छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे दोघेही मराठी माणसाच्या गळ्यातले ताईत आहेत. आजचा महाराष्ट्र आणि भारत शिवशंभुंचा शतशः ऋणी आहे. पण शिवरायांनी निर्माण केलेले हे स्वराज्य रक्ताचे पाणी करून टिकवणाऱ्या शिवरायांच्या सुनबाई महाराणी ताराबाई यांच्या पराक्रमाकडे महाराष्ट्राचे अक्षम्य असे दुर्लक्ष झाले आहे असे ताराबाईंचा इतिहास वाचल्यावर माझे मत बनले. औरंगजेबाच्या उरावर बसून त्यांनी स्वराज्य राखलं आणि वाढवलं ही गोष्ट फक्त इतिहासकारांच्या आणि अभ्यासकांच्या पुरती मर्यादित होऊन राहिली आहे. त्यामुळे महाराणी ताराबाईंचा हा जाज्वल्य पराक्रमाने भरलेला इतिहास लाखो तरुणांच्या पर्यंत सोप्यात सोप्या भाषेत जुन्या आणि नव्या डिजिटल पद्धतीने नेऊन महाराणी