Narayan Gopal Dharap ( August 27 , 1925 - August 18 , 2008 ; Pune , Maharashtra ) was a Marathi language writer, dramatist. It is mainly known for horror stories and mystery stories. The fictional character "Samarth" created by him and the mystery stories based on him became particularly popular.
मी नारायण धारप यांची पुस्तके लहानपणापासून वाचत आलो आहे. भयकथांची ओळख मला नारायण धारप यांकडूनच झाली. माझ्यासाठी भय-गूढ कथा याचा अर्थ नारायण धारप हेच आहेत. त्या नंतर जर कोणी असेल तर ते नक्कीच रत्नाकर मतकरी असतील. असो, 'दरवाजे' हा एक लघुकथा संग्रह आहे. ह्या मध्ये ४ लघु कथांचा समावेश होतो. ताईत, मध्यस्त , दरवाजे आणि चुकलेली वाट. पैकी मला दरवाजे हि लघुकथा त्यांनी लिहलेल्या सर्वोत्तम लघु कथांपैकी एक आहे असे मला वाटते.
जर तुम्ही नारायण धारप ह्याचे चाहते असाल तर नक्की आवडेल तुम्हाला, पण जर तुम्ही प्रथमच नारायण धारप हाथात घेत असाल तर हा लघु कथा संग्रह तुमच्या साठी नक्की नाही! कारण ह्या कथा संग्रह मध्ये त्यांची छाप तुम्हाला आढळणार नाही. प्रथमच हाती नारायण धारप घेत असाल तर ४४०, चंदनवाडी किंवा अनोळखी दिशा ह्या पैकी असावी असा मला वाटतं.
बारीकसारीक तपशिलांसह, वर्णनांतुन, डोळ्यांसमोर दृश्य जिवंत उभं करणाऱ्या, धारपांच्या भयकथेची भाषाशैली वाचकाला अलबत गुंतवुन ठेवते. नारायण धारपांच्या अनेक पुस्तकांतलं “दरवाजे” वाचायला घेतलं अन् नकळत त्या कथांनी मन-बुद्धीचा ताबा घ्यायला सुरुवात केली. सुरवातीपासुनच गुढाचा,अनामिक भयाचा स्पर्श असलेली उत्कंठावर्धक कथा, विस्तारताना, त्यातील व्यक्तिरेखा व त्यांच्या भावनांशी वाचकांची सहज भेट घालुन देते. त्या सहजतेनंच ती पुढं घडणाऱ्या अतर्क्य घटनांची एकलगोलग साखळीच तयार करत जाते. उत्सुकता, भय, हतबलता सारं एकाचवेळी अनुभवास येतं.
साकेत प्रकाशनाचा हा चार कथांचा शंभर पानी संग्रह सर्व आघाडीच्या संकेतस्थळांवर कागदी बांधणीत रास्त किंमतीत उपलब्ध आहेच, पण, ई-पुस्तक स्वरुपात अमेझॉन किंडलवरही वाचण्यासाठी ते विकत घेता येऊ शकते, हे मुद्दामहुन नमुद करावेसे वाटते.
पुस्तक वाचताना एखादी भीतिदायक दुरचित्र मालिका किंवा भयपट पाहिल्यासारखं वाटतं. पानागणिक गडद होत जाणारं, अज्ञातातुन निर्माण झालेलं रहस्य, हिडीस शक्तींचा आवळत जाणारा विळखा अन् त्यात आपसुक सापडत जाणारी कथेतील पात्रं मनाचा थरकाप उडवतात, श्वास रोखून धरायला लावतात.
“दरवाजे” मधील प्रो. देशमुखांच्या मनात शिरलेली दरवाज्यांविषयीची धास्ती व ते उघडल्यावर येणारे विचित्र, भयचकित करणारं अनुभव-वर्णन वाचुन अंगभर शहारे येतात. नियतीच्या कारभारात हस्तक्षेप केल्यावर “ताईत” मध्ये सखाराम, रखमा व शिवाच्या लहानग्या त्रिकोणी कुटुंबाला भोगाव्या लागणाऱ्या अनपेक्षित शिक्षेचं वाचुन मन दुखावतं. “चुकलेली वाट” चा सांधे नसलेला, गोल-गरगरीत चरबीचा, खरखरीत कातडीचा मांसल गोळा शेवटी पोटात भीतीचा गोळा आणतोच. आपल्या मुलीच्या मृत्युला कारणीभुत ठरल्याची अपराधी भावना उमाबाईंच्या मनातून आपसुकच गळून पडते व लहानपणीच मातृप्रेमास पारख्या झालेल्या शकीला, तिच्या मृत्युपश्चात, मिलिंदच्या “मध्यस्थी”नं आपल्या आईशी, उमाबाईंशी, प्रेमाचं नातं जोडल्याचं समाधान मिळतं. मला आवडलेली, भीतीचा सौम्य झटका देणारी “मध्यस्थ” मला इतर तीन कथांपेक्षा वेगळी वाटते.
धारपांची इतर पुस्तकंही यानंतर वाचनांत आली, आणि आवडलीही. पण, माझ्या वाचनात आलेल्या या पहिल्या पुस्तकानं मला त्यांच्या साहित्यातील रहस्यमयी जगताचे “दरवाजे” खुले केले व एका वेगळ्याच वाचनानुभवाशी अवगत केले, एवढंच मी म्हणेन.
The good thing about dharap's books are they can create scene in a moment. I have read so many of his books . I found dharap's ability to create a scenario and make people feel mysterrous and thrill them , make them frightened is appreciable. However, The way he ends the stories left me felt that he ended it hurriedly. when compared to ratnakar matkari's books, matkari is much ahead of him,I like matkari's books more than dharap's. But both are entertaining (although Matkari's are fantastic.)