या मालिकेतील पुढील पुस्तकांमध्ये लेखक गजानन भास्कर मेहेंदळे हे भारतातील इस्लामी राजवटींच्या धार्मिक धोरणांचा वृत्तान्त सांगणार आहेत. त्या राजवटींच्या धार्मिक धोरणांचा विचार करताना इस्लाम समजावून घेणेही आवश्यक आहे. म्हणून या मालिकेतील पहिल्या पुस्तकात इस्लामची ओळख करून दिलेली आहे.