श्रावण वद्य द्वादशीच्या रात्री भिज पावसाच्या संततधारेत शिवाजी महाराज आग्र्यावरुण निसटले. राजांना शोधण्यासाठी औरंगजेबाचं लाखोंचं सैन्य चौफेर घोंगावू लागलं. अभाळतून कोसळणारा पावसाचा लोंढा. गंगा, यमुना, सोने, गोदावरी, भीमा नद्यांना आलेला बेभान पूर. नेटक्या मार्गावरून प्रवास करावा, तर मुघली गस्तीचा जाच. अरण्यातून वाट तुडवावी, तर मार्ग अनभिज्ञ. जगण्याचीच शाश्वती नसेल, तिथे आहाराचा मुद्दाच बेदखल. अशा काळ्याकठोर नियतीच्या छाताडावर पाय रोवून राजे राजगडी पोहोचले. कसे? उत्तर हेचि 'साधू' शिवाजी महाराजांच्या आग्रा ते राजगड या प्रवासाची थरारक कादंबरी.
क्षत्रियकुळावंत साधू छत्रपती शिवाजी महाराज पुरंदरच्या तहानंतर आग्र्याला गेले होते. औरंगजेबाच्या दरबारात जिथे कोणाला मान वर करायला परवानगी नसते तिथे महाराजांनी भर दरबारात औरंगजेबाचा पानउतारा केला आणि निघून गेले. त्या नंतर औरंगजेबाने महाराजांना नजरकैदेत ठेवले. महाराजांनी या नजरकैदेतल्या पहाऱ्याला गुंगारा दिला आणि मिठाईच्या पेटाऱ्यात बसून तिथून निसटले आणि राजगडी पोहोचले. या सबंधं घटनेचा इतकाच काय तो इतिहास लोकांना ठाऊक आहे. परंतू, आग्रा ते राजगड हे शेकडो मैलांचं अंतर इतक्या सहजा सहजी पार करन सोप नक्कीच नव्हत. संपूर्ण हिंदुस्थानवर राज्य करण्याचा मनसूबा असलेल्या औरंगजेबाला त्याच्याच आग्रा शहरातून गुंगारा देऊन इतका लांबचा पल्ला गाठण देखील सोपी गोष्ट नव्हती. जागो जागी मुघली चौकी पहारे. त्यात या घटनेनंतर चवताळून पाठीमागे लागलेली फौज. सोबत ९ वर्षांचे संभाजीराजे. आग्रा ते राजगड हा सरळ सरळ प्रवास न करता पूर्वेकडे वाराणसी मार्गे दख्खन ला यायचा मार्ग महाराजांनी निवडला. संभाजी महाराजांना आग्र्याच्या पलीकडे असलेल्या मथुरे मध्ये काशीपंतांकडे ठेवलं होत. दूरदेशी परकीय राजवटीखाली, एखाद्यावर इतका विश्वास ठेऊन स्वतःच पोटच पोर ठेवणं ही देखील मोठी गोष्ट. नजर कैदेत महाराजांनी त्यांच्या हेर खात्याच्या मदतीने आग्र्यापासून वाराणसी आणि तिथून खाली विजापूर आणि पूर्वेकडे राजगड या सगळ्या प्रदेशाची माहिती करून घेतली. त्या त्या प्रदेशात कोणाची सत्ता आहे, प्रत्येकाशी कस आणि काय युक्ती वापरून मदत घ्यायची की प्रतिकार करायचा या सगळ्याच नियोजन महाराजांनी केल. आणि तेच पुढे पूर्णत्वास देखील नेल. कधी चालत, कधी घोड्यावर, कधी साधूच्या वेशात तर गरज पडेल तिथे मुघली वेशात ऊन वारा पाऊस कशाचीही पर्वा न करता, डोंगर दऱ्या आणि पुराने वेढलेल्या गंगा, यमुना, गोदावरी आणि भीमा पार करत महाराज आणि त्यांच्या सोबतचे इतर मावळे राजगडी कसे पोहोचले याची ही थरारक अनुभव सांगणारी कादंबरी..
When it comes to writing anything about Chatrapati Shivaji Maharaj, it's a daunting task! Nitin Thorat has done a wonderful job even if hile has chosen a period from his life on which, there's almost nothing documented in the history. Yet the story is believable, gripping and fascinating. I am eagerly waiting to read the sequel of this.
अप्रतिम! राजांचा आग्र्याहून सुटका होऊन ते राजगडावर पोचण्यापर्यंतचा प्रवास खूप खडतर आणि शेवटी शेवटी सुसह्य होतो आणि वाचक म्हणून मी सुद्धा राजे पोचल्यावर प्राण सुरक्षित राहिल्याचा आनंद व्यक्त करतो. खरोखर, लेखक नितीन अरुण थोरात आपल्याला ह्या प्रवासात सोबत प्रवास करतो आहोत असा अनुभव देण्यात यशस्वी ठरले आहेत, ह्यात शंका नाही!