The volume will cover Raja Shivaji's life and times along with the strategic and administrative intelligence and excellence. It will also highlight his statesmanship and able generalship in crisp 1100 odd pages. Highlight of the volume will be Mehendale's hitherto unpublished coverage of these aspects from 1660 to 1680 for which elite Marathi and Indian readers have been waiting for a long. Such an authentic, researched biography in English has not been available for a long time after Sir Jadunath Sarkar's volume in 1919 (6 reprints) and Balkrishna's volume in 1932. The volume will have essential maps drawn with the most state-of-the-art methods, footnotes and bibliography. In this work he is ably assisted and subordinated (for editing, translation and content restructuring) by a professional, experienced team of Pune.
The book has aplenty merits, I'm listing only a few: 1. The author has conducted extensive research, reading and analysis of historical documents belonging to the Mughals, Adilshahi, Portuguese, English, Dutch and the Marathas. This provides a lot of insight and quite accurate view of Shivaji Maharaj and his era. This includes not only military and political aspects but also sheds light on the prevailing economical, social and religious conditions. 2. The take is quite neutral. This helps the readers to understand both the strengths and weaknesses of the then Swarajya. The language and tone is quite professional, thereby, the user is not clouded with emotions but a gains purely practical insights. This is true not just about Maharaj but also the other rulers, the saints and the society. 3. The impact of contemporary events on each other has been well highlighted - the Anglo-Dutch war in Europe brought to India, the Afghans invading the Mughals and it's advantage to Swarajya, the temporary ties between foes. This gives a holistic picture of the 17th century India 4. It's an excellent starting point for amateur Historians as the book explains the skills and attitude which are idiosyncrasies of a sensible Historian. The chapters of 'Spurious Farman' and 'Sir Jadunath Sarkar's Critique of Marathi' are precise and exciting chapters in terms of analytical approach to studying and understanding History 5. The book provides almost 200+ pages of references/bibliography for the readers who wish to dive further deeper in Maratha Empire's History
The book does have some limitations but it's unfair to highlight as one cannot expect everything from one book.
This is long read and I admit that I need to read it again, several times to paint a big picture of the 17th century India. Nevertheless, it's a must read for any person who wishes to get insights into the Maratha Confederacy, the downfall of Mughals and the rise of English.
प्रथमावृत्ती- जानेवारी १९९९. पुनर्मुद्रण- २००७ व २००८.
प्रकाशक - डायमंड पब्लिकेशन्स, पुणे.
पृष्ठ संख्या- भाग १ – १०८०. भाग २ – १३५०. एकूण - २४३०. ------
आज मी माझ्या ताकदीबाहेरचं वजन उचलण्याचा प्रयत्न करणार आहे... एक मामुली काजवा असणारा मी आज परमतेजस्वी अशा प्रत्यक्ष भास्कराची चिकित्सा करण्याचा घाट घालतोय.. वेगवेगळी शिवचरित्रे वाचून आनंद शोधणारा तुच्छ असा इतिहासप्रेमी मी, आज प्रत्यक्ष इतिहासकारांना दिशा दाखविणाऱ्या एका ऐतिहासिक ग्रंथराजाची परीक्षा करण्याचा प्रयत्न करणार आहे. या प्रयत्नामध्ये माझ्याकडून काही आगळीक घडल्यास मी आदरणीय मेहेंदळे सर, सर्व शिवचरित्रप्रेमी वाचक आणि इतर वाचकांची अगोदरच क्षमा मागतो आणि माझा अनुभव इथे आपणा समोर मांडण्यास सुरुवात करतो.
बर्यापैकी शिवचरित्रे वाचून झाल्यानंतर आणि शिवचरित्राची एक रूपरेषा मनात तयार केल्यानंतर मी या संदर्भग्रंथाकडे वळलो. या ग्रंथाला मी केवळ एक ‘ऐतिहासिक संदर्भग्रंथ’ नाही म्हणणार.. तर मी त्याला ‘ऐतिहासिक ग्रंथराज’ अशी उपमा देईन.. याचं कारण हे आहे कि मी हा पहिलाच ग्रंथ असा बघितलाय ज्यामध्ये मूळ चरित्रलेखनापेक्षा संदर्भांना जास्त जागा दिली गेलीय. प्रत्येक पानावर मुख्य लेखनाखाली तळटीपा दिल्या गेल्या आहेत, ज्या काही काही पानांवर तर इतक्या जास्त आहेत कि मुख्य लेखन केवळ एक ओळीचं आणि बाकी पूर्ण पान भरून तळटीपा आहेत. याचा अर्थ असा नाही कि तुम्हांला हे शिवचरित्र वाचताना एक प्रकारचा रुक्षपणा जाणवेल किंवा कंटाळा येईल. ज्यांना तळटीपा किंवा संदर्भ वाचण्यामध्ये रस नसेल त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करून केवळ मुख्य लेखन वाचलं तरी चालतं. मी मात्र वाचताना यातील तळटीपा बर्यापैकी सगळ्या वाचल्या आणि शक्य असेल तिथे त्यामध्ये दिलेले संदर्भ शोधून ते देखील वाचण्याचा प्रयत्न केलाय.
आता मी वळेन यामध्ये लिहिल्या गेलेल्या प्रकरणांकडे.
यातील भाग १ जो आहे, त्यामध्ये शिवचरित्राची संदर्भ- साधने, शिवकालीन भारताची ओळख, शाहजी राजांचे कार्य-कर्तुत्व, शिवाजी राजांच्या कर्तुत्वाचा आरंभ, जावळीवरील स्वारी आणि अफझल खानाचा वध हि प्रकरणे आहेत. परंतु त्यावर बोलण्याअगोदर मी प्रस्तावनेविषयी जरा बोलेन. मेहेंदळे यांनी प्रस्तावनेमध्ये पहिलंच वाक्य लिहिलंय..”प्रस्तुत शिवचरित्रात मी छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा उल्लेख एकेरी म्हणजे नुसता शिवाजी असा केला आहे...” आणि याची कारणे देताना त्यांनी खूप सुंदर असं भाष्य केलंय. ते म्हणतात, “हे शिवचरित्र मी इतिहास संशोधनाच्या दृष्टीकोनातून लिहिलं आहे. असे चरित्र लिहिताना लेखकाने भाविक राहू नये, शक्य तेवढ्या तटस्थ वृत्तीने ते लिहावं. किंबहुना चरित्र नायकाविषयी त्याला जितका आदर असेल, तितकीच तटस्थता टिकविण्याची काळजी त्याने घेतली पाहिजे.नाहीतर चारीत्रामधील ऐतिहासिकता कधी लोप पावेल आणि त्याला कथा-कादंबरीचे रूप येईल हे त्याला देखील कळणार नाही. तरीसुद्धा अशा एकेरी उल्लेखाने कोणाचे मन दुखावले असल्यास मी त्यांची क्षमा मागतो ..” मी इतिहास संशोधक नाही. केवळ एक इतिहासप्रेमी आहे. त्यामुळे माझ्याकडून शिवरायांचा उल्लेख कधीही एकेरी होणार नाही. परंतु प्रस्तुत शिवचरित्र वाचून झाल्यानंतर जेंव्हा मी हि प्रस्तावना परत एकदा वाचली, मला मेहेंदळे सरांच्या बद्दल आदरच वाटला. खूप निरपेक्ष आणि तटस्थ वृत्तीने त्यांनी हे शिवचरित्र लिहिलेलं आहे. शिवचरित्राच्या साधनांची ओळख करून देताना त्यांनी समकालीन व उत्तरकालीन अशा मराठी, संस्कृत, फार्सी, तसेच युरोपियन भाषांमधील साधनांविषयी सुरेख आणि विस्तृत्वाने लिहिलं आहे. शिवकालीन भारत या प्रकरणामध्ये त्यांनी मुघल, आदिलशाही, निजामशाही तसेच इंग्रज, पोर्तुगीज आणि इतर युरोपिअन वसाहतवादी सत्तांविषयी विश्लेषाने माहिती दिली आहे. त्यांचा राज्य कारभार, त्यांची लष्करी व्यवस्था, त्यांच्या न्याय-अन्यायी कारभाराची माहिती मेहेंदळे सरांनी इथे करून दिली आहे. या काळात महाराष्ट्रातील गावांचा कारभार कसा चालत होता, तेथील महसूल अथवा न्यायदान पद्धत कशी होती, या व इतर बर्याच गोष्टींचा उहापोह देखील केला आहे. शाहजी या प्रकरणामध्ये शाहजी राजांची जडणघडण आणि त्यांचे वेगवेगळ्या मुसलमान शाह्यांमधील कार्य-कर्तुत्व याची विस्तृत्वाने माहिती दिली आहे.या मधून आपणास शिवजन्माअगोदरची पार्श्वभूमी कळून येते. ‘शिवाजीच्या कर्तुत्वाचा आरंभ’ यामधून शिवरायांच्या जन्मापासून ते जावळीवरील स्वारीपर्यंतच्या स्वराज्य उभारणीच्या कार्याची माहिती व चिकित्सा आहे. आणि त्यानंतर येतो ‘अफझलखानाचा वध’.
मला आश्यर्याचा धक्का बसला जेंव्हा मी भाग २ बघितला. माझी अपेक्षा होती कि यामध्ये अफझल वधापासूनच्या पुढच्या शिवचरित्राची माहिती असेल. परंतु नाही. भाग २ हा पूर्णपणे परिशिष्टांनी भरला आहे. यामध्ये शिवचरित्राशी संबधित काही घटनाची माहिती आणि चिकित्सा केली गेलीय. उदा. शिवरायांची जन्मतारीख, लुखजी जाधवराव, पाच परगणे व बारा मावळ, विविध साधनांमधील अफझल वधाच्या हकीकती, अफझलखानाच्या बायकांची थडगी वैगेरे.. थोडक्यात काय, तर शिवरायांशी संबधित काही चर्चेच्या प्रकरणांवर उजेड टाकण्याचा प्रयत्न केला गेलाय. भाग २ वाचताना काही प्रकरणे मी वाचायची टाळली हे मी नमूद करेन कारण त्यामध्ये ऐतिहासिक कागदाचं खरं-खोटेपणा, बनावट फर्मान अथवा कागदाची चिकित्सा,कार्तझांचे नमुने हे असे मुद्दे व त्यावर चर्चा होती जी वाचताना मला जड जात होती.
या ग्रंथराजाविषयी माझा अनुभव एका वाक्यात लिहायचा झाल्यास मी म्हणेन,
या शिवचरित्राने माझ्या कितीतरी जुन्या कल्पनांना छेद दिलाय. आणि संदर्भाने परिपूर्ण असल्याने मला ते संदर्भ पडताळून बघायची एक आवड देखील निर्माण झालीय. शिवरायांच्या शत्रुंविषयी इतकी विस्तृत माहिती एकाच ठिकाणी मला क्वचितच मिळाली आहे. नाही म्हणायला, ‘मराठ्यांची प्रशासकीय व्यवस्था’ आणि ‘मराठ्यांची लष्करी व्यवस्था’ हे सुरेंद्रनाथ सेन/ डॉ. सदाशिव शिवदे लिखित ग्रंथ वाचल्यानंतर शिवकालीन भारताची माहिती मला मिळाली होतीच. त्या माहितीचे पूर्णत्व या ग्रंथाने केले आहे. तसेच शाहजी राजे यांच्या कार्याविषयी विस्तृत माहिती आणि शिवरायांच्या सुरुवातीच्या जडणघडणविषयी काही अपरिचित माहिती देखील इथे मिळाली आहे.
आवडलेल्या मुद्द्यांवर बोलल्यानंतर आता मी वळेन मला खटकलेल्या मुद्द्यांकडे...
पहिला आणि महत्वाचा मुद्दा हा आहे या पुस्तकाचं नांवच मुळात चुकलं आहे. तुम्ही याला ‘भाग १ व २’ असं न म्हणता, ‘खंड १ भाग १ व खंड १ भाग २’ असं म्हणायला हवं होतं. कारण हे एक अपूर्ण शिव चरित्र आहे ज्याचे खंड २ व ३ (ज्याविषयी मेहेंदळे सर आपल्या तळटीपांमध्ये अधेमध्ये इशारे करत राहतात) आजअखेर प्रकाशितच झालेले नाहीत. मी ज्यावेळी हे दोन भाग विकत घेतले होते त्यावेळी मला माहीतच नव्हतं कि हे शिवचरित्र अपूर्ण आहे. अलीकडेच काही काळापूर्वी मेहेंदळे सरांनी इंग्लिश मध्ये शिवचरित्र लिहिलेलं आहे जे पूर्ण स्वरुपात आहे. मग त्यांनी मराठी शिवचरित्रच का अपूर्ण ठेवलंय? (इंग्रजी भाषेत लिहिलेलं चरित्र मी Kindle Unlimited मधून घेतलं आहे)
दुसरा मुद्दा हा थोडाफार पहिल्याशीच साधर्म्य राखतो. १९९९ साली प्रथम आवृत्ती निघाल्यानंतर पुन्हा या पुस्तकाची पुढची आणि सुधारित आवृत्ती निघालीच नाहीये. साहजिकच काही गोष्टी वाचताना हे प्रकर्षाने जाणवतं कि सुधारित आवृत्ती काढण्याची गरज आहे. उदा. ‘शिवरायांच्या जन्मतिथीचे परीक्षण’ या विषयावर मेहेंदळे सरांनी खूप विस्तृताने वैशाख आणि फाल्गुन या दोन तिथी तिथी तसेच या तिथींना पाठींबा देणाऱ्या व्यक्ती व इतिहास साधनांची चिकित्सा केली आहे. परंतु १९९९ साली महाराष्ट्र शासनाने ’१९ फेब्रुवारी’ हा शिवजयंतीदिन म्हणून स्वीकारल्यानंतर यावर काहीच लिहिलेलं नाहीये, कारण हि आवृत्ती त्याअगोदर निघाली असणार.
तिसरा मुद्दा हा पुस्तकाच्या बांधणी विषयी आहे. हा मोठा ग्रंथ असलेने दोन्ही भागांची बांधणी हि ‘hardcover’ पद्धतीची आहे. परंतु भाग २ वाचायला सुरु करतानाच त्याचा पुठ्ठा निघाला. कायम स्वरूपी संग्रही ठेवला जाणारा ग्रंथ या नात्याने याच्या बांधनीकडे प्रकाशकांनी विशेष लक्ष पुरविण्याची गरज आहे.
या ग्रंथाला सुरुवात करण्या अगोदर माझी अपेक्षा होती कि शिवचरित्राचे काही विवादित मुद्दे जे आहेत त्यांच्यावर इथे निरपेक्ष आणि विस्तृताने चर्चा असणार. अशाच काही मुद्द्यांविषयी मला या ग्रंथामध्ये लिहिलेली काही वाक्ये खटकली आहेत. त्यावर बोलतो आता.
‘दादोजी कोंडदेव’ हा एक असाच विवादित मुद्दा.. दादोजी कोंडदेव हे आदिलशाहीचे सुभेदार होते कि शाहजी राजांचे खाजगी मोकासेदार यावर लिहिताना मेहेंदळे सर म्हणतात, “दादोजी विषयी १६३३ च्या अगोदरील काहीच माहिती उपलब्ध नाही. १६३३ सालच्या एका पत्रात त्यांचा उल्लेख ‘हल्ली दादोजी कोंडदेव सुभेदार जाहले’ असा आहे.’ आणि त्यानंतरचा उल्लेख हा थेट १६३८ सालचा आहे. याचा अर्थ शाहजीराजे जेंव्हा निजामशाहीचा कारभार चालवीत होते, त्या काळातला एकही पुरावा नाही कि दादोजी हे शाह्जीराजांचे खाजगी नोकर होते. असं का? बरोबर याच काळतील पुरावे का मिळत नाहीत? मेहेंदळे सर लिहितात कि आदिलशाहीमध्ये जहागिरदारांना त्यांच्या जहागिरीमधील किल्ल्यांवर अधिकार नसायचा. त्यावर आदिलशाहने नेमलेले किल्लेदार अथवा सुभेदार असत. मग मला सांगा, १६३६ मध्ये मुघल आणि आदिलशहाने मिळून शाहजी राजांना हरविल्यानंतर शाहजी राजांना जेंव्हा आदिलशाही मध्ये नेमलं गेलं आणि त्यांना विजापूरच्या दक्षिणेकडे बंगलोरला पाठवील गेलं, तेंव्हा पुणे परिसरातल्या कोंडाणा किल्ल्यावर कोंडदेव या शाहजी राजांच्या माणसाला कसं नियुक्त केलं गेलं? पराभूत शाहजी राजांवर मुघल व आदिलशाहाला इतकं प्रेम अचानक कसं आलं? आणि शाहजीराजांच्या जहागिरीमधील दुसरा किल्ला, पुरंदर, इथे त्यावेळी नीलकंठराव हा किल्लेदार होता. मग तो किल्ला का नाही शाहजी राजे किंवा त्यांचा नोकर म्हणून दादोजींकडे दिला गेला? तिसरा मुद्दा हा कि, दादोजींनी कृष्णाजी बांदल या वतनदाराला जीवानिशी मारलं हा इतिहास असताना देखील कृष्णाजीच्या मुलाने, बाजी बांदलाने १६४८-४९ मध्ये, दादोजींच्या मृत्यूपश्यात, फतेह खानाविरुद्ध्च्या लढाईत शिवरायांच्या बाजूने अतुल्य पराक्रम का गाजविला?
जिजामातेविषयी लिहिताना मेहेंदळे सर म्हणतात कि जिजामाता या शिवरायांच्या स्वराज्यस्थापण्यामागची स्फुर्तीदेवता होत्या याला पुरावा नाही. याला कारण देताना ते म्हणतात कि जिजामातांनी राज्यकारभारामध्ये क्वचितच लक्ष घातलं आहे. मेहेंदळे सरांच्या या अनुमानाच्या मागील तर्कच मला कळाला नाहीये. जिजामाता या राज्य कारभार करत नव्हत्या म्हणून त्या शिवरायांना स्वराज्य स्थापन करण्यासाठी प्रेरणा देऊ शकत नाहीत? मग जर असं असेल तर शिवरायांना अशी प्रेरणा मिळाली कोठून? शिवराय हे एका मोठ्या जहागीरदाराचे पुत्र होते. काही न करता देखील ते ऐश आरामात जगू शकले असते. मग आयुष्यभर जीवावर उदार होऊन त्यांनी हे एतद्देशियांचे स्वराज्य का स्थापिले? कोण त्यांना या जीवघेण्या संकटांमध्ये जाण्यासाठी प्रेरित करत होतं? शिवरायांच्या बालपणीची १२ वर्षे बघितल्यानंतर अशी कोणती व्यक्ती दिसते जी त्यांना या कार्यासाठी स्फूर्ती देऊ शकते? आणि हे कोणतं लॉजिक कि आईला एखाद्या कामाचा अनुभव नाही म्हणून ती आपल्या मुलाला ते कार्य करायची प्रेरणा नाही देऊ शकत?
भाग १ पृष्ठ ५९४ इथे मेहेंदळे सर लिहितात कि शिवराय वयाच्या सात ते बाराव्या वर्षांपर्यंत कुठे राहत होते यावर नक्की माहिती पुराव्यांसहीत उपलब्ध नाहीये. पण मग ते भाग २ पृष्ठ ७०७ वर असे का म्हणतात कि शिवराय वयाच्या बाराव्या वर्षापर्यंत शाहजी राजांच्या समवेत राहत होते?
शिवाजी राजांच्या जन्मतिथी विषयीच्या मुद्द्यावर मी अधिक विश्लेशाने आणि अधिक अभ्यासाने पुढे एखादी पोस्ट टाकणारच आहे. परंतु इथे फक्त मी मेहेंदळे सरांच्या या विषयीच्या लिखाणाविषयी माझं मत व्यक्त करतो. सरांच्या दृष्टीने फाल्गुन तिथी म्हणजे १९ फेब्रुवारी १६३० हीच खरी शिवजन्मतिथी आहे. परंतु त्यांनी केलेले परीक्षण वाचताना मला खटकलेले काही मुद्दे मी इथे मांडेन. एक म्हणजे, शिवजन्मावेळी शाहजी राजे हे ना मुघलांकडे होते, ना आदिल शहाकडे आणि ना निजामाकडे असे मेहेंदळे सर म्हणतात. शाहजीराजे हे स्वतंत्रपणे त्यांच्या पुणे जहागिरीमध्ये होते असे त्यांचे मत आहे. म्हणजेच शाहजीराजे जिजामातेच्या जवळच असायला हवेत? मग इतिहास आणि तुम्ही स्वतः हे म्हणता कि शिवरायांच्या जन्मावेळी शाहजी राजे दर्याखानाविरुद्ध लढाईमध्ये गुंतले होते आणि जवळपास ६ महिन्यानंतर त्यांनी शिवरायांचे मुखावलोकन केलं.. मला काही कळेना झालंय या मागचं लॉजिक.. तुम्ही लिहिताय कि जाधवरावांचा म्हणजे शिवरायांच्या आजोबांचा खून हा शिवजन्माच्या अगोदर झालाय? आणि तुम्ही हे हि लिहिताय कि १६२८-२९ आणि १६३१-३२ चे दुष्काळ हे वेगवेगळे होते जेंव्हा इतिहास हे सांगतो कि तो दुष्काळ एकच होता नि तो खूप भयानक व पुष्कळ काळ टिकणारा होता. तुम्ही हे देखील लिहिता कि दर्याखानाबरोबर शाहजी राजे एकदा नव्हे तर दोनदा लढले होते. पण त्याला पुरावा न देता तुम्ही ‘हे असं घडलं असण्याची शक्यता आहे..” असे लिहून मोकळे होता. इतिहासाशी संबधित शक्यता पुसून त्या ठिकाणी पुराव्यासहित वस्तुस्थिती समजावी म्हणून आम्ही तुमच्याकडे येतोय सर... नवनवीन शक्यता जाणून घेण्यासाठी नाही... ------------------------------------------------------------------------------
शिवचरित्राशी संबधित एका श्रेष्ठ ग्रंथराजाविषयी आपला अनुभव लिहिताना लिखाण थोडं जास्त होणार हे माहीतच होतं. परंतु मला शक्य तेव्हढ्या कमी शब्दांमध्ये मला आलेला अनुभव इथे लिहिला आहे.
आपलं उभं आयुष्य शिवचरित्रासाठी खर्ची घालणाऱ्या मेहेंदळे सरांच्या पासंगालाही मी पुरत नाही याची मला जाणीव आहे. आणि म्हणूनच मी पुन्हा एकवार त्यांची ���ाफी मागतो. आणि तसंच, या पोस्टद्वारे मी मेहेंदळे सरांना विनंती करतो कि ‘श्री राजा शिवछत्रपती’ या मराठी शिवचरित्राचे उर्वरित खंड आपण लवकरात लवकर प्रकाशित करून माझ्या सारख्या असंख्य शिवचरित्रप्रेमींना उपकृत करावं......
- Separates clear objective facts from legends and extrapolations, while mentioning many of the latter. - Rich in footnotes. Clearly cites primary sources and explains the logic used in resolving seeming contradictions (if any). - Dates are provided as per Julian calendar as well wherever known. Where the precise date is not known, a broader time period (eg. a month) is given. - There is appropriate criticism of other historians (of various ages, including shivAjI's contemporaries). Tries to settle a few controversies (birth date, religious policy, aim, influence of holy men etc..). - Very clear assessment and analysis of shivAjI's policies, personality (appropriately well separated from basic facts).
छत्रपति शिवाजी महाराजांच्या इतिहासावर संशोधन करून पुराव्यांच्या कसोटीवर सिद्ध केलेले जे मोजके ग्रंथ उपलब्ध आहेत त्यापैकी मेहेंदळे सरांचे हे २ खंड नक्कीच अभ्यासकांना उपयोगी पडतील.
Extremely detailed and well written book. If you are not a history enthusiast but someone who likes historical fiction then this book may not be for you. But if you are keen to know what has happened based on historical artefacts then you must not miss this book.
Gajanan Bhaskar Mehendale is one of the greatest historians of all time.
Gajanan Bhaskar Mehendale’s Shivaji: His Life & Times is a work that refuses to take shortcuts with history. It feels less like a biography in the casual sense and more like a long, disciplined act of excavation.
Mehendale, who combines the instincts of a trial lawyer with the diligence of an archivist, spent decades assembling the picture from court chronicles, Portuguese records, English Company dispatches, Marathi bakhars, and Mughal documents—cross-checking each detail as if it were a sworn deposition.
The result is a Shivaji stripped of the fog of myth yet no less compelling. His tactical genius isn’t romanticised through vague heroics but demonstrated in concrete, logistical terms: the siting of forts, control of passes, rapid mobilisation, and the ability to sustain supply lines in hostile terrain. His diplomatic manoeuvres—alliances with local powers, calculated truces with the Mughals, and religious policies that preserved a plural support base—emerge here not as moral postures but as pragmatic decisions, calibrated for survival and expansion in the volatile Deccan.
The prose is dense but deliberate, a kind of judicial summation. Mehendale resists speculative reconstruction; where the record is silent, he refuses to fill in with imagined psychology.
It is a book that requires attention, but the payoff is a multi-dimensional, historically credible figure whose achievements are magnified precisely because they rest on verifiable ground.
And yet, this is only one lens in a shifting historiographical landscape. Set alongside Jadunath Sarkar’s early 20th-century Shivaji and His Times, the contrasts are telling. Sarkar’s Shivaji is framed within the idiom of an imperial-era historian—rigorously documented, yes, but filtered through the assumptions of his time.
His admiration for Shivaji’s military leadership is shadowed by a tendency to cast him in quasi-feudal, chivalric terms, and his interpretations are often shaped by the communal and colonial intellectual climate in which he wrote.
Sarkar’s work reads as both a scholarly monument and a product of its moment: a Maratha hero narrated for an audience still living under the British Raj, where imperial and nationalist frameworks were in constant tension.
James Laine’s Shivaji: Hindu King in Islamic India takes yet another tack, approaching the subject as an anthropological and literary problem. His Shivaji becomes a symbolic figure in the contest over identity—Hindu, king, warrior—interpreted through the stories and myths that grew around him. The result is provocative, but also speculative, and famously controversial in India for its willingness to question and reframe received narratives.
Where Mehendale mines archives for hard evidence and Sarkar works within the idiom of statecraft and military history, Laine is interested in the cultural and political uses of Shivaji’s memory itself.
Together, these three tell a story beyond their subject: the evolution of Shivaji’s image across political and academic contexts. Sarkar’s version emerges from the imperial-nationalist crossroads, elevating the warrior-king as a military genius and moral leader while reflecting the colonial gaze. Laine’s is a postcolonial intervention, unsettling nationalist certainties and reframing Shivaji as a contested cultural symbol.
Mehendale’s, by contrast, is a post-hagiographic, evidence-driven reconstruction that sidesteps ideological battles to focus on the verifiable man behind the myths.
In this triangulation, we see not just Shivaji’s life, but the shifting terrain of Indian historiography itself—each telling revealing as much about its author’s world as about the 17th-century Maratha who remains, centuries on, a figure claimed and reshaped by every age.