What do you think?

मुक्काम शांतिनिकेतन [Mukkam Shantiniketan]
163 pages, Paperback
About the author
P.L. Deshpande
91 books1,079 followersपुरुषोत्तम लक्ष्मण [पु. ल.] देशपांडे हे लोकप्रिय मराठी लेखक, नाटककार, नट, कथाकार व पटकथाकार, दिग्दर्शक आणि संगीत दिग्दर्शक होते. त्यांना महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असे म्हटले जायचे. त्यांच्या आद्याक्षरांवरून महाराष्ट्रात ते प्रेमाने पु. ल. म्हणून ओळखले जातात. लेखक आणि कवी वामन मंगेश दुभाषी ऊर्फ ऋग्वेदी हे पु.ल.देशपांड्यांचे आजोबा होते तर आणि सतीश दुभाषी हे मामेभाऊ आहेत.
P. L. Deshpande was one of the legends in marathi literature. Probably the most read, most quoted and most loved author of maharashtra
The writings though mostly known for its sublime comic nature,include a vast range of plays,caricatures,essays, travelogues and much more
Lovingly called 'Pula' by all the fans.

Ratings & Reviews
Friends & Following
Create a free account to discover what your friends think of this book!
Community Reviews
Displaying 1 - 2 of 2 reviews
Read
February 13, 2022शान्ती निकेतन मधे पु ल देशपांडे यांची कोणत्या इटालियन तरुणाशी मैत्री होते plz answer एनी body
February 12, 2023
का वाचावे?
पू. ल. देशपांडे म्हटले की जास्त करून आपल्याला त्यांचं विनोदी लिखाणच अधिक आठवत. पण अशीही काही पुस्तकं आहेत ज्यात पू.लं. देशपांडेच्या साहित्यिक प्रतिभेची एक वेगळी, पण अतिशय प्रभावशाली झलक आपल्याला दिसते. मुक्काम शांतिनिकेतन हे त्यातलच 'न भूतो न भविष्यती' अस एक साहित्य. त्यांनी वयाची पन्नाशी उलटल्या नंतर, 1970 साली बंगाली भाषा शिकण्याचा ध्यास घेतला होता, हे त्यांच्या सगळ्याच चाहत्यांना माहीत असेल, असे नाही. त्यासाठी ते शांतिनिकेतनला गेले. ह्यामागे बंगाली भाषा आणि त्यातील काव्य ह्यांच्या ओढीचा पू. ल. देशपांडेंच्या आजोबांकडून त्यांना मिळालेला वारसा हे मुख्य कारण होते. कुठलीही भाषा शिकण्यासाठी ती तिच्या मूळ स्वरूपात जिथे बोलली जाते तिथून शिकावी अशी त्यांची धारणा होती. यासाठीच पू. ल. शांतिनिकेतनला जाऊन राहिले. तिथल्या सावतालपाडा सारख्या ग्रामीण भागातून बरेच हिंडले, कोलकाता सारख्या मोठ्या शहरांतही राहिले. आणि ह्या सगळ्याचे वर्णन त्यांनी आपल्या 'वंगचित्रे' ह्या पुस्तकातून केले.
परंतु नंतर जेव्हा ते उजळणीसाठी म्हणून पुन्हा बंगालला गेले तोपर्यंत तिथले राजकीय आणि सामाजिक वातावरण खूपच जास्त बदलले होते. राजकीय परिस्थिती उग्र झाल्यामुळे मोकळेपणाने त्यांना बंगालमध्ये फिरणे अवघड झाले आणि त्यांना शांतिनिकेतन मधेच ठाणबंद झाल्यासारखे राहावे लागले. शांतिनिकेतन मधल्या ह्या दिवसांत त्यांना शांतिनिकेतन अतिशय जवळून पाहता आले, अनुभवता आले. ह्या दिवसात घडणाऱ्या घटना, त्यांना भेटणारी माणसे आणि त्यांची भावविश्व हे त्यांनी त्यांच्या दैनंदिनी मधे मोकळेपणाने व्यक्त केले आहे. शांतिनिकेतन मधल्या रहिवासात त्यांना रवींद्र संगीत, रवींद्र साहित्य आणि रविंद्रनाथांबद्दल प्रेम आणि आदर असणारी अनेक माणसे ह्यांच्याशी परिचय झाला. या काळात रवींद्र साहित्यातील कित्येक उतारे, कविता, ह्यांचा स्वाध्याय त्यांनी चालू ठेवला आणि कित्येक उताऱ्यांची, कवितांची स्वैर भाषांतरेही लिहिली. तोपर्यंत पू. ल. नी बंगाली भाषेवर प्रभुत्व ही मिळवले होते. ह्यामध्ये काही सुखद, काही मनाला न पटणारे असे अनेक अनुभवही पू. ल. ना आले, तेही त्यांनी लिहिले. त्यातले काही कुठे वर्तमानपत्रे किंवा मासिकांतून प्रकशितही झाले.
अशाच काही प्रकाशित, अप्रकाशित आणि दैनंदिन रोजनिशी मधील उताऱ्यांचे आणि इतर काही स्वैर अनुवाद, टिपणे ह्यांचे संकलन करून मुक्काम शांतिनिकेतन हे पुस्तक आकाराला आले आहे. रविंद्रनाथ टागोर आणि बंगाली भाषा यांवरील पुलंचे प्रेम त्यांच्याच शब्दात माहिती करून घ्यायचे असेल, तर हे पुस्तक जरूर वाचावे, मात्र, त्याही पलीकडे जाऊन त्यांच्या लेखनातून प्रतिबिंबित झालेले शांतिनिकेतन एक वेगळीच दृष्टी देते. त्या मुक्कामात मनात उमटलेल्या भावना, विचार, घटना-व्यक्ती-स्थितीबद्दलची मते याबद्दल त्यांनी मोकळेपणाने लिहिले आहे. पुस्तकात टागोरांच्या कविता मराठीतून वाचण्याचा सुंदर अनुभव मिळतो.. पू. ल. देशपांडेंच्या प्रतिभेचा एक वेगळा पैलू अनुभवण्यासाठी हे पुस्तक एकदातरी नक्कीच वाचावे..
1/2
समीक्षण:
मुक्काम शांतिनिकेतन
लेखक: पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे.
पुस्तकाची सुरवात पू.लं. देशपांडेंच्या दैनंदिनीतील क्षण टीपणानी होते. बंगाल आणि तिथल्या माणसांचे आदरातिथ्य, आजूबाजूला असलेला हिरवागार निसर्ग, रेल्वे आणि तिची असंख्य स्टेशन्स आणि तिथले असंख्य प्रसंग आणि पू. लं.ची प्रसंग रेखटण्याची दैवी लेखन शैली वाचकाला कधी 1977 च्या बंगाल मधे घेऊन जाते हे कळतही नाही. खरतर आपणही आजच्या घडीत असून, पू.ल. त्या वेळेत शांतिनिकेतन मधे राहत असतानाचा, 1977 चा काळ जगून येतो. पू. लं.च रविंद्रसहित्यवरच प्रेम तर जगजाहीर आहे. यामुळेच शांतिनिकेतनला असताना रवींद्र साहित्याचा अभ्यास आणि वाचन पू.लं.च्या दैनंदिन जीवनाचा भाग झाले होते. त्यात बंगाल मधील पावसाळी वातावरण, सतत पडणारा पाऊस, विजेचे येणेजाणे, आणि ह्या सगळ्यासोबतच शांतिनिकेतन मधे संगीताचा अभ्यास करणारे विद्यार्थी ह्यांनी पू. लं.चा शांतिनिकेतन मधील मुक्काम अधिकच मनोरंजक केला होता. पहिल्या भागातील पू. लंच्या दैनंदिन जीवनाचे वर्णन वाचताना कधी आपण त्यात अडकून जातो कळतही नाही.. शांतिनिकेतन मध्ये पु.ल.ना भेटणारी माणसे, बंगाल मधील आदरातिथ्य आपल्या मनालाही आनंद देऊन जाते.
तसेच दुसऱ्या भागातील पू.लंची रविंद्रनाथांच्या पत्रांची भाषांतरे,कवितांचे स्वैर अनुवाद पू.लंची भाषेवरील पकड अलगद दाखवून जातात. रविंद्रनाथांचे प्रगल्भ पण तितकेच हळुवार मनाला भेदून जाणारे विचार मराठी भाषेत उतरवताना पू.लही तितकेच प्रभावी ठरले आहेत. त्या कविता, गाणी बंगालीत वाचताना, ऐकताना जितकी गोड वाटतील तितकीच मराठीत वाचताना ही गोड वाटतात. शेवटी पू.लनी रविंद्रनाथांच्या काही निवडक पत्रांचा केलेला अनुवाद वाचताना व्यक्ती म्हणून रविंद्रनाथानबद्दल चा आदर दुणावतोच, पण ती पत्र बंगाली मधे असूनही पू.लं.च्या उत्कृष्ट अनुवादामुळे 2 मराठी व्यक्तींमध्ये झालेला पत्रव्यवहार आहे असे वाटते. शेवटी शांतिनिकेतनच्या आठवणी, शांतिनिकेतन मधले अनुभव ह्यांची मेजवानी मिळत असतानाच पू. ल. पुस्तकाच्या उत्तरार्धात शिरताना एका अतिशय सुंदर अश्या प्रवास वर्णनाने वाचणाऱ्याच्या मनाचा आपल्या शब्दबाणानी अक्षरशः वेध घेतात. त्यांचा दादरपर्यंत पोचेपर्यंतचा सगळा प्रवास आपण त्यांच्या शेजारच्या सीटवर बसून अनुभवतोय असच वाटत राहतं. त्यांच्या अखंड प्रवासात त्यांनी जे जे म्हणून सुंदर वातावरण अनुभवल ते सगळ, त्यांना वाचताना आपणही अनुभवायला लागतो, आपल्याही नकळत. इतक्या वर्षांपूर्वीचा त्यांचा तो प्रवास आपलाच प्रवास आहे असं वाटायला लागत.
साहित्याची पूजा करणाऱ्यांसाठी पू.ल हेही 33 कोट देवांपैकी 1 देव आहेत ही गोष्ट हे पुस्तकं वाचताना आपण अगदी मनापासून मान्य करतो. पू.ल. प्रेमींनी अतिशय आवर्जून हे पुस्तक वाचावे आणि जरी तुम्ही पू.लं.च लिखाण जास्त वाचलं नसल तरीही ह्या पुस्तकाचं वाचन जरूर करावं.
2/2