All good to excellent stories, the collection alternates between humour and various other shades of emotions evoked in reading.
Someone like Mirasdar, who can and most often does make one explode with unexpected laughter as he does in the very first story, 'माझ्या बापाची पेंड', next going on to writing something like 'भावकी' is so unexpected, it makes one wonder.
Does everyone with such capabilities for humour, before acquiring such capabilities, necessarily have seen such horrors in life, experienced such cruelty, such pathos, before a spirit can grow to find it in oneself to give such laughter to the world?
Pathos, although not the horror, repeats in the next story,
नव्याण्णवबादची एक सफर. Mirasdar begins it in a style normally used, across all cultures, in literature of yore, of romantic genre revolving around adventures and courage, but he's only using it in telling of someone completely opposite of expectations aroused by the style - and yet, one only becomes conscious of this little hint of humour signifying the pathos at the very end, when finally the pathos is revealed bare of all humour.
In कळस, he surprises with multiple twists, last one leading to a smile.
But next, सोन्या बामण, again with multiple twists, goes opposite, from pathos to horror to complete melting of heart. From being disgusted at yhe grown up man who was a poor boy, one finds oneself absolving him because the boy was good, kind, compassionate beyond his years.
***
माझ्या बापाची पेंड
"“गांजा सापडला त्या कडब्याच्या खोलीत. पेंडीत ठिवला हुता म्हणं! बेकायदा इकत व्हता. सापडला आज. धरला आन् नेला.”
"मग बाजूला बसलेला एक तांबड्या डोळ्यांचा म्हातारा म्हणाला,
"“व्हय रे बाबा, व्हय नेला की रं तुझ्या बा ला धरून. इक्ता मोठा गांजा; पण समदा तुडिवला मुडद्यांनी.”
"ते ऐकून मला काही विशेष वाटले नाही. आमचा बा खंबीर होता. त्याची काळजी नव्हती.
"– पण भीती एवढीच वाटली, की मास्तरांच्या खिशातून पडलेले तुकडे हेडमास्तरांना आवडले, तर काय घ्या?"
***
भावकी
"बामणआळीच्या अगदी टोकाला बल्लाळाचा वाडा होता. वाड्याचा दरवाजा दगडी होता. आणि घोड्यावरची असामी जाईल इतका उंच. आत मोठे लांबोळके अंगण. दोन्ही बाजूंना मोठ्या खणाच्या एकमजली इमारती. पडायला झालेल्या त्या जुनाट घरातून देशपांडे घराण्यातली सगळी कुटुंबे राहत. पडझड थांबवण्याइतकी ऐपत कोणाचीच नसे. ही मंडळी मोठ्या दाराचा, परसदाराचा नि अंगणाचा समाईक उपयोग करीत. तिथे स्वत:च्या मालकीचे खण सोडून बाकी सगळे समाईकात होते. ... या घरातला धूर त्या घरात गेला, तरी ते निमित्त भांडणाला पुरे वर्दळ माजे. मग कोर्टात खटले-खोकले, दावेदोरखंडे चालत. शेताचे तुकडे विकून सरकारी अधिकाऱ्यांची धन होई. त्याचा निकाल लागायच्या आत नवी चारदोन भांडणे झालेली असत."
***
नव्याण्णवबादची एक सफर
"आणि मग संध्याकाळच्या त्या शांत, उदास वेळेला नानाच्या आयुष्याला पुन्हा एकदा अर्थ आला. तो गोष्ट सांगत राहिला. माणसे तन्मय होऊन ऐकत राहिली आणि ते रुक्ष, भकास वातावरण पुन्हा एकदा अद्भुततेने भरून गेले."
***
कळस
"चेहरा दिसत नव्हता; पण तुकाने त्या अंधारातही ते माणूस बरोबर ओळखले. अंगाला आळोखेपिळोखे देऊन तो कंटाळलेल्या आवाजात म्हणाला,
"“कोन राधे, आलीस का तू?”
"राधा मंजुळ आवाजात बोलली, “कवाधरनं त्या समूरच्या ववरीत बसून ऱ्हायले हुते मी.”
"“त्ये वळखलं मी, तकडची पाकुळी उडाली तवाच.’
"राधा हसली आणि म्हणाली,
"“गेली का मानसं समदी?”
"यावर तुकाही थोडासा हसला.
"“गेली. मला वाटलं, हितंच झोपत्यात काय की! मग काडलं काय तरी बोलल्यावरनं बोलनं. पैशे मागितले. मंग काय? पळाले समदे!”
"मग घोगऱ्या आवाजात तो पुढे म्हणाला,
"“आता काय भ्या न्हाई. ये वर!”"
***
सोन्या बामण
"सोन्या माझ्याजवळ आला. अगदी मुकाट्याने आला. तो काही बोलला नाही. चालला नाही. माझ्या हातातला वाळूचा गोळा तेवढा त्याने काढून घेतला आणि खाली टाकला. मग एवढेच म्हणाला,
"“जाऊ दे. मारु नकोस त्याला.”
"मला पुन्हा चमत्कारिक वाटले. मारू नको? का? सोन्याने हे असे कसे सांगितले?
"“का रे? का मारू नको?”
"यावर कधी न होणारा त्याचा चेहरा बापडा झाला. कळवळून तो म्हणाला,
"“नको रे. जाऊ दे त्याला. आई-बाप नाहीत त्या पोराला. त्याला नको मारूस.”
"बस्स! सोन्या एवढेच म्हणाला. अडखळत अडखळत म्हणाला आणि त्याच्या डोळ्यात पाणीच आले.
"आज सोन्याची एवढीच आठवण मला येते."
***
कोणे एके काळी
" ... डोळ्यांच्या कोपऱ्यात साचलेले पाणी मी केव्हा पुसून टाकले, हे कोणाला कळलेही नाही."
***
माझी पहिली चोरी
" ... वर्तमानपत्रात आमच्या घरच्या चोरीची बातमी होतीच. टपालात बहुतेक नातेवाइकांची पत्रे होती. सगळ्या पत्रांतून ‘तुमच्या घरी चोरी झाल्याचे वर्तमानपत्रांतून वाचले’ अशी सुरुवात होती आणि ‘समक्ष येत आहोत, काळजी करु नये’ असा मजकूर होता. पत्राव्यतिरिक्त चारदोन ताराही होत्या. ‘समक्ष येत आहोत, तोपर्यंत भिंतीचे भोक बुजवू नये’ अशी सगळ्या तारांमधून आगाऊच सूचना दिलेली होती.
"आश्वासन दिल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत सगळे नातेवार्इक सहकुटुंब येऊन दाखल झाले. चुलतभाऊ, चुलतचुलतभाऊ, मावसभाऊ, आतेभाऊ, मामेभाऊ, मावस-आतेभाऊ, आते-मावसभाऊ, आर्इवडील, सासूसासरे, मेव्हणे, मेव्हण्या, साडू, इत्यादी सारे जवळचे नातेवार्इक तर आलेच; पण आणखी त्यांचेही नातेवार्इक माझ्या समाचारासाठी आले. त्यामुळे माझ्या घराला एखाद्या लग्नघराचे स्वरुप आले."
" ... पाहुणेमंडळी हिंडायला बाहेर पडली आणि मी त्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात गुंतलो. नाही म्हटले तरी पन्नास-पाऊणशे मंडळी आलेली होती. त्यामुळे घरात गर्दी वाटतच होती. अनायासे खर्च होतोच आहे, तर या गडबडीत पोराची मुंज उरकून घ्यावी, असा एक धूर्तपणाचा विचार माझ्या मनात आला. पण मी तो बोलून दाखवल्यावर सगळ्यांनी त्याला मोडता घातला. हा दु:खाचा प्रसंग आहे, आम्ही तुमचे सांत्वन करण्यासाठी आलो आहोत, अशा वेळी मुंजीसारखी मंगल गोष्ट नको, असे म्हणून सर्वांनी तो विचार हाणून पाडला."
***
रानमाणूस
" ... “हां. आता तुझं काम. बोल. बघ ही यादी. वाच.”
"मी ते सगळे प्रकरण दुरूनच बघितले. गाडगे, बांबू, चिपाडे... मला अर्थबोध होर्इना.
"“बघितली. काय मला समजलं नाही.”
"“समजेल हं आता!” कडवट आवाजात तो म्हणाला, “अरे, काय माझं दिवाळं काढायचं ठरवलं होतं का काय तुम्ही?”
"“दिवाळं?”
"“तर!” यादीकडे नजर ठेवीत तो कर्कश आवाजात ओरडला, “पंचेचाळीस रुपये कसे झाले? परवा रात्री मसणात दोन बत्त्या आणल्यात तुम्ही! दोन बत्त्या न्यायला काय मला जाळायचं होतं काय?”"
***
झोप
"असा प्रकार पहाट होर्इपर्यंत चालला. नागूला उठवायचा प्रयत्न करून करून त्या भामट्याच्या अंगाला दरदरून घाम सुटला. त्याच्या कपाळावरून, गळ्यावरून घामाचे ओघळ वाहू लागले. मारून मारून हात दुखले. बोलून बोलून आधीच घोगरा असलेला त्याचा आवाज बसला. पण नागू गवळी जागा झाला नाही. कलियुगातल्या परमेश्वराप्रमाणे तो गाढ झोपेतच राहिला...."
***
व्यंकूची शिकवणी
"“ती हल्ली माझ्याकडे असते.”"
***
हरवल्याचा शोध
"आम्ही दोघेही सभ्य आणि सात्त्विक माणसे अशा रीतीने पुढे चाललो."
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................
................................................
August 27, 2022 - August 28, 2022.
................................................
................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................