G.N. Dandekar, (Devnagari: गो.नी. दांडेकर ) popoularly known as "Go.ni da" in marathi literature is one of the prominent writer of historical fictions & some real good biographical novels, Most of his books are also good travelogues including trekking data detailing almost minute information about the place & history associated with it.
He was honoured with a D.Litt degree by university of Pune.
शाळेत असताना, संत तुकाराम मराठीच्या पुस्तकातील अभंगांमधून भेटले होते. त्यांच्याविषयी कायम कुतूहल वाटत राहिले. एक म्हणजे संसार सांभाळत परमार्थ करणारे संत, त्यांची म्हणावी तर सोपी पण ओघवती, रसाळ भाषा, विषयांची अपरिमित व्याप्ती - एकीकडे ओतप्रोत भक्तिरसातील विठ्ठलाचे अभंग, तर दुसरीकडे “नाठाळाचे माथी हाणू काठी” असे रोखठोक भाष्य, कधी निसर्गावर प्रेम करायला शिकवणारे “ वृक्षवल्ली आम्हा सोयरे “, तर काही अगदी प्रापंचिक आणि मिश्किल, “आवा चालली पंढरपुरा, वेशीपासून आली घरा..”
अजून एक कुतूहल होते, त्यांची सहचारिणी आवली… नवऱ्याच्या विठ्ठलभक्तीने, त्याच्या अव्यवहारी स्वभावाने जेरीस आलेली, अत्यंत रोखठोक आणि व्यवहारी!
गोनीदांची स्मरणगाथा वाचताना तुकाराम महाराजांच्या अभंगांची व्याप्ती आणि खोली याची एक झलक समोर आली. त्यांनी काही वर्षे भंडार्याच्या डोंगरावर जाऊन जिथे तुकोबांनी गाथा लिहिली तिथे राहून गाथेचा अभ्यास केला, ते साडेचार हजार अभंग मुखोदगत केले. त्यामुळे त्यांना समजलेले तुकाराम बुवा जाणण्याची तीव्र उत्सुकता होती.
तसंच झालं, हे पुस्तक वाचताना अजून थोडे तुकाराम आपल्या हाती लागले असं काहीसं वाटतं. तुकारामांचे जीवन, त्यांचा मित्र संतु जगनाडे याच्या कथनातून आणि तुकारामबुवांच्या अभंगातून उलगडत जातं. त्यांचा हा मित्र इंद्रायणीच्या पल्याड राहणारा एका तेल्याचा मुलगा. तर तुकाराम एका सधन सावकारी करणाऱ्या वाण्याघरी जन्माला आले. अर्थात त्यांच्या मैत्रीआड हे सामाजिक, आर्थिक अंतर कधीही आले नाही. पूर्वापार चालत आलेली वारी, घरी असलेले विठ्ठलाचे देऊळ आणि विठ्ठलभक्ती ही परंपरा त्यांना वारशाने मिळाली होती.
व्यवहार सांभाळत परमार्थ साधण्याचं बाळकडूही त्यांना वारश्यानेच मिळालेलं. पण न भूतो न भविष्यती अशा भीषण दुष्काळात त्यांच्यात अंतर्बाह्य परिवर्तन होते. पहिली पत्नी आणि मुलाच्या वियोगाने व्याकुळ झालेले तुकोबा अन्न पाण्याचा त्याग करून डोंगरावरच्या एका घळीत एकांतवासात जातात. आणि त्याच दरम्यान तुकाराम महाराजांच्या संतत्वाचा पाया तेव्हा तिथे रचला जातो.
आपल्या मुखातून तो विठ्ठलच बोलतोय, जे आहे ते त्याच्या करवी होते आहे आणि आपण फक्त निमित्त मात्र हा भाव शेवटपर्यंत त्यांच्या मनी राहिला. नव्हे तो वाढतच गेला. मी माझं शरीर विठ्ठलाला उपलब्ध करून दिले ही इतकी समर्पणाची भावना त्यांच्या ठायी रुजली होती. रामभटशास्त्रींनी दिलेला कठोर निर्णय, मंबाजीने केलेला द्वेष किंवा शिवाजी राजांनी केलेला आदर सत्कार या सगळ्या प्रती कुठलाही वैयक्तिक राग लोभ न बाळगता निसंगपणे त्यांनी आपले जीवन विठ्ठला चरणी वाहिले होते. अखेर अवघ्या ४२ व्या वर्षी आता मी थकलो माझे येथील कार्य संपले त्यामुळे आता परमेश्वर मला बोलवत आहे असं म्हणतच वाऱ्याच्या झंजावाताबरोबर ते उंच उंच जात आकाशाएवढे झाले.
अत्यंत रसाळ ओघवती तुकाराम कालीन भाषा, चित्रदर्शी वर्णने यामुळे वाचताना वाचक थेट त्या काळातच पोहोचतो. आधी मोगरा फुलला आणि आता तुका आकाशाएवढा दोन्हीकडे हे गोनीदांचं लिखाणवैशिष्ट्य जाणवलं.
पुस्तक संपते, पण आपल्या मनात मात्र रेंगाळत राहते.पुस्तक वाचल्यावर आपल्यालाही आत कुठेतरी जाणवतं ‘तुका आकाशाएवढा’
I heard about Shri G.N. Dandekar writing and book on an All India Radio Mumbai programme. Out of sheer curious it’s I ordered this book and before I knew it I was totally absorbed by it. The book beautifully brings to life Tukaram Maharaj’s charitra and his abhangs.