मिळते पण बोअर होत नाही कारण गोष्ट आहे! मस्ट रीड आहे सगळ्यांसाठी! स्पेशली ज्यांना काहीतरी आयुष्यात वेगळे करायचेय त्यांनी नक्की वाचा!
February 16, 2024
ह्या वर्षी वाचेलेले सर्वात उत्कृष्ट पुस्तक म्हणजे "जो जे वांछील". सुरुवात करणं हे किती महत्त्वाचं आहे हे नचिकेत नी खूप सरळ भाषेत सांगायचा प्रयत्न केला आहे तो निश्चित प्रभावशाली आहे. सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यात आलेले यश अपयश ह्यांना जास्त महत्त्व न देता पुढे कसं जात राहायचं हे ह्या पुस्तकानी शिकवलं. मनात असलेल्या कल्पनांना action mode वर आणणे हे महत्त्वाचं.
नचिकेत चे अभिनंदन आणि आभार. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. आता पुढच्या पुस्तकाची वाट बघतोय आम्ही सगळे त्याचे fans.

May 7, 2024
जो जे वांछील हे पुस्तक अतिशय सहज, सुंदर , मध्ये मध्ये नागपुरी अशा ओघवत्या भाषेत लिहिलं आहे. त्यातला गोष्टीचा नायक अनिकेत, त्याला त्याच्या आयुष्यात भेटत जाणारे लोकं..आणि त्यातून तो कसा आयुष्य जगायला शिकतो.. याभोवती सगळी गोष्ट आहे. खूप छान पुस्तकं वाचायला मिळालं याबद्दल नचिकेत क्षिरे यांचे खूप अभिनंदन!
Displaying 1 - 7 of 7 reviews