A SET OF 12 STORIES WOVEN TOGETHER TO OFFER US SOME KIND OF RELAXATION FROM THE DAILY HUBBUB AND CHAOS. DA MA, WITH HIS SENSITIVE MIND AND CLEAR VISION SUCCEEDS IN REVEALING THE SMALL BOUTS OF HAPPINESS AND CONTENT WRAPPED IN THE TINIEST MOMENTS WHICH WE OTHERWISE FAIL TO NOTICE. IT IS A FACT THAT EACH ONE HAS SUFFERS FROM SOME PROBLEM OR THE OTHER IN HIS OR HER LIFE. THERE ARE PEOPLE WHO JUST CANNOT COME OUT OF THE SOLACE CREATED BY THEMSELVES. ON THE OTHER HAND, A FEW HAVE SUCH ZEAL THAT THEY INDULGE THEMSELVES IN THE WONDERS OF LIFE INSTEAD OF NITPICKING. THOUGH A FEW, THEY HELP TO RELEASE THE TENSIONS IN THE SURROUNDINGS. TATYA, BHIKU, VITHOBA, MADHU AND MANY SUCH OTHER PEOPLE ARE SUCH FINE EXAMPLES HELPING US TO UNDERSTAND THE POSITIVE AND NEGATIVE ASPECTS OF LIFE THAT THEY ARE EXPERIENCING, MOSTLY AS A RESULT OF THEIR WAY TO LOOK AT LIFE. AFTER READING THIS ONE IS SURELY COMPELLED TO PONDER OVER LIFE AND JUDGE ONESELF AS TO HOW HE OR SHE WANTS TO LEAD HIS OR HER LIFE, WITH SMILES OR WITH COMPLAINTS…….?
Dattaram Maruti Mirasdar (Devanagari: दत्ताराम मारुती मिरासदार) (born 1927) is a Marathi writer and narrator principally of humorous stories. He hails from Pandharpur(Maharashtra).
Many of Mirasdar's humorous stories revolve around village life in Maharashtra. However, some of his stories concern the serious social issues and lives of the poor living in villages. His stories Gavat, Ranmanus, Kone Eke Kali, Bhavaki, Hubehub, and Sparsha belong to the latter class.
For some years, Shankar Patil, Vyankatesh Madgulkar, and Mirasdar jointly presented, in different towns in Maharashtra, highly popular public recitations of their short stories.
Mirasdar was a professor of Marathi in a college in Pune. He is currently the Acting President of Maharashtra Sahitya Parishad, Pune.
This collection of stories by Mirasdar does include some pieces with humour, but is more of an all round human experience in its scope and its literary 'rasa', as well.
It's unclear if Mirasdar wrote एका कुग्रामातील विजयस्तंभ, a piece of sarcasm, to express his opinion about history other than the official Macaulay-British-congress-left denial version, but if so he was not merely incorrect, he was grievously wrong.
'एक होता ब्राह्मण' is yet another piece that, however funny, is politically motivated in its intention, and it's unclear if Mirasdar was party to that sort of political thought or did it due to some pressure.
'गवत', too could be called political in its possible use, but it's far too real, ending with a pathos that stops short of going beyond heart wrenching. ***
विरंगुळा
" ... ‘‘माझं आपलं तत्त्व आहे, रावसाहेब. अशा वेळेला कधी नाही म्हणायचं नाही.’’"
"मग तात्यांनी आणखी भराभर माणसे पिटाळली. एकाला म्युनिसिपालिटीत पास काढायला पाठविले आणि येताना भटजीबुवांना निरोप सांगायची आठवण दिली. दुसऱ्याला बत्त्यांच्या दुकानात धाडले. सगळ्यांना अगदी तपशीलवार सूचना दिल्या. घरच्या माणसांची रात्री जेवायची व्यवस्था कुणी शेजाऱ्यापाजऱ्याने केली आहे किंवा नाही, याचीही त्यांनी खात्री करून घेतली. हे सगळे करीत असताना तात्यांचा आवाज इतका हुकमी आणि भारदस्त होता की त्याबाबत शंका घेणे कोणालाही रास्त वाटले नाही. सगळ्यांनी भराभर त्यांच्या आज्ञा मानल्या. कुणीही उलट प्रश्न केला नाही. असे का आणि तसे कशासाठी, हे प्रश्न विचारले नाहीत." ***
पाऊस
" ... विठोबा पुन्हा आबाच्या चेहऱ्याकडे पाहत गप्प बसून राहिला. मनाशी विचार करीत राहिला. जे काम योजून आपण आलो ते होईल की नाही? आबाकडे पैसे मिळतील का नाही?... आबा गावात व्याज-बट्टा करीत होता; पण जबर व्याज लावीत होता. जो-जो आबाकडून पैसे घेऊन गेला त्याचे भले झाले असे कधी ऐकिवात नव्हते; तो पुन्हा कधीच उबदारीला आला नव्हता. मग आपण तरी याच्याकडे का आलो आहोत? आपला खड्डा आपणहून का खणत आहोत? आजपर्यंत आपल्याला अनेक अडीअडचणी आल्या; पण त्या परस्पर आपण निभावल्याच की नाही? मग आत्ताच आपण या माणसाकडे कशासाठी येऊन बसलो आहोत? या माणसाची मदत न घेता आपली अडचण निभावली जाणार नाही का?" ***
तैलबुद्धी देवदत्त : एक अनुभव
" ... यौवन आणि धनसंपत्ती या दोन्ही गोष्टी त्याच्याजवळ होत्या; पण तरीसुद्धा तो अविचारी नव्हता. फार लहानपणापासून ग्रंथवाचनाची त्यास गोडी होती. त्यामुळे विलास आणि उपभोग यात वेळ घालविण्यापेक्षा वेडीवाकडी तोंडे करीत ग्रंथ वाचणे, हे त्याला प्रिय होते. आपण फार बुद्धिमान आहोत असे त्याने आश्रित मंडळींकडून बऱ्याच वेळा ऐकले होते. त्यामुळे खूप ज्ञान मिळवावे आणि पंडितपदवीप्रत पोचावे अशी महत्त्वाकांक्षा त्याला निर्माण झाली. एके दिवशी विचार करता करता त्यास अकस्मात असे सुचले की, आपण खूप परिक्रमा करावी. प्रवास करावा. नाना देशचे नाना लोक पाहावे, ठिकठिकाणच्या चालीरीती, आचारविचार, पद्धती यांची माहिती घ्यावी. म्हणजे आपण आपोआपच पंडित होऊन जाऊ. देशाटन केल्याने बहुविध विद्वानांशी मैत्री होते, सर्वत्र संचार होतो आणि एकंदरीत आपल्या मस्तकात ज्ञानाचा प्रचंड संचय होतो, असे त्याने जुन्या ग्रंथात वाचले होते." ***
भोग
"सकाळी आम्ही जागे झालो ते लोकांच्या आरडाओरडीनेच. भिकूच्या दुकानापाशी सगळा गाव जमा झाला. लगतच्या खोलीत तो झोपला होता आणि इकडे दुकानाची बखडीकडची पाठभिंत कोणीतरी फोडली होती. डेस्काचा कोयंडा वाकडा करून टाकला होता. आणि त्यातला जस्ताचा डबा तेवढा नाहीसा झाला होता. नाही म्हटले तरी दोन हजारांचा माल त्यात होता. भिकूची कित्येक दिवसांची, रात्रीची कमाई नि कष्ट त्यात होते. त्याचे सगळे नशीबच जणू त्यात होते आणि ते सगळे नष्ट झाले होते.
"लोकांनी रिकामी चौकशी केली, समाधानाचे चार पोकळ शब्द सांगितले आणि सकाळ टळली तसे ते आपापल्या उद्योगाला लागले... भ्रमलेल्या माणसासारखा भिकू एका जागीच गुंतून बसला. तोंड कसनुसं करून आणि दृष्टी कुठंतरी टाकून देऊन पडला. पोतेऱ्यासारखा, कुणीतरी चोळामोळा केल्यासारखा." ***
मोकळीक
"‘‘सखूला आन. तिच्या लेकराला लई बगावं वाटतं. तेवढं भेटव बाबा. म्हंजे मी मोकळी झाले. मग माजा प्राण सुखानं जाईल.’’" ***
धोंड्याचा महिना
"दहा वाजले की गुंड्यांचा वर्षाव सुरू होई. पहिल्यांदा उगीच कुठेकुठे गुंडे येत. पण आठ दिवसांच्या आतच धोंडे सगळीकडेच पडू लागले. माणसे घाबरली. अंथरुणे-पांघरुणे गुंडाळून आत पळाली. बाहेर कोणी झोपेनासे झाले. न जाणो, आला गुंडा भिरभिरत आणि बसला टकुऱ्यात तर?... तर काय? दुसऱ्या दिवशी पालखीच निघायची आपली. या विचाराने सगळे घरात पडू लागले. बाहेर कोणी फिरकेना." ***
अडगळीची खोली
" ... त्या खोलीतून एक साप बाहेर आला हे ऐकल्यावर माझ्या सगळ्या गमतीच्या कल्पना लोपल्या. माझे हे क्षणिक परंतु मोलाचे सुख हरपून गेले. अगदी रूक्ष, व्यापारी दृष्टीने मी तिकडे पाहू लागलो. ती एक अडगळीची खोली आहे, तिच्यात निरूपयोगी टाकाऊ सामान ठेवतात, किंबहुना त्यासाठीच ती असते, हे माझ्या लक्षात येऊ लागले आणि मग तो विषय मी विसरून गेलो." ***
वाटमारी
"उंच माळावर उजेडाचा क्षीण ठिपका दिसू लागला. तेव्हा बैजाने ओळखले की गाड्या चढ चढून माळाच्या चढणीवर आल्या. ‘म्हणजे अंदाजापेक्षा बऱ्या लवकर आल्या म्हणायच्या. बैल जोराने सुटले असले पाहिजेत. आता पुढे तर काय? ओढ्यापर्यंत पुन्हा उतारच होता. गाड्या आपोआपच झपाट्यानं सुटतील – म्हणजे दहा-पंधरा मिनिटांतच इथं येतील... जवळच आलं म्हनायचं. पुढं पाच मिनिटाचं काम. नायकानं खुणेची शीळ वाजविली की गाड्या वेढायच्या. भराभरा माणसं खाली उतरवायची. कुणी दंगामस्ती केलीच त्यातून तर त्याला बडवायचं, मग पटापटा जे असेल ते बाहेर निघतं. ते उचलायचं आणि ओढ्याच्या काठानं रानात सुटायचं... मग उद्याच्याला....’" ***
एका कुग्रामातील विजयस्तंभ
It's unclear if Mirasdar wrote this piece of sarcasm to express his opinion about history other than the official Macaulay-British-congress-left denial version, but if so he was not merely incorrect, he was grievously wrong.
"उज्जयिनीच्या पूर्वेस सुमारे पंधरा-वीस कोसांवर एक कुग्राम आहे. त्या ठिकाणी एक जीर्ण जयस्तंभ अद्यापही ताठ मान करून उभा आहे. ... "
"साध्या चर्मचक्षूंनी तुम्ही पाहाल तर हे दृश्य तुम्हाला असेच दिसेल. पण तुम्ही या जयस्तंभाच्या आणखी निकट गेलात तर त्याच्या पायथ्याशी खोदलेला एक शिलालेख तुमच्या दृष्टीस पडेल. दोन सहस्र वर्षांपूर्वीच्या या शिलालेखाचा अर्थ तुम्हाला कळणार नाही. पण जवळच लावलेला फलक तुमच्या दृष्टीत भरेल. तो तुम्ही वाचलात म्हणजे तुम्हाला कळेल की, हेच ते स्थल की ज्या ठिकाणी शेकडो अज्ञात मालववीरांनी आपल्या मायभूमीच्या स्वातंत्र्यासाठी हौतात्म्य पत्करले; शत्रूशी तुंबळ युद्ध करून आपल्या प्राणांचे बलिदान केले; नृशंसक आणि निर्घृण, अत्याचारी आणि अन्यायी यवनांना मारीत मारीत स्वत: मरण पत्करले. तेच हे पवित्र ठिकाण. तीच ही स्फुर्तिदायक भूमी. याच वीरांच्या स्मरणार्थ दोन सहस्र वर्षांपूर्वी हा जयस्तंभ उभारला गेला."
"ज्या काळची ही गोष्ट आम्ही सांगत आहोत, त्या वेळी उज्जयनीमध्ये महामंडलेश्वर चंडप्रतापी सम्राट भानुगुप्त राज्य करीत होता. ... "
It's equally unclear - except perhaps to those native to the region - whether such an ancient structure exists, in the first place, as described by Mirasdar. ***
आजारी पडण्याचा प्रयोग
"या सगळ्यांची औषधेही मोठी छान असायची. संत्री-मुसुंबी, सफरचंद, खडीसाखर, बेदाणे, पेढे, गोड औषधे यांचा मारा सारखा चाललेला असायचा. चार दिवस आजारी पडून अशक्तपणा आला म्हणजे शिराही रोज व्हायचा.
"हा सगळा प्रकार पाहून आपण आजारी नाही, या गोष्टीचे मला अत्यंत दु:ख होऊ लागले. ज्या वस्तू ही सगळी मंडळी आजारी म्हणून खात असत, त्या ‘औषध’ या नावाखाली मोडत असत. त्यामुळे त्यांना हात लावायची मला सक्त मना�� असे. ही औषधे आपणही त्यांच्या बरोबरीने घ्यावीत आणि त्यांच्या दु:खात सहभागी व्हावे, असे मला फार वाटू लागले. त्यासाठी मी खूप धडधड केली. ... "
"मग बरेच दिवस माझे डोके ठिकाणावर नव्हते. मी माझ्या दु:खात पार बुडून गेलो होतो. या जगात आपल्याला आजारी पडण्यातही कोणी मदत करू नये, या अन्यायाचे मला भयंकर आश्चर्य वाटत होते. जी गोष्ट आपल्याला पाहिजे ती एकदाही या जगात मिळू नये याचे फार दु:ख होत होते. त्यामुळे अन्नावरची तर माझी वासनाच उडाली. काही खावेसे वाटेना. दोन वेळचे जेवण आणि दोन्ही वेळचे मधले खाणे याशिवाय माझे सगळे खाणेपिणे सुटले. दु:खाने, चिंतेने जास्त काही घशाखाली उतरेना. मनात विचार करून मी वाळू लागलो, झुरू लागलो. सगळ्यांच्यावर उगीचच चिडू लागलो. कुणालाही वाटेल तसे बोलू लागलो." ***
एक होता ब्राह्मण
This is yet another piece that, however funny, is politically motivated in its intention, and it's unclear if Mirasdar was party to that sort of political thought or did it due to some pressure.
"‘‘पावली सोडून चालायचं नाही. हा निघालोच तिकडे जेवायला!’’" ***
गवत
This one, too, could be called political in its possible use, but it's far too real, ending with a pathos that stops short of going beyond heart wrenching.
"‘‘आता उद्याची भाकरी तरी आजच्याला द्या की. सकाळधरनं पोटात काय न्हाई.’’" *** ................................................................................................ ................................................................................................
I didn't know much about the nature of Indian villages back in 90's. Almost all of the stories in this collection are based in villages. I got to know the mindset of people, the atmosphere, the overall aura surrounding the village through this book. For example, nowadays, the minimum wage you'll have to give worker for doing some 5-6 hour work will be around ₹100. In those days, it used to be around 0.2₹!!