Jump to ratings and reviews
Rate this book

Nivadak Narhar Kurundkar : Vyativedh

Rate this book

Paperback

First published July 15, 2013

58 people want to read

About the author

Narhar Kurundkar

35 books50 followers
Narhar Kurundkar (Marathi: नरहर कुरुंदकर) was a well-known thinker and critic in Maharashtra. Through his books in Marathi and through various lectures related to such varying disciplines as history, politics, dramaturgy, literary criticism, aesthetics, fine arts, he contributed to the cause of education and culture in Maharashtra. He offered original and unbiased incisive analysis of manifold challenges and complexities of contemporary social, political and cultural environment.

During his life time with lectures, writings and encouragement to young writers and poets Prof. Kurundkar instilled confidence within people of Marathwada. He provided thought leadership to various social and cultural activities. School of Art, schools of music, research center for history, Marathwada Vikas Andolan are some of the examples. Prof. Kurundkar had become synonym for the Socio-cultural movement of Marathawada. His untimely death had created a void in socio-cultural arena.

प्रा. कुरुंदकरांच्या लिखाणाची औपचारिक सुरवात १९५३ साली प्रतिष्ठान या मराठवाडा साहित्य परिषदेच्या मुखपत्रात समीक्षणात्मक लेख प्रसिद्ध होऊन झाली. त्यावेळी ते केवळ २१ वर्षाचे होते. त्यानंतर मराठवाडा दिवाळी अंकात शरदचंद्र चटर्जी यांच्या शेषप्रश्न या पुस्तकावर त्यांनी एक लेख लिहिला. पुढे नवभारत, सत्यकथा अशा प्रस्थापित मासिकांमध्ये विविध विषयावर लेख प्रकशित होऊ लागले.
रिचर्डसची कला मीमांसा हे पहिले पुस्तक १९६२ साली प्रकाशित झाले. देशमुख आणि कंपनी च्या रा. ज. देशमुख यांच्या आग्रहाखातर प्रा. कुरुंदकर यांनी एक २०० पानांचा समीक्षणात्मक लेखसंग्रह करून द्यायचे कबुल केले. तो पुढे रूपवेध या नावाने प्रसिद्ध झाला. या नंतरही प्रा. कुरुंदकर यांचे अनेक लेखसंग्रह प्रकाशित झाले. लेखसंग्रहाबद्दल एका पत्रात प्रा. कुरुंदकर लिहितात,
"लेख सुटे सुटे प्रकाशित होतात. त्या त्या वेळी पार्श्वभूमीसह संपूर्ण विषय मांडावा लागतो. अशा वेळी संग्रह केला की ग्रंथभर पुनरुक्ती होत राहते".
ही पुनरुक्ती टाळणे हे लेखकाचे कर्तव्य आहे असे ते मानत. मधल्या काळात झालेल्या अभ्यासाने मतांमध्ये ही बदल होतो.
"जे माझे मत चूक आहे, हे मला पटले व मी त्या मताचा त्याग केला", अशी त्यागलेली मते/ विचार लेख संग्रहात प्रकाशित करण्याची प्रा. कुरुंदकर यांची तयारी नव्हती. ग्रंथ रूपाने लेख संग्रह प्रकाशित करताना ते मोठ्या प्रमाणात फेर लिखाण करून, जेथे शक्य असेल तेथे पुनरुक्ती टाळून, चुका सुधारून घेत असत. आपल्या पुस्तकाबद्दल एका पत्रात ते लिहितात,
" माझ्या विवेचनाचे महत्व कदाचित कुणाला वाटणार नाही. माझी स्तुती होईल, विवेचनाची उपेक्षा होईल, मग माझ्या विवेचनाचे महत्व समजणारे वाचक निर्माण होईतो थांबणे भाग आहे."
ते पुढे लिहितात,
"पण, माझी इच्छा कठोर टीका होऊन सर्वांनी मला मुर्खात काढावे ही आहे. कारण त्यासाठी माझ्यापेक्षा खोलात उतरावे लागून मराठी समीक्षा अधिक सखोल करावी लागेल व तेच मला हवे आहे."

Ratings & Reviews

What do you think?
Rate this book

Friends & Following

Create a free account to discover what your friends think of this book!

Community Reviews

5 stars
12 (60%)
4 stars
8 (40%)
3 stars
0 (0%)
2 stars
0 (0%)
1 star
0 (0%)
Displaying 1 of 1 review
Profile Image for Nikhil Asawadekar.
53 reviews5 followers
November 7, 2023
शिवरात्र प्रमाणेच विचारांची उंची वाढविणारे पुस्तक! हा माणूस त्याची मतं आपल्या गळी न उतरवता आपल्याला आपली चौकट मोडून, क्षमता भेदून विचार करायला प्रवृत्त करतो 🙏
Socrates चा मृत्यू, पराभव: शिवाजीराजांचे, स्वा. सावरकर हे लेख तर उत्तमच परंतू ‘मी नास्तिक का झालो?’ हा लेखही सर्वांनी वाचावा असा आहे.
या पुस्तकाविषयी लिहिण्यासारखे खूप काही आहे. परंतु माझ्या सर्वात आवडीचा एक excerpt लिहीतो 👇🏽
“कुरूंदकर, तुम्ही बुद्धीची आणि विज्ञानाची मर्यादा कोणती मानता?”
कुरूंदकर - “बुद्धी आणि बुद्धिवाद, विज्ञान आणि विज्ञाननिष्ठा या साऱ्यांना माणुसकीच्या मर्यादा आहेत. माणुसकीची उंची आणि वैभव वाढविणे, हे बुद्धीचे आणि विज्ञानाचे काम आहे. ती घालविणे वा कमी करणे बुद्धीला वा विज्ञानाला जमणारे आहे. पण मी त्यांच्याकडून अशा अपेक्षा बाळगणार नाही. माणुसकीच्या नावावर माणसांनाच मारायला शिकवणारी तत्वज्ञाने कमी नाहीत; पण ती तत्वज्ञाने टिकणारी नाहीत.”
Displaying 1 of 1 review

Can't find what you're looking for?

Get help and learn more about the design.