ऑक्टोपस हे एक जलचर प्राण्याचं नाव आहे. त्याला आठ नांग्या असतात. या नांग्यानी तो आपले भक्ष्य पकडत असतो. याचं नाव सहेतुकपणे या कादंबरीला योजले आहे.
प्रसिद्ध लेखक श्री. ना. पेंडसे यांची चारू पंडीत, मीना मोडक, गुरुनाथ हिंदकेकर या प्रमुख व्यक्तिरेखा असलेली ही कादंबरी वाचनीय असून श्री. ना. पेंडसेंच्या उत्कृष्ट कादंबरीच्या यादीत मोलाची भर टाकणारी आहे.
श्री ना पेंडसेंचा जन्म ५ जानेवारी १९१3 मध्ये रत्नागिरी जिल्ह्य़ातील मुर्डी या गावी झाला. १९२४ मध्ये पेंडसे मुंबईला स्थायिक झाले ते कायमचे. वयाच्या ११ व्या वर्षांपर्यंत त्यांनी जो कोकण पाहिला होता, आपल्या मनात साठवला होता, त्यावर ते आयुष्यभर लिहीत राहिले. मग तो साकव असेल, व्याघ्रेश्वराचे देऊळ असेल, किंवा नारळी-पोफळीच्या बागा असतील. त्या त्यांच्या भावविश्वाचा अतूट भाग झालेल्या होत्या. श्री. ना. पेंडसेंना खाजगीत शिरूभाऊ म्हणत. खाजगीतील (कौटुंबिक) हे नाव त्यांच्या मित्रमंडळीत आणि पुढे लेखनाच्या क्षेत्रातही रूढ झाले. त्यांच्या नावाचा उल्लेख साहित्य प्रांतातही ‘पेंडसे’ असा होण्याऐवजी ‘शिरूभाऊ’ असाच होत होता, याची प्रचीती ‘श्री. ना. पेंडसे : लेखक आणि माणूस’ या त्यांच्या आत्मचरित्रातूनही येते.
परवाच ऑक्टोपस वाचायला घेतली आणि कादंबरीची पकड इतकी जबरदस्त आहे कि दोन दिवसात वाचून संपवली . कादंबरीच्या नावावरून समुद्राशी काहीतरी निगडित असेल असे वाटले पण जशी कादंबरी वाचायला घेतली तेव्हा समजले कि हा समुद्रा मधला नाही पण नात्या मधला ऑक्टोपस बद्दल आहे .
पेंडसे आपल्या समोर निवडक पात्रे उभी करतात पण त्यांच्या मधले शेवट पर्यंत राहतात फक्त
१.लालजी
लालजी हे एक आर्टिस्ट आहेत जे फोटोग्राफी करून आपला मतितार्थ चालवतात. त्यांना मंजू नावाची आणि नावापुरती एक बायको आहे . नावापुरती कारण कि त्यांचे सदर आयुष्यात कधीच पटले नाही . जशी कादंबरी पुढे पुढे जाते ह्या नात्या मधले कंगोरे उघडतात जातात आणि लालजी ह्यांचे खरे रूप समोर येते .
२. मंजू
आपल्याला पहिल्यांदा असे वाटते कि लालजी ह्यांच्या स्वभावाला मंजूच कारणीभूत आहे . पण तिचे खरे रूप जशे उलगडत जाते त्यांनी आपण अजूनच गोंधळात पडत जातो . शेवटी ती चांगली का वाईट हे ठरवणेच अवघड होऊन बसते आणि मला तरी फक्त शेवटी ती परिस्तिथिनुसार आपल्याला बदलणारी स्त्री वाटते.
३.मिनू
लालजी आणि मंजू ह्यांची मुलगी . पहिल्या पासून पुरुषांशी लगट करणारी आणि त्यांना खेळवणारी अशी तिची छबी दाखवली आहे . तिला नक्की आयुष्या मध्ये काय पाहिज़े आहे हेच माहित नाही तिला फक्त प्रवाह बरोबर जाणे माहित आहे आणि ती नुसती जात नाही पण वाहून जाते . तिच्या ह्या वागण्याशी लालजी आणि मंजू ह्यांचे नाते जवाबदार आहे असे वाटून जाते .
माझ्यासाठी तरी ह्या तीन प्रमुख व्यक्तिरेखा आहेत ज्यांच्या भवती कादंबरी पूर्ण गुंफलेली आहे . कादंबरी नक्कीच अप्रतिम आहे कारण वाचून झाल्यावर पण माझ्या डोक्यात सारखे तेच विचार चालू होते.
ऑक्टोपस मधला माझ्यासाठी लेसन म्हणजे तो भय्या सगळं नीट करायला येतो आणि स्वतः तोंडावर पडतो. ते पंडीत दांपत्य पण गुरूनाथची आणि आधी मिनीची मदत करायला जातात आणि फसतात. मिनी त्या गुरुनाथ आणि इतर पोरांना गुंतवून ठेवते कारण तिला त्या मामापासून एस्केप पाहिजे असावा. पण गुरूला सगळं प्रांजळ सांगते, त्यात गुरूला माहीत असतं की आपण कश्यात चाललोय, तर त्याने सावध पावलं टाकायला पाहिजे होते, खरंच डेस्परेट.
मिनी शेवटी आपण जसे आहोत ते ॲक्सेप्ट करते आणि भाऊमामासोबत लग्न करायचं म्हणते. बाकी नादाला न लावणे, होप्स न देणे वगैरे प्रोटेक्टिव गोष्टी आहेत, कोणीही बोलतंच त्या. तिची आणि त्या सगळ्या मोडक लोकांची दया येते खरं तर.
ती कोल्हा आणि विंचूची गोष्ट आठवली, ज्यात कोल्हा विंचूला डोक्यावर ठेवून पोहून नदी पार करतो. आधी विंचू बोललेला असतो की मी तुला मारणार नाही, तरीपण अर्ध्या वाटेत डंख मारतो आणि दोघे बुडून मरतात. स्वभाव शेवटी. पण ते जनावरं, माणसं असे वागले तर थोडं चुकल्यासारखं वाटतं.
Recommended to people who have peace of mind and want to be disturbed a little bit.