It would be an understatement to say that this is one of the better and popular play in Marathi, of all times.
The play explores the relationship between a Shivaji - A king as well as a father and his eldest son Sambhaji - the natural successor to the throne. The play tumbles through the relationships and the roles of these two great personalities, the misunderstandings that distance and time had caused between this father and sun duo. For good measure, the key character turns out to be the second son of Shivaji - Rajaram - the younger step-brother of Sambhaji.
Court intrigues and scheming for the succession struggle play an important part in this wonderfully crafted play. While a large part of the popularity of this play may have been due to the characters in the play, that's only the skin: the meat, bones, and the nerves of this play are in the exploration of the raw emotions and exchanges between a father-king and a prince-son (who have been estranged by distance and time) come to experience: partly because of the actions of the prince, more because of the schemes and the intrigues of the court.
The aphorisms and metaphors are a readers’ delight. The writing is pacy, even if you imagine the mighty Dr. Kashinath Ghanekar on stage delivering the performance, with his signature pauses and voice modulation. The event of the escape of Shivaji from Agra is used to perfection as a presentation of perspective; the text for each of the perspectives, of Shivaji and Sambhaji, are very compelling.
The language employed is Olde Marathi, if I can call it that; the medieval usage of certain words, which have now, unfortunately fallen out of favour, is enriching to the entire context of the play. For a person, who is not well versed in Marathi, it was relatively easy to read (with some help from my mother, who was referred to throughout the two days that I took to read the book.
छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित गोष्टी वाचायला मिळणं म्हणजे पर्वणीच!
“आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर” या चित्रपटातून या नाटकाबद्दल माहित झालं होतं. नाटकाचं शीर्षक कळल्यापासूनच वाचण्याची फार इच्छा होती. हे पुस्तक/नाटक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित असावं, असा ( कदाचित चित्रपटामुळे )माझा अंदाज होता. प्रत्यक्षात हे कथानक फक्त संभाजी महाराजांवर नसून शिवराय आणि शंभूराजे, या पिता-पुत्रांच्या नात्याला अधोरेखित करतं.
नाटक म्हटलं की, आपसूकच त्यातील संवादांकडे आपण ओढले जातो पण, त्यादृष्टीने यात लक्षवेधी संवाद फारसे सापडत नाहीत. कदाचित रंगभूमीवर सादर होत असताना संवादापेक्षाही संवादफेकीवर भर असावा. लेखकानं सांगितल्याप्रमाणे बदलत्या आवृत्त्यांनुसार यात काही बदल होत गेले, पण नेमका बदल कोणता असावा, हे कळत नाही. दुसऱ्या अंकातील पहिल्या प्रवेशातील विषय अर्धवट सोडल्यासारखा झाला आहे. नाण्याची जशी दुसरी बाजू असते, तशी शंभूराजांचीही बाजू असायला हवी होती, पण त्याबाबतची मांडणी अपुरी वाटते.
कुटुंबात वादविवाद होणं नवं नसलं, तरीही राज्यकर्त्यांच्या बाबतीत मात्र असा वादविवाद सत्तासंघर्ष आणि इतरही भलभलत्या चर्चेचा विषय होतो. पण शेवटी राज्यकर्तेही माणसंच असतात, हे वाचकाच्या मनात रुजवण्याचा लेखकानं पुरेपुर आणि यशस्वी प्रयत्न केला आहे. कधी रागामुळे, तर कधी आदरामुळे प्रत्यक्ष पित्याशी बोलू न शकणारे शंभूराजे येसूबाईंसमोर बिनदिक्कत व्यक्त होतात; तर, शंभूराजांना फारसं न बोलणारे शिवराय हंबीररावांसमोर व्यक्त होत वाचकाला भावनिक करतात. रामराजेंना संपूर्ण नाटकात फारसा वाव नसला, तरीही शेवटच्या प्रसंगात ही उणीव भरून निघते. हा प्रसंग वाचकाच्या डोळ्यात पाणी आणल्याशिवाय राहात नाही.
शिवराय-शंभूराजांच्या नात्याला केवळ राज्यकर्ते म्हणून न पाहता माणूस म्हणून पाहण्याचा लेखकाचा हा प्रयत्न नक्कीच वाचण्यासारखा आहे.
रंगभूमीवर सादर झालेल्या नाटकाबद्दल आणखी माहिती या लिंकमध्ये आहे:
छत्रपती समजावून घ्यायचे असेल तर नक्की वाचावे. वसंत कानेटकर लिखित छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यामधील अंतर्मुख करणारा संवाद. रयतेच्या राजाची आणि युवराजांची कुटुंबातील कलह सावरून घेण्यासाठी सुरू असलेली धडपड आणि या दोन्ही व्यक्तिमत्वांची थेट आणि परखड मते 'रायगडाला जेव्हा जाग येते', या वसंत कानेटकर लिखित अजरामर नाटकाने उलगडली.