बिढार ही चांगदेव चातुष्ट मधील ही पहिली कादंबरी, अश्या एकूण चार आहेत, त्यातील हूल, झूल, जरीला अजून वाचायच्या आहेत.
बिढार हि मुळात नेमाडे यांच्या कोसला नंतर ची गोष्ट आहे, यात त्यांनी नापास झाल्या नंतर काय केलं, मग कसं MA केलं त्यानंतर लिहलेली कादंबरी, त्यात आलेल्या अडचणी, जगण्याची आशा सोडलेली, मग त्यातून चांगदेव कसा वाचतो आणि त्यातून त्याला जीवनाकडे पाहायची एक नवी, कात टाकलेली दृष्टी मिळालेली असते, मग पुढील आयुष्यातील संघर्ष करून त्यातून काढ्लेला मार्ग वगैरे आहे आणि त्याचवेळी मित्रमंडळी व त्यांचीही जीवन लढाई छान मांडली आहे.
साधारण, चार मित्र भेटल्यावरते कुठली भाषा वापरतात, तशीच भाषा वापरली आहे त्यामुळे कादंबरी जरा जास्त जवळची वाटते. चांगदेव वा त्याच्या कोणत्याही मित्राला पूर्ण कादंबरीत आदर्शवादी वगैरे दाखवण्याचा प्रयत्न अजिबात नाही, हे लोक सिगरेट-दारू पिणे, पैसे नसतील तर उपाशी झोपणे, पाव खाऊन दिवस काढणे, अस्वच्छ जागेत राहणारे लोक सगळंच फार वास्तव आहे. मित्रांमध्ये बसल्यावर एकमेकांच्या वडलांचा उल्लेख बाप, म्हातारा वगैरे करतात आणि आजही हि प्रथा अव्याहतपणे चालू आहे. म्हणजे माझ्या लहानपणी, आमच्या आप्पांचे(वडीलांचे ) मित्र मला 'तुझे आप्पा कुठ आहेत ?' असं न विचारता 'तुझं म्हातारं कुठाय ?' असं विचारायचे.
तसंच जाता जाता नेमाडे समाजाच्या उदासीनतेबद्दल बोलतात, रस्त्याच्या कडेला एक स्त्री पडलेली असते. तिचा कदाचित सामूहिक बलात्कार झालेला असतो आणि अजून दोन लोक तिला ‘वापरायला’ बघत असतात. ती बिचारी पाय घट्ट दाबून पडलेली असते. हे फार अस्वस्थ करतं.
बिढार कथा ...
चांगदेव पाटील हा एका गावाकडील संप्पन्न एकत्र कुटुंब पद्धतीत वाढलेला तरुण मुलगा पुढील शिक्षण घेण्यासाठी मुंबईत येतो. पण साधारण आयुष्यात भरपूर संकटे येत असतात तशी ती त्यालाही येतात पण यातून त्याला बाहेर कस पाडाव ते काही काळात नाही. आणि मग यातून येतं ते म्हणजे संताप, राग, भीती, न्युंनगंड अन नैराश्य!! त्यात कमी कि काय म्हणून कसलासा जडतो आणि मग तो जगायची आशाच सोडून देतो. त्यातून जन्मलेली जीवनाबद्द्दलची नकारात्मकता आणि निष्काळजीपणा वाढत जातो. त्यातच एकत्र कुटुंबातील वाद अन कटकटी, बापचं त्याच्या साठी, त्याच्या शिक्षणासाठी इकड-तिकड लबाडी करून पैसे मिळवतो त्याला वाटत असतं. यातून त्याची अस्वस्थ खूपच वाढत जाते.
त्याचे सर्व मित्रही जवळपास त्याच अवस्थेततून जात असतात. पण हे सारे मित्र हुशार असतात आणि प्रत्येकाला काहीतरी सिध्द्ध करायचं असतं. त्याचे मित्र सारंग, शंकर, नारायण, भैय्या, अप्पा, वगैरे अस्सल पात्रे आहेत. प्रत्येकाची स्वतंत्र विचारसरणी आहे, भूमिका आहेत, पण तरीही सगळे मित्र आहेत. अशा वेगवेगळ्या पातळ्यांवरची तरुण मंडळी एकत्र येऊन आयुष्यचा गाडा खडतर रस्त्यावरून अतिशय कष्टाने पण तितक्याच तिरकस-खट्याळ-मजेशीर पद्धतीने पुढे ढकलत असतात. हे लोक मग बरेच उदयोग करतात, मासिक, साप्ताहिक वगैरे सुरु करतात पण हवं तसं यश काही मिळत नाही. एकजण कादंबरी हि लिहितो पण त्याची प्रकाशकाकडुन कशी फसवणूक होते वगैरे.
आणि मग हळू हळू प्रत्येकजण कुठेतरी स्थिर होत जातो. चांगदेवहि प्राध्यपकाची नोकरी मिळवितो व मुंबईला रामराम करतो.
विजय सरवते
११-०७-२०२०