Sudha Murty was born in 1950 in Shiggaon in north Karnataka. She did her MTech in computer science, and is now the chairperson of the Infosys Foundation. A prolific writer in English and Kannada, she has written nine novels, four technical books, three travelogues, one collection of short stories, three collections of non-fiction pieces and two books for children.
Her books have been translated into all the major Indian languages and have sold over three lakh copies around the country. She was the recipient of the R.K. Narayan's Award for Literature and the Padma Shri in 2006.
A very good book to read...how one should think and react when you have everything...how selfish people are in and around inside your family makes your life tougher harder..so for being happier one should have cultivate the habit of giving more and more for the needful people without any expectations in return
सर्वप्रकारचं सुख, संपत्ती, साधन असुनही वेंकटेश सरळ-साधं आयुष्य जगत आहेत. या संपन्नतेतही आपली मुलभूत तत्त्वं, संस्कार, कुटुंबप्रेम, आपुलकी, सर्वग्राही विचार त्यांनी जपले आहेत.
नात्यांमधे व्यवहार आला की ते केवळ यांत्रिक राहतं. मग, नात्यांतली ओढ, ओलावा, जिव्हाळा सगळं तेवढ्यापुरतं उरतं. निरुपायानं का होईना, आपल्या बायको व मुलाची व्यवहारी वृत्ती, संपत्तीचा हव्यास, भावनाशून्यता त्यांनी स्वीकारली आहे. नाही म्हणायला त्यांची मुलगी, गौरी, मात्र त्यांना समजून घेणारी आहे हे समाधान आहे.
आपल्या नोकरीतील बदलीबाबत नाखुश वेंकटेशांचं आयुष्य हुबळीस आल्यावर अनपेक्षित वळण घेतं. हुबेहूब आपल्यासारख्याच दिसणाऱ्या “शंकर” मास्तरचं गुढ उकलताना वेंकटेशना नव्यानं कळलेली नाती, समज-गैरसमजातून झालेली नात्यातील गुंतागुंत एक भलंमोठं कोडंच त्यांच्या पुढ्यात आणुन ठेवतात. वेंकटेश ते कोडं कसं सोडवतात? स्वतःच्या पुर्वायुष्यात त्यांना डोकवायला लावणारे, शंकर व भागव्वा नक्की कोण असतात? त्यांचं वेंकटेशच्या आयुष्यात येणं, आपले मृत वडिल-माधवराव व आजी-चंपाक्काचा पुर्वेतिहास पडताळण्याविषयी काय संकेत देतं? गुंडक्का, हनुमंत या पात्रांचं प्रयोजन काय? याचा रीतसर उलगडा कादंबरीच्या उत्तरार्धात होतो.
अखेरच्या दिवसात वडिलांनी सत्य सांगायचा केलेला निष्फळ प्रयत्न वेंकटेशना आठवतो. पिंडाला कावळा न शिवल्यानं वडिलांची काही इच्छा अपुर्ण असावी असा कयास बांधुन ती पुर्ण करायचा निर्धार वेंकटेश करतात. सत्य समजल्यावर वेंकटेशनी दाखवलेली प्रगल्भता, वडिलांविरुद्ध मनात कसलाही आकस न ठेवता कर्तव्यबुद्धीनं त्याचा केलेला स्वीकार इथं विशेषत्वानं नमूद करावासा वाटतो. या सगळ्यांत गौरीची त्यांना मिळालेली दृढ साथही वाखाणण्याजोगी आहे. वडिलांचं ऋण फेडल्याचं समाधानच एकप्रकारे दोघं अनुभवतात.
पुस्तक वाचताना आधी सपाटीवरुन चालण्याचा अनुभव घेणारा वाचक काही पानांतच नव्या पात्रांची ओळख, नाती, त्यातील वाढता गुंता, रहस्य अशा वळणांवर भ्रमंती करत कधी आश्चर्य, कुतुहल, दुःख, कणव, चीड, कौतुक अशा परस्परविरोधी भावनांचा अनुभव घेत पुढे सरकतो.
मंदाकिनी कट्टी यांनी “ऋण” या मुळ कन्नड कादंबरीला साजेसं मराठी रुपांतर केलं आहे. मुळ कादंबरीत, कथेला असलेले संदर्भ अधिक संयुक्तिक वाटतात. उदाहरणार्थ, वेंकटेश पेशानं पुरातत्वशास्त्रज्ञ असणं, हे या रहस्यप्रधान कथेला अधिक पुरक वाटतं. एखाद्या बॅंक मॅनेजरपेक्षा, शास्त्रज्ञाची इतिहास पडताळून पाहायची सवय इथं वेंकटेशची व्यक्तिरेखा अधिक बळकट करते. २०१३ मध्ये प्रदर्शित झालेला अभिनेत्री तनुजा यांचा मराठी सिनेमा या कादंबरीवर आधारित होता.
सुधाताईंचं लेखन अगदी हलकं-फुलकं. इथल्या मातीतल्या संस्कृती-संस्कारांशी घट्ट नाळ जोडलेलं. अस्सल भारतीय विचार, मुल्यं अन् नीती-अनीतीचा बोध देणारं. महाश्वेता, डॅालर बहु, बकुळा सारखं कादंबरी लेखन, वाईज-अदरवाईज मधलं अनुभवकथन, थैलीभर गोष्टींसारख्या लोककथांचा संग्रह आणि बरंच काही, सुधाताईंचं लेखन कधीही वाचकाचा विरस करत नाही. मेहता पब्लिशिंग हाऊसनं मराठी वाचकांसमोर आणलेली अवघी नव्वद पानांची ही रहस्यमय कादंबरी आपल्या समर्पक मुखपृष्ठासह सुधाताईंच्या लेखनाचा मुळ पिंडच आपल्यासमोर उलगडते.
A good, short read. It made me really sad for some reason.
The only thing I could observe was, the characters were forced into these boxes - the greedy, the good - the rich, the poor - the middle class man with a grey area in terms of greed and kindness was missing, so I couldn't really relate to most of the characters in here.
ಪ್ರತ್ಯಕ್ಷವಾಗಿ ಕಂಡರೂ ಪ್ರಮಾಣಿಸಿ ನೋಡು ಅನ್ನೋ ನೀತಿ ಹೇಳೋ ಕಥೆ. ಗುಂಡಕ್ಕ ಗಾಳಿ ಸುದ್ದಿ ನಂಬಿ ಚಂಪಕ್ಕನ ಕಿವಿ ಚುಚ್ಚಿ, ಭಾಗವ್ವನ ಜೀವನ ಹಾಳು ಮಾಡಿದ್ಲು. ಮಾಧವರಾಯ ಮಾಡಿದ ಪಾಪಕ್ಕೆ ಮಗ ವೆಂಕಟೇಶ ಮತ್ತು ಮೊಮ್ಮಗಳು ಪ್ರಾಯಶ್ಚಿತ್ತ ಮಾಡಿ ಕೊಂಡು ಹೇಗೆ ಋಣ ಮುಕ್ತರಾದ್ರು ಅನ್ನೋ ಕಥೆ. ಹುಬ್ಬಳ್ಳಿ ಭಾಷೆ ಚೆನ್ನಾಗಿ use ಆಗಿದೆ ..ಓದ್ತಾ ಹೋದ್ರೆ ಮುಗ್ದಿದ್ದೆ ಗೊತ್ತಾಗೊಲ್ಲ .
A very brief story of a man and his act indebtedness which he does owing to the mistakes done by his father. Crisp story telling by Sudha Murthy. North Karnataka dialect in between the book seems refreshing. One time read.
This entire review has been hidden because of spoilers.
A beautiful story which could have made into 5 star review (its 4.75 as per me), felt it needed a bit more closure (don't want to spill the beans on the story hence not mentioning my thoughts on the end).