मराठी भाषेतील प्रसिद्ध तरुण कवि आणि गीतकार वैभव जोशी यांचा हा नवीन काव्यसंग्रह! या आधी ‘मी .. वगैरे’ हा त्यांचा काव्यसंग्रह ‘रसिक साहित्य, पुणे’ यांच्यातर्फे प्रकाशित झालेला असून त्याच्या जवळपास 5000 हून अधिक प्रति विकल्या गेल्या आहेत. हा काव्यसंग्रह, वैभव जोशी यांच्याच ‘काळ सरकत राहिला..’ या नव्या गझलसंग्रहासोबत दिनांक 26 जानेवारी 2022 रोजी पुण्यात प्रकाशित होईल.