तेल हा आंतरराष्ट्रीय राजकारणात अतिशय ज्वलंत विषय आहे, हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. पण त्याची सूत्रबद्धपणे संगती लावणे सगळ्यांनाच जमते असे नाही. हे काम गिरीश कुबेरांनी अतिशय उत्कृष्टपणे केले आहे. तेलाच्या शोधापासून ते आताच्या इराक युद्धपर्यंत, तेलाने कसे भल्याभल्याना नाचवले हे पद्धतशीरपणे पुस्तकांत मांडण्यात आले आहे. तेल, त्याचा उगम, विकास, कंपन्यांची मक्तेदारी, अरब जग आणि त्यांचे मूर्ख,लोभी राजकारणी यांचा इतिहास कळल्यावर आजच्या जगाकडे बघण्याचा एक डोळस दृष्टिकोन मिळतो. आजकाल आपण बऱ्याच बातम्या बघतो, पण घटनाक्रम आणि त्या मागची कारण पटकन उमजत नाही. हे पुस्तक वाचल्यानंतर अरब जगामध्ये घडण्याच्या गोष्टींची आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाची कारणीमिमांसा करणे सोपे होईल. घडणाऱ्या घटनांमागची कारणे, जी पटकन उजेडात येत नाही, ती समजून घेता येतील.
मी वाचलेली आवृत्ती 2016 मधली आहे, तरी तिच्यात 2006 नंतरच्या एकाही घटनेचा उल्लेख नाही. 2006 ते 2018 या कालावधीत, सौदी तेल विहिरींमधून बरेच तेल वाहून गेले असल्याने, नवीन आवृत्ती मध्ये या 12 वर्षांमधल्या घटनांवरच एखाद प्रकरण टाकायला काहीच हरकत नाही.
Over all, this is a well researched and well presented book. Worth a read.