संभ्रमाच्या सावल्या सत्य-असत्य, कल्पना-वास्तव, भ्रम आणि वास्तवाच्या सीमारेषेवर रेंगाळणाऱ्या गूढकथांचा संग्रह. वाचकांना अमूर्त जगात फिरवून आणतील. ह्या मनोविश्लेषणात्मक कथा आहेत. संभव-असंभवाच्या सीमारेषेवर रेंगाळणाऱ्या कथा वाचकांचं मनोरंजन तर करतीलच पण विचार करायला भाग पाडतील. शेवटी वेड आणि शहाणपण, शक्य आणि अशक्यातली सीमारेषा अगदी धूसर असते- संभ्रमाच्या सावल्या! अघटीत- गावात चेटकीण समजली जाणाऱ्या गिरीच्या आईनं आपला मृत मुलगा जिवंत व्हावा म्हणून अशोकचा बळी दिला. ही वदंता खरी होती का? त्याची प्रचिती कथानायकाला कधी व कशी आली? ओवाळणी- साखळी खुनाच्या आरोपात अटक झालेल्या मेहुण्याची,बहिणीला वचन दिल्याप्रमाणे, दिवाळीपूर्वी सुटका करतो.