भारतीय आणि खास करून मराठी माणसाला चुकीच्या समजुतींमध्ये भरकटवून टाकते हे पुस्तक.. जे कोणी हे पुस्तक वाचू इच्छितात त्यांना माझी नम्र विनंती आहे कि हे पुस्तक जरूर वाचा, परंतु त्यानंतर लगेच "महात्म्याची अखेर" हे जगन फडणीस लिखित पुस्तक आणि "नथुरामायण" हे य.दि.फडके यांनी लिहिलेलं पुस्तक आवर्जून वाचा आणि मग च आपले मत ठरवा.
हे पुस्तक गांधी वधाची दुसरी बाजू दाखवते आणि खरंच पाकिस्तानला इतके सारे रुपये देऊन ते कसे आपल्यावरच उलटले हे सर्वश्रुत आहे ... of course everyone has different views on each side
अप्रतिम....भारताचा खरा इतिहास जो सर्वांपासून लपवून ठेवण्यात आला तो यात उघड केला गेला आहे. राष्ट्रपित्याने एका विशिष्ट धर्मियांना दिलेली सूट आणि हिंदूंवर केलेला अन्याय यात स्पष्टपणे मांडलेला आहे. साहजिकच आपला इतिहास हा एका परिवाराला आणि एकाच धर्मियांना कायम खुश ठेवण्यासाठीच लिहिला गेला आहे. त्यामुळे यात उघड झालेले सत्य कोणालाही खर्या इतिहासाची जाणीव नसल्यामुळे सहजासहजी पचनी पडणार नाही हे काही कमेंट्स वरुन दिसतच आहे. लोकांना अजूनही एकाच परिवाराचे तळवे चाटायची सवय आहे. ती लवकर सुटणे कठीण आहे. असो ..
या पुस्तकात एकही वाक्य logically करेक्ट सापडेल तर शप्पथ. केवळ दोन्ही बाजूच्या बाजू माहिती हव्यात या साठी हे पुस्तक वाचले. पण कोणतीही Ideology नाही, Superficially हिंदू धर्माची ओळख यामुळे हे सर्व घडलं. जो धर्म ५००० वर्षांपासून टिकून आहे, मध्ययुगीन 'काळ्या' कालखंडात टिकला त्याला वाचवण्यासाठी कोणत्याही 'नथुराम'ची गरज नाही. Total Disappointment!