भुतप्रेते, जारणमारण, परामानसशास्त्र यांवर आधारलेल्या भयकथा वा विस्मयकथांचे मानवी मनाला वाटणारे आकर्षण सर्वकालीन आहे. एक मनोरंजन म्हणून त्या कडे पाहणे एक समजुतदार विचार आहे. या कथांकडे वाचकांनी फक्त एक साहित्यप्रकार म्हणून पहावे. कोणत्याही प्रकारच्या अंधश्रध्देचे समर्थन करण्याची भूमिका या कलाकृतीमागे नाही. कोणत्याही मानसिक आणि शारिरीक व्याधींना आधुनिक वैद्यकिय शास्त्र हाच एकमेव उपाय आहे. लेखकाचा कोणत्याही अमानवी वा अतिमानवी अस्तित्वांवर, देव देवतांवर विश्वास नाही, व वाचकांना त्या बाबत प्रवृत्त करायचा इरादाही नाही. या पुस्तकातील सर्व मते लेखकाची आहेत, प्रकाशक किंवा संपादिका या मतांचा स्वीकार करतातच असे नाही.