स्टीव्ह जॉब्जचे व्यक्तिमत्व, अॅपलची स्थापना, अॅपल2 संगणकाचे यश तसेच नंतर आलेले अपयश, जॉब्जची अॅपल मधूनच हकालपट्टी व परत प्रवेश, नंतर आयपॉड, आयफोन व आयपॅड ची निर्मिती आणि शेवटी जॉब्जचा कॅन्सर व मृत्यू, या सगळ्या गोष्टी या पुस्तकात अतिशय रंजकतेने मांडलेल्या आहेत. अच्युत गोडबोले यांचा अभ्यास आणि एखादी घटना मांडण्याची नेहमीची पद्धत या पुस्तकातही दिसते. पुस्तक अतिशय छान जमून आले असून माझ्याकडून पुस्तकाला 5 स्टार. संगणक क्षेत्रात रस असणारे तसेच उद्योजक व्हायंच स्वप्न असणारे आणि स्टीव्ह जॉब्ज व अॅपल बद्दल कुतूहल असणाऱ्यांनी जरूर वाचावे.