Jump to ratings and reviews
Rate this book

Jambhalache Divas

Rate this book
कथासंग्रह

112 pages, Paperback

First published January 1, 1957

8 people are currently reading
46 people want to read

About the author

Vyankatesh Madgulkar

44 books103 followers
Vyankatesh Digambar Madgulkar (Marathi: व्यंकटेश दिगंबर माडगूळकर) (1927–2001) was one of the most popular Marathi writers of his time. He became well-known mainly for his realistic writings about village life in a part of southern Maharashtra called Maandesh, set in a period of 15 to 20 years before and after India's Independence.

Madgulkar wrote 8 novellas, over 200 short stories, about 40 screenplays, and some folk plays (लोकनाट्य), travelogues, and essays on nature. He translated some English books into Marathi, especially books on wild life, as he was an avid hunter.

Ratings & Reviews

What do you think?
Rate this book

Friends & Following

Create a free account to discover what your friends think of this book!

Community Reviews

5 stars
24 (51%)
4 stars
13 (27%)
3 stars
8 (17%)
2 stars
1 (2%)
1 star
1 (2%)
Displaying 1 - 5 of 5 reviews
Profile Image for Trupti Haldankar.
13 reviews46 followers
July 27, 2023
जांभळाचे दिवस हा छोटासा कथा संग्रह मी आत्ताच वाचून संपवला. बाहेर छान धो धो पाऊस आणि जुन्या धाटणीच्या व्यंकटेश माडगूळकरांच्या या कथा !
१० कथा म्हणजे १० वेळा गवसलेला आनंदच म्हणेन मी कारण प्रत्येक कथेची चुरस हि वेगळीच . कधी कथा सम्पली कि चुटपुट लागावी तर कधी हसू यावं अशी भावनांची संमिश्र भेळ !
2,142 reviews28 followers
January 29, 2022
१. जांभळाचे दिवस

"काही वेळाने चमन उठली आणि तिने धारेत जाऊन तोंड धुतले. हातपाय धुतले. बराच वेळ ती धारेत होती. मी वरून बघत होतो. मग हसर्‍या चेहर्‍याने ती जांभळीखाली आली आणि खांद्यावरचा पदर काढून म्हणाली,

"‘‘मला टाका की – पदरातच हां!’’

"मी भराभरा घोस टाकले. चमनचा ओटा भरला. ती ओरडून म्हणाली, ‘‘पुरे आता, उतरा.’’

"‘‘ओटा भरला का?’’

"‘‘भरला; उतरा.’’

"मी खाली उतरलो. भुरे केस सावरीत चमन म्हणाली, ‘‘चला आता सावलीला.’’

"मग आम्ही गर्द सावलीला जाऊन समोरासमोर बसलो. आपल्या ओट्यातली रसाळ आणि काळी-काळी जांभळं वेचून चमन ती मला देत राहिली.

"जांभळाचे दिवस फार लवकर संपले!"


२. पंच्याण्णव पौंडांची मुलगी

"सात-आठ दिवस तो असा वाट पाहत राहिला, बागेतून हिंडत राहिला; तरीही ती मुलगी दिसली नाही. त्याने वाट पाहण्याचे सोडून दिले, बागेत फिरायचे सोडून दिले. पुन्हा तो नेहमीप्रमाणे यंत्राशेजारच्या स्टूलावर गंभीर चेहर्‍याने बसून राहू लागला. पुन्हा पहिल्यासारखेच त्याचे दिवस उदास, कंटाळवाणे जाऊ लागले. खरं तर महादेवाचे वय हसण्या-खिदळण्याचे होते. ... "


३. उतारावर

" ... किती तरी उंचावरून पडणार्‍या पावसाचं त्यांना काही वाटत नाही; परंतु एखादा धबधबा पाहून ती चकित होतात!’’"


४. अनवाणी

"पोस्टमनने बेबीच्या पायांकडे पाहिले. अपराधी होऊन वहाणा पायांत घातल्या. सलाम करून तो घाईने फाटकाबाहेर पडला.

"खाली मान घालून हरी गेटाबाहेर पडला. कुबड्यांच्या आधाराने अजून बेबी उभी होती. पायात वहाणा घातलेला पोस्टमन कसा चालतो, ते ती बघत होती. पोस्टमन मनात म्हणत होता, ‘या लेकरानं मला अनवाण्याला वहाणा दिल्या; त्याला पाय नाहीत, ते कसे देणार मी? मनाला कितीही वाटलं, तरी तिच्यापाशी नाही, ते कुणी तिला देऊ शकत नाही.’"


५. लोणी आणि विस्तू

"दिवसभर तो पोस्टापाशी बसत होता. नाना मजकुराची कार्डे लिहीत होता. याची खुशाली त्याला कळवीत होता; ... "


६. शाळातपासणी

"बाळ्याने खळाखळा कंदील हलवून म्हटले, ‘‘उलीसं घाष्टेल, नाही तर समदं पानीच हाय कंदिलात. वर तरंगत व्हतं तेवढ्या घाष्टेलावर कंदील जळला. आता काय वढ्याचं पानीच की ह्ये!’’"


७. बाई

"बाईचे लग्न होऊन वर्ष-सहा महिने उलटले आहेत. मास्तरांचे नियमित येणे आता बंद झाले आहे. कधी ते येतात, कधी येत नाहीत. निम्मू कधी चौकशी करते,

"‘‘बाई, आज मास्तर नाय आले?’’ बाई उत्तर देतात,

"‘‘म्हातारं माणूस – आलं, आलं, नाही, नाही!’’"


८. बाजाराची वाट

"चंद्र पाझरत होता. चांदणे झिरमिरत होते. झाडेझुडे भिजत होती. बाजाराची वाट आता जवळजवळ संपली होती आणि उदनवाडी आली होती."


९. सकाळची पाहुणी

" ... गुणा तिथे नव्हतीच!"


१०. सायकल

"त्याला बघताच मास्तर मोकळेपणाने म्हणाले, ‘‘सायकल हरवली का रे रामू? हरकत नाही, हरवली तर. आहे काय त्यात! दुसरी घेऊ.’’

"आणि अप्पांचे हे शब्द ऐकताच रामूला रडण्याचा हुंदका आला. आपल्या हातून झालेल्या अपराधाने घाबरलेले ते पोर रडू लागले.

"मास्तर त्याच्यापाशी गेले आणि त्याला जवळ घेऊन थोपटीत म्हणाले, ‘‘अरे, रडायचं काय त्यात? साठ रुपयांची बाब! पुढच्या पगाराला नवी कोरी सायकल घेऊ आपण – एकदम बेस्ट!’’"
Profile Image for Aditya Sathe.
Author 3 books8 followers
October 1, 2024
Stories celebrating human emotions are truly timeless! जांभळाचे दिवस is an unputdownable collection of short stories written by master storyteller Vyankatesh Madgulkar. Every story in this will strike a different chord in your heart.
Profile Image for Kanchan Lele.
2 reviews1 follower
October 20, 2024
खूप सुंदर कथांचा संग्रह आहे..काही कथा मात्र अस्वस्थ करतात..प्रत्येक कथा मात्र तुम्हाला काहीतरी देऊन जाते!
Profile Image for Prashant Kulkarni.
Author 5 books1 follower
Read
May 14, 2017
From my blog: https://ppkya.wordpress.com

ह्यावर्षी उन्हाळा जरा लवकरच सुरु झाला. मार्च महिन्यापासूनच धरती तापू लागली. उन्हाळा म्हणजे आंबे, फणस, तसेच रानातील करवंदे आणि जांभळे. त्यातच मी व्यंकटेश माडगुळकर यांचे जांभळाचे दिवस पुस्तक वाचले. हे पुस्तक म्हणजे पन्नास-साठ वर्षापूर्वी(१९५७) प्रसिद्ध झालेला कथा संग्रह आहे. त्यात दहा कथा आहेत, काही ग्रामीण, तर काही शहरी. त्यातील पहिलीच कथा जांभळाचे दिवस या नावाची आहे. आणि ती वाचून मला रानावनात जाऊन करवंदे, जांभळे खावेसे वाटू लागले. खूप दिवसात सह्याद्रीमधील जंगलात, डोंगरावरील किल्ल्यावर भटकायला गेलेलो नाही. पूर्वी जायचो आणि उन्हाळ्यात हा रानमेव्यावर ताव मारत भटकंती करत असू.

तर पुस्तक आणल्यावर मी सर्वात आदी सायकल ही कथा वाचली. ही पुस्तकात सर्वात शेवटी आहे. मग या पहिल्या कथेकडे आलो. व्यंकटेश माडगुळकर शिवाजीनगर भागात अक्षर बंगल्यात राहायचे(त्यांचे बंधू ग. दि. माडगुळकर हे वाकडेवाडी भागात पुणे-मुंबई रस्त्यावर पंचवटी नावाच्या बंगल्यात राहत असत). सायकल आणि इतर दोन-चार कथा याच भागात घडतात. सर्वच कथा ह्या मानवी मनाच्या अथांगतेचा ठाव घेतात. सायकल कथेत आपल्या मुलास सायकल घेवून देण्यातील असमर्थता आणि जुन्या सायकलीचा इतिहास समजल्यावर मनाची होणारी घालमेल याचे वर्णन आले आहे.

जांभळाचे दिवस ही पाहिली कथा अशीच रानात घडते. लेखक सुट्टीनिमित्त गावी गेला असता, नदीकाठी असलेल्या रानात, जांभळाच्या झाडीत भटकत, जांभळे मनसोक्त खात, सामोरे गेलेल्या प्रसंगाभोवती कथा फिरते. बालपणी गावात रहात असलेली आणि ओळखीची असलेली मुलगी चमन रानात पाहून त्यांच्या मनात आलेले विचार म्हणजे ही कथा. ह्या कथेत जांभळे झाडावरून तोडून खाणे ह्या गोष्टीचे बहारदार, रसपूर्ण वर्णन केले आहे.

सकाळची पाहुणी या कथेत त्यांनी भास आणि सत्य यांचा खेळ मांडला आहे. माणसाचे सुप्त मन झोपेत गेल्यावर जागे होते. सकाळी जाग आल्यावर सुप्त मन आणि जागृत मन यांच्या सीमारेषेवर मनात होणारा खेळ त्यांनी या कथेत दाखवला आहे. सकाळी उठल्यावर मनात रुतलेल्या एखाद्या स्त्रीचे समोर असल्याचा भास होणे, आणि त्यातून होणाऱ्या घटना, होणारा संवाद, आणि तीला अगदी रेल्वे स्टेशनवर सोडण्यासाठी म्हणून जाणे इथपर्यंत तो खेळ होतो. मानसिक आजारी असलेल्या, विशेषतः स्किझोफ्रेनियाने ग्रासलेल्या व्यक्तींना असे भास(hallucination) होत असतात, हे मी त्या क्षेत्रात काम करत असल्यामुळे मला समजले होते. ही कथा त्याच धर्तीवरील आहे की काय अशी शंका येते.

बाजारची वाट ही ग्रामीण कथा आहे. ती सुद्धा स्त्री-पुरुष संबंधाचे चित्रण करते. त्यात एक ग्रामीण स्त्री आठवडे बाजारातून रात्री उशिरा आडवाटे���रून आपल्या गावी येतना तिच्या मनात आलेले, तसेच तिला वाटेत भेटलेल्या एका गड्याचे विचार हे सर्व अनादी काळापासून चालू असलेल्या स्त्री-पुरुष आकर्षणावर प्रकाश टाकते. बाई ही कथा सुद्धा अशीच आहे. मुंबईतील नोकरी करून चाळीत एकट्या राहणाऱ्या एक मध्यमवयीन विधवा स्त्रीला वाटणारी असुरक्षितता, पुरुषांबद्दल असणारा संशय, आणि त्याच बरोबर कार्यालयातील एक विदुर गृहस्थ यांच्या बरोबर कसे सुत जुळते हे कथेत दाखवले आहे. मुंबईतील ५०-६०च्या दशकातील पांढरपेश्या समाजातील, चाळीतील समाजजीवन कसे होते याचीदेखील झलक दिसते. लोणी आणि विस्तू ही कथा पण एका तरुण उफाड्याच्या स्त्रीचीच आहे. गावाकडून मुंबईत येवून राहत असलेली ही स्त्री, लिहिता वाचता न येणारी. पोस्टात जाऊन रघूकरवी पत्र लिहून घेत असते. राघू तिच्यावर भाळलेला आहे, झुरतो आहे. पण कथेचा शेवट असा अनपेक्षित होतो की ती स्त्री तीला आलेली पत्रे ज्या गिरणीतील मास्तराकरवी वाचून घेत असते, त्याची झाली असते हे त्या बिचाऱ्या रघूला समजते. एकूण ग्रामीण भाषायामुळे कथा वाचनीय होते. पंच्याण्णव पौंडाची मुलगी ही एका वयात येणाऱ्या मुलाच्या असफल स्त्री-आकर्षणाची कथा आहे. ही सुद्धा एका अनपेक्षित वळणावर येवून थांबते.

उतारावर ही कथा एका वय वाढत चाललेल्या गृहस्थाची, वामान्रावांची आहे. एके सकाळी पुण्यातील एका टेकडीवर फिरायला गेलेल्यावर त्यांना उपरती होते, जाणीव होते, की आपले तारुण्य संपले आहे, आणि आपल्या आयुष्याच्या उतारावर लागलो आहो. अनवाणी ही कथा थोडीशी वेगळी आहे. ती आहे एका लहान पायाने अधू असलेल्या मुलीची कथा. घरी टपाल टाकायला येणाऱ्या पोस्टमनच्या पायात वहणा नाहीत हे पाहून त्या संवेदनशील मुलीने त्याच्यासाठी वहणा देणे याचे वर्णन आहे. शाळातपासणी ही ग्रामीण धमाल विनोदी कथा आहे. ही मी पूर्वी त्यांची कथाकथन ही ध्वनीमुद्रिका ऐकली होती, त्यात होती. गावातील शिक्षणव्यवस्थेचे, अनास्थेचे, आणि गावातील लोकांचे बेरकीपण नेमके मांडले आहे.

तर असे हे जांभळाचे दिवस पुस्तक. बऱ्याच दिवसांनी व्यंकटेश माडगुळकरांचे पुस्तक वाचले. पूर्वी त्यांचे ऑस्ट्रेलिया भेतीवरील पांढरी मेंढरे हिरवी कुरणे वाचले होते, तेही खूप भावले होते.
Displaying 1 - 5 of 5 reviews

Can't find what you're looking for?

Get help and learn more about the design.