सुनील दांडेकर या लेखकाचे नाव मराठी साहित्यजगात रहस्य आणि गूढ कथांसाठी प्रसिद्ध आहे. नाविन्यपूर्ण आणि वैविध्यपूर्ण विषय, रंगतदार मांडणी आणि काही वेळा अनपेक्षित शेवट यासाठी सुनील दांडेकर यांच्या कथा ओळखल्या जातात.
या संग्रहातील कथाही अशाच विविध विषयांना स्पर्श करतात. या भिन्न विषयांच्या गोष्टी बांधून ठेवणारे एक सुत्र म्हणजे प्रत्येक कथेत अनुभवाला येणारी चमत्कृती.
उत्तम रहस्यकथा वा गूढकथांमध्ये एकदा कथेची मूळ संकल्पना मान्य केली की त्या संकल्पनेशी संपूर्ण कथानक तर्कनिष्ठ असते. सुनील दांडेकर यांच्या लिखाणात अतिशय वेगळ्या कथाबीजांतील तर्कशुद्धता कायम सांभाळली जाते हा सुनील दांडेकर यांच्या कथांचा विशेष होय.