"रंग आणि अंतरंग" हा एक अनोखा कवितासंग्रह आहे. निसर्गसौंदर्य, प्रेम, मानवी अनुभूती व संवेदना, तत्त्वज्ञान असे विविध विषय या संग्रहात हाताळले आहेत. इंग्लिशमधे अनेक दिग्गजांनी लिहिलेल्या निवडक कविता घेऊन त्यांचे मराठी रूपांतर या संग्रहात पेश केले आहे. असे रूपांतर करताना मूळ कवितेचा मुख्य गाभा अबाधित ठेवला आहेच. शिवाय कवितेचे स्वरूप -- लांबी, रूंदी, मीटर वगैरे -- हेही टिकवायचा प्रयत्न कवीद्वयांनी केला आहे. वाचकाला भाषांतर न वाटता आपल्या मायमराठीतलीच कविता वाटावी अशी प्रामाणिक धडपडही त्यांनी केली आहे. वाचकाला या कविता कधी आनंद देतील, कधी विचारात पाडतील, तर कधी अंतर्मुख बनवतील.