What do you think?
Rate this book


Audible Audio
First published January 1, 1967
" दृष्टी व प्रकृती यांच्या प्रतिकूलतेमुळे माझे किती तरी कादंबऱ्यांचे संकल्प मनातल्या मनात राहिले आहेत. दरिद्री माणसाच्या इच्छांप्रमाणे, संकल्पित लेखनाच्या चिंतनातला आनंद मला अनेकदा मिळतो. पण दृष्टी व प्रकृती यांच्या अखंड अवकृपेमुळे आणि वेळी-अवेळी माझ्याकडे येणाऱ्या नानाविध मंडळींच्या कृपेमुळे लेखनाची बैठक सहसा जमत नाही. काही केल्या मनातल्या कळीचे फूल होत नाही."
माई फारशी शिकलेली नाही. तिनं शेक्सपिअर वाचलेला नाही; पण तिच्यापाशी दुःख पचविण्याची शक्ती आहे. कारण देवावर तिची खरीखुरी श्रद्धा आहे. आक्का गेली, तेव्हा मिलिंदाला पोटाशी धरून ती दोनच शब्द बोलली, 'देवाची इच्छा!'
काळजाच्या फुटलेल्या धरणाला या दोन शब्दांनी बांध घातला तिनं! तिची ती श्रद्धा माझ्यापाशी नाही. त्यामुळं जिवाच्या आकान्ताच्या वेळी माणसाला आवश्यक असणाऱ्या श्रद्धेच्या आधाराला मी पारखी झाले आहे. ही माझी एकटीच्याच दुर्दैवाची कहाणी नाही! आमच्या पिढीचं दारुण दुःख आहे हे ! आमच्या मनातली रिकामी पडलेली देवाची जागा कशी भरून काढायची, हा आमच्यापुढला खरा प्रश्न आहे!
रात्रीच्या एकान्तात स्वाभाविक वाटणाऱ्या किती तरी गोष्टी दिवसा कृत्रिम वाटू लागतात.
मानवाचं मन केवळ भूतकाळाच्या साखळदंडांनी करकचून बांधून ठेवता येत नाही! त्याला भविष्याच्या गरुडपंखांचं वरदानही लाभलं आहे. एखादं स्वप्न पाहणं, ते फुलविणं, ते सत्यसृष्टीत उतरावं, म्हणून धडपडणं, त्या धडपडीतला आनंद लुटणं आणि दुर्दैवानं ते स्वप्न भंग पावलं, तरी त्याच्या तुकड्यांवरून रक्ताळलेल्या पायांनी दुसत्या स्वप्नामागनं धावणं, हा मानवी मनाचा धर्म आहे. मनुष्याच्या जीवनाला अर्थ येतो, तो यामुळं !
संकोच हा सत्याचा वैरी आहे.