वर्णव्यवस्था ज्या पुरुषसुक्तामुळे दैवी आणि जन्माधारीत बनली तेच मुळात ऋग्वेदात कसे प्रक्षिप्त आहे हेही यात सिद्ध केले आहे. या पुस्तकात महारांचा गौरवशाली इतिहास सांगितला असुन महार शब्दाची नव्याने उपपत्ती मांडली असुन ती सर्वमान्य व्हावी अशीच आहे. याशिवाय सध्याच्या संक्रमणवस्थेमुळे निर्माण झालेला संभ्रम दुर सारत अर्थसत्ता, राजकीय सत्ता, सांस्क्रुतीक फेरआखणी आणि वैचारीक सत्तेची महत्ता यात मांडली आहे. सर्वच जातीसमुहांना उपयुक्त आणि मार्गदर्शक ठरेल असे हे पुस्तक आहे.
Sanjay Sonawani is famous author from Maharashtra, have penned over 79 books in Marathi. He is a social activist as well and has been promoting "One World: One Nation" concept for better tomorrow since last 10 years.
महार कसे निर्माण झाले? त्यांचे आजचे स्थान व समस्या असे अनेक मुद्दे सविस्तरपणे चर्चिले आहेत विशेष बाब ही की सर्व जातींच्या उगमाची मुळे वैदिक साहित्यापर्यंत कशी पोहोचली व पौरोहित्य करणार्यांनी सत्तेसाठी कसा त्याचा वापर केला याचे छान विश्लेषण लेखकाने केले आहे.