संगीतकार सलील कुलकर्णी यांची लेखनप्रांतातील ही मुशाफिरी. ते जसे सुरेल गातात; तसंच या पुस्तकाच आहे. सुरेल आणि तरल. यांच्यातील कलाकाराच्या संवेदनशील मनाची प्रचीती त्यांच्या लेखनातूनही येते. सरळ, साध्या, भाषेतून उतरलेल्या पुस्तकात वाचकाला एक सच्चेपण सापडतं. त्यात काही अनुभव आहेत, काही थोर माणसं भेटतात, काही आठवणी सुखावतात. या सगळ्याला संगीताचा बाज आहे. त्यामुळेच ते कधी एकत्र बांधलेले वाटते. या छोट्या लेखांच्या प्रारंभी सलील यांच्या हस्ताक्षरातील निवेदन आहे. लेखाचे केंद्र त्यातून प्रकट होते.
पुस्तकाचे नाव - लपवलेल्या काचा पुस्तक प्रकार - ललित लेखन लेखक - सलील कुलकर्णी प्रकाशन - काॅन्टिनेन्टल प्रकाशन मूल्य - २५० पृष्ठ संख्या - २००
गेले काही दिवस मी लेखन प्रांतातील मुशाफिरी अनुभवत होते असे म्हणायला हरकत नाही.आणि याच कारण होतं संगीतकार सलील कुलकर्णी यांचं 'लपवलेल्या काचा' हे पुस्तक. लेखकाला भावलेल्या काही व्यक्तींबद्दल, आयुष्यात येणाऱ्या अनुभवाबद्दल आणि स्वतःच्या निरीक्षणातून गवसलेल्या गोष्टींच्या कथांचं संकलन म्हणजे हे पुस्तक.
अंतर्मनाला हाक मारावी आणि जे उत्तर येईल ते लिहून काढावं असं या पुस्तकाचं लिखाण आहे. प्रत्येक लेखांमधून लेखकाने आपल्याशी बोलण्याचा प्रयत्न केलाय. कधीतरी काहीतरी शोधायला भाग पाडलंय तर, कधीतरी काहीतरी नकळतपणे सांगण्याचा, समजवण्याचा प्रयत्न केलाय आणि म्हणूनच सरळ, साध्या, भाषेतून उतरलेल्या या पुस्तकात वाचकाला एक सच्चेपण सापडतं. त्यात काही अनुभव आहेत,काही सुखद आठवणी आहेत तर काही वेळा थेट थोरामोठ्यांच्या भेटी आहेत. यातील प्रत्येक लेखाचा विषय वेगळा असला तरीही तो आपल्याशी मिळता जुळता आहे हे मात्र नक्की. कलाकाराच्या संवेदनशील मनाची प्रचीती आपल्याला या पुस्तकाच्या प्रत्येक लेखातून जाणवते. आणि या सगळ्या लेखनाला संगीताचा एक बाज आहे ते संगीत ऐकू आलं नाही तर मात्र नवलचं!
ललित लेख म्हणजे समजण्यास अवघड लिखाण अशी एक समजूत आपल्याला अनुभवायला मिळते पण हे पुस्तक यास अपवाद आहे. लेखनाची भाषा इतकी सोपी आहे की अगदी दहा वर्षाच्या मुलापासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येकजण हे पुस्तक वाचू शकतात, समजू शकतात आणि त्यातला आनंदही घेऊ शकतात आणि मला हीच या पुस्तकाची जमेची बाजू वाटते. आशयानुरूप सार्थ मुखपृष्ठ ही या पुस्तकाच्या बांधणीतील मला भावलेली अजून एक गोष्ट. यातील अजून एक गंमत म्हणजे प्रत्येक लेखाच्या आधी लेखकाच्या हस्ताक्षरातील छोटं निवेदन आहे. ललित लेखनाला ती संकल्पना खूप पूरक ठरते.
एकूणच ‘प्रेम, माया, करूणा, बालपण, वात्सल्य, आठवणी यांचा असह्य मिलाप,प्रत्येक भावनेला कोरून अश्रुंची वाट करून देणार साहित्य, कसं जगलो आयुष्य व कसं जगावं याचा शब्दबध्द साचा, आणि प्रत्येकाने एकदा तरी वाचाव्यात अशा या लपवलेल्या काचा!
निवडक संवाद: एकूणच आजकाल आपण ज्या विश्वास जगतोय किंबहुना नाईलाजाने जगावं लागतं ते विश्व, ती माणसं या साऱ्यांमध्ये मी कसा वेगळा एकटा श्रेयसता आहे हे वाटून घेण्याची सवय लागली सगळ्यांना.
कविता काय, गीत काय, लेख काय, सगळंच मनात असतं तोपर्यंत प्युअर असतं, स्वाभाविक असतं ,ज्या क्षणी ते कागदावर उतरवण्याची इच्छा होते तिथेच रचना सुरू होते.
शास्त्राच्या चष्म्यातून बघा वा कवितेच्या, तुमचं 'मनं' तुम्हाला उमगणं केवळ अशक्यच.
कितीही विश्लेषण करा किंवा समुपदेशनाची व्याख्यानं ठोका, 'मन स्थिर ठेवा' असं उच्चारताना देखील मनात दुसरा विचार येणारच.
परमेश्वराने माणसाला इतकी बुद्धी दिली की, भोवतालच्या प्रत्येक छोट्या गोष्टीचं मूळ माणसानं समजून घेतलं, शोधून काढलं, माणसाचं 'मन' मात्र ठेवलं परमेश्वराने स्वतःच्याच हातात.
धावताहेत सगळेच, धावावंच लागतं, पण कुठे आणि कशासाठी? कुणालाच ठाऊक नाही. झपाटून जाऊन शोध घेतायत...पण कसला? नक्की माहीत नाही. . . . -गायत्री
संगीतकार म्हणून प्रसिद्ध असलेल्या सलील कुलकर्णींच्या ललित लेखांचा संग्रह म्हणजे 'लपवलेल्या काचा'. जितकं सुरेल आणि तरल त्याचं संगीत तितकच सुरेख आणि संवेदनशील त्यांचे लेखन सुद्धा आहे. पंचवीस लेखांचा हा संग्रह. पुस्तकाची मांडणी खुप वेगळी आणि आकर्षक आहे. प्रत्येक लेखाचं समर्पक शिर्षक व लेखाची सुरूवात सलील यांच्या हस्ताक्षरातल्या मजकुराने होते तिथेच पुस्तकाचे वेगळेपण जाणवते. सहज सोप्या भाषेतील लेख वाचताना कधी आनंद होतो, मध्येच अस्वस्थ व्हायला होतं तर बरेचदा नकळत डोळ्यात टचकन पाणी येतं. बरेच लेख विचार करायला, स्वत:शी संवाद साधायला भाग पाडतात. तर कधी आपल्याच मनातल्या गोष्टी शब्दात मांडल्यात असं वाटतं. बरेच प्रसंग व आठवणी मनात रेंगाळतात. लेखकाच्या नजरेतून काही थोर माणसं भेटतात. ललित लेख वाचनाची आवड असलेल्यांनी आवर्जून वाचावे असे पुस्तक. लेखकाच्याच भाषेत सांगायचे झाले तर, 'संपुर्ण पुस्तक वाचून झाल्यावरही पुन्हा पुन्हा चाळत राहावसं वाटतंं...' असे पुस्तक!
This book made me cry thrice on the same morning. earlier, i had decided to read one-two articles every day and enjoy it for a week or more. But after crying for the first time, i couldn't keep it down until i was finished. there is a longing in my heart after reading this. how he connects with the reader! When he touched the stumps on the wall in his lane, i was already out on our ground bowling.... Doordeshi gela baba, damlelya babachi kahani is all okay. but while reading that i cried because mothi hotat mula aai mothi hot nahi....
whatever, every article gives something to think over, makes you dig for some hidden trinkets from your childhood, teenage, rather your whole life.
अतिशय सुंदर पुस्तक.. प्रत्येकाने जरूर वाचावं असं! ह्या संगीतकाराने कथन केलेल्या अनुभवामध्ये आपण अगदी पूर्णपणे हरवून जातो.. आणि शोधायला लागतो - आपल्या स्वत:च्या अशा खास.. 'लपवलेल्या काचा'!!