आधीच्या भागाविषयी- आलोक एक साधा मुलगा पण अचानक त्याला असह्य डोके दुखीचा त्रास चालू झाला. पण त्याचबरोबर अचानक त्याला पेंटिंग करण्याची इच्छा व्हायला लागली.. हा योगायोग जरा विचित्र होता. तो अतिशय सुंदर पेंटिंग करायला लागला होता. आलोकने डॉक्टरला दाखवल्यावर त्याच्या डोक्यात क्लॉट असल्याचं समजतं. तो क्लॉट काढल्यावर कदाचित आलोक त्याचं पेंटिंगची दैवी कला हरवून बसणार होता पण क्लॉट काढला नाही तर कदाचित मृत्यू.. हे सत्य भयानक होतं पण सर्जरी करायची नाही आणि मरणाची चिंता न करता पेंटिंगची कला जोपासायचा निर्णय घेतो...आता पुढे...