Jump to ratings and reviews
Rate this book

वपुर्वाई [Vapurvai]

Rate this book
"I care more for the shadow a tree casts on us. It is true that if we cut the tree, we will gain a lot of money by selling the wood, but we will be benefitted more by its shadows for generations to come. It is many times valuable than the money we might get from one time sell of the wood.` "Vapurvai` this title is based on the Marathi word Apurvai, which means novel, or something unprecedented. Va Pu proves true to it. All his stories attract the readers with their simplicity; there is not just one quality of his writing which captivates a mind. It is a combination of many good things under one roof, or on one page. He captures the beauty of all the incidents in his superb style. He reveals the secrets of the routines. He finds the very uniqueness in every character, under every or any circumstances. Life is full of different phases; those of sorrow, happiness, struggle, brooding, and many more. Va Pu handles them all with equal capacity revealing the beauty for us, and conquering our minds once again; as always.

Unknown Binding

3 people are currently reading
64 people want to read

About the author

V.P. Kale

61 books407 followers
Vasant Purushottam Kale, popularly known as Va Pu, was Marathi writer who wrote short stories, novels, and biographical sketches.He authored more than 60 books. His well-known books include Partner, Vapurza, Hi Waat Ekatichi, and Thikri.

Ratings & Reviews

What do you think?
Rate this book

Friends & Following

Create a free account to discover what your friends think of this book!

Community Reviews

5 stars
25 (45%)
4 stars
21 (38%)
3 stars
8 (14%)
2 stars
1 (1%)
1 star
0 (0%)
Displaying 1 - 6 of 6 reviews
Profile Image for Vikram Choudhari.
53 reviews13 followers
May 31, 2018
वपूर्वाई.. खरंतर वाचकांसाठी अपूर्वाईच..

रोजच्या जीवनात जी साधी माणसं आपल्याला भेटतात त्यांच्यातील असामान्यत्व, त्यांच्या जीवनातील संघर्ष , त्यांच्या विचारांच्या वेगवेगळ्या छटा वपु आपल्या कथेत नेमकी पकडतात..

प्रत्येक कथेतून ज्या गोष्टी आपण "granted" घेतो त्याचा गोष्टी कश्या आपल्या व्यक्तिमत्वाला रूप देतात ह्याची जाणीव थक्क करते. वपूच्या शब्दांमध्ये सांगायचं झाल तर " दुसऱ्या माणसांशी युद्ध करायला जास्त बळ लागत नाही. स्वतःशी सामना करणं भयानक कठीण. आणि स्वतःच्या माणसांजवळ पराभव मान्य करणं त्यापेक्षा कठीण."

वपु म्हणतात "कधी कधी वाटत, सगळं आकलन होणं अशक्यच आहे, पण आपल्या अज्ञानाची व्याप्ती किती आहे हे तरी केंव्हातरी समजावं."

हसरे दुःख, नॉट सो स्ट्रेज, ठिणगी ह्या कथा अंतर्मुख करण्याऱ्या आहेत.. अप्रतिम कथासंग्रह..
Profile Image for The Bibliophile Doctor.
833 reviews285 followers
February 27, 2023
श्रेष्ठ कथाकथनकार’ म्हणून वपुंची असलेली ओळख ही त्यांची अनेक मनोरम वैशिष्ठ्ये सिध्द करते. मनाची पकड घेणारी कथा लिहणारे लेखक, कथेतील पात्रे जीवंत करणारे, श्रोत्यांना गुंतवून ठेवणारे कथनकार आणि या सर्वांमागे सूप्तपणे उभे असलेले डोळस रसिक तत्वचिंतक!
प्रत्येक कथेतून वपु वाचकांना भेटत असतात. एकाच वेळी अनेकांना अंतर्मुख करणारी, बहिर्मुखातून अंतर्मुखता देणारी; लोकरंजनातून वैचारिकतेकडे झुकणारी अशी वपुंची कथा असते. ज्यांच्या कथेतून अनोख्या प्रतिमांमधून सतत माणूसपणाचा उद्घोष असतो. वेगवेगळ्या परिस्थितीत सापडलेली, संघर्ष करणारी, हसणारी, रडणारी, कुढणारी सर्वसामान्य माणसं आणि त्यांच्यातली असामान्यत्वाची झलक वपुंनी नेमकी पकडलेली असते. आपल्या प्रसन्न, खुमासदार, मिश्किल शैलीतील -- आविष्कार कथा वाचनीय आणि श्रवणीयही करतो. वपुंच्या खास कथांची ही वपुर्वाई वाचकांना अपुर्वाईची ठरेल.
Profile Image for Vishakha Kulkarni.
19 reviews2 followers
Read
April 26, 2021
व पू म्हणतात माणसाला कोणतेतरी वेड असायला हवे. असे वेड जे त्याला झपाटून टाकेल... असे वेड जे त्याला शांत बसू देणार नाही... वाचनाच्या असाच वेडापायी हातात घेतलं व पूंच वपूर्वाई...... खरं तर वाचकांसाठी हि अपूर्वाईच!!

व पू काळे यांचे अनेक विचार नेहमीच वाचनात येतात. विचार करायला लावतात. आणि त्यामुळेच अनेक दिवसांपासून व पुंच एखादं पुस्तक वाचव असं मनात होतं. म्हणून हे पुस्तक हाती घेतलं आणि वाचायला सुरुवात केली. अगदी साधे शब्द, साधे अनुभव त्यांनी अत्यंत सुंदर भाषेत मांडले आहेत. अनेकदा आपल्या आजू बाजूच्या माणसांच्या हालचाली, त्यांचे हावभाव आपण गृहीत धरतो... ते ही फार विचार न करता.... पण पुढे त्या हालचालींमागे काही कारण असते हे आपल्याला जेव्हा लक्षात येते तेव्हा त्यामागील कारण खरंच आपल्याला अचंबित करणारे असते. आणि हेच व पुंनी आपल्या भाषेत मांडले आहे. बरं केवळ अनुभवच मांडले नाहीत तर प्रत्येक गोष्ट आपल्याला एक नवा विचार, एक नवी शिकवण देऊन जाते.

तसं पाहिलं तर अनेकदा आपण ज्या गोष्टी "taken for granted" घेत असतो त्या आपल्या स्वभावाला, व्यक्तिमत्त्वाला नवा पैलू देत असतो. तो पैलू कसा पडला जातो याची जाणीव करून देणारा एक उत्तम कथा संग्रह!

- विशाखा
Profile Image for Amruta Bhave.
466 reviews29 followers
December 29, 2024
Va Pu Kale NEVER fails to impress! What a man, what a writer!!!
Profile Image for Pradnya.
325 reviews106 followers
July 17, 2023
वपु पुस्तक वाचायचं म्हणून नव्हे तर माणसं वाचायची म्हणून वाचायचं. एवढ्याशा एका लघुकथेत थक्क करणारी पात्रं कशी साकारता येतात हे अविश्वसनीय आहे. मला पार्टनर नंतर वपुर्वाई आवडलं, बाकी ही आहेत पण हे म्हणजे वपुंच्या पात्रांमुळे अचंबित करणारं संकलन आहे.
वाचताना सारखं वाटतं राहिलं, आत्ता वपु असते तर त्यांनी काय हेरलं असतं? हरवलेल्या माणसांना आणि समाजाला आरसा दाखविणारा लेखक असा क्वचितच होतो.
1 review
February 22, 2021
अंतर्मनाचा वेध!

वाचता वाचता अंतर्मुख करणाऱ्या,एकदम मनाला भिडणाऱ्या आणि कोपरखळ्या मारत मनाच्या भाव-विश्वाचा शोध घेणाऱ्या व मनाच्या कंगोऱ्यावर झगझगीत प्रकाश टाकणाऱ्या कथा! व.पु. काळे म्हणजे दर्जेदार साहित्य!!👌
Displaying 1 - 6 of 6 reviews

Can't find what you're looking for?

Get help and learn more about the design.