वर्षानुवर्षे गावाच्या शिवारात झोपड्या करून राहिलेल्या पारधी समाजाचा रहिवाशी हक्कावरुन गावाशी असलेला संघर्ष... या संघर्षात पारध्यांचा नेता अन गावाचं श्रद्धास्थान असलेल्या ‘तुकाबा’चा गेलेला बळी... पारध्यांची बाजू घेतल्याने बहिष्कृत केलं गेलेलं बळीचं कुटुंब... त्याच्या पश्चात त्याच्या कुटुंबाची झालेली फरफट... या सर्वांना न्याय मिळवून देताना गजानन मास्तर अन शालीच्या नाजूक नात्याची गुंफण, या अशा अनेक गोष्टींवर प्रकाश टाकणारी ही कहाणी फुलत जाऊन समाजकारण, राजकारण, तत्वज्ञान, विनोद, प्रेम अशा विविध रंगात रंगून जाते. गजानन मास्तर अन शालीचं निस्सीम प्रेम, बापाच्या पाठीमागे पारध्यांचं खमकेपणानं नेतृत्व करणारी तृतीयपंथी ‘ढपी’, पारध्यांची थरारक अन बेदरकार जीवनपद्धती, ‘