जेरूसलेम..'ज यू-ख्रिश्चन-मुस्लिम या तिन्ही समाजांना अत्यन्त श्रध्देय असणारं हे शहर गेली ५०-५५वर्षे सतत धुमसत राहिलं आहे.. इझ्रायलच्या स्थापनेपासून गडद होत गेलेला ज्यू-अरब संघर्ष आता अत्यंत स्फोटक अवस्थेला पोचला आहे.. त्या संघर्षाचा प्रसिध्द पत्रकार निळू दामले यांनी तेथील युध्दभूमीला प्रत्यक्ष भेट देऊन घेतलेला आढावा होय. सर्वसामान्यांना तो जटिल प्रश्न समजू शकेल अशा रीतीने केलेले माहितीपूर्ण, रोचक-रंचक वृत्तांत कथन आहे.