उत्क्रांतीची तत्त्वे आणि प्रक्रिया या विषयावरील हे अतिशय वाचनीय पुस्तक आहे. या पुस्तकात उत्क्रांतीविषयीचे मार्गदर्शन अगदी सोपेपणाने आणि हसत खेळत केले आहे म्हणजे ते काय आहे आणि काय नाही, ही प्रक्रिया कशी काम करते, खास करून सध्याच्या काळात तिचे महत्त्व काय आहे हे लेखक विषद करतात. विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी आणि ज्या कुणाला या पृथ्वीवरील जीवसृष्टी कशी निर्माण झाली, याबद्दल आश्चर्य वाटते त्या सर्वांनी वाचलंच पाहिजे असं हे पुस्तक आहे. उत्क्रांती या विषयाचे खरे मर्म समजून घेताना ऐतिहासिक काळात तसेच सध्याच्या काळातही येणार्या समस्यांवर या ठिकाणी लेखकाने उत्तम विश्लेषणामुळे प्रकाश टाकला आहे. त्याचप्रमाणे जे लोक या क्षेत्रातील ताज्या घडामोडींवर काम करतात, त्यांच्य&#