By what name should I call you? `Partner`; actually we have no name; the name which we display as our own is given to the body, not to the soul. A young lady is like a cool breeze; which lingers around us, touches us, gives us pleasure but which cannot be hold. What is hell? It is the company of a third person when most undesired. Just remember friend, because you need me, I too need you. As you write more and more personal, it becomes more and more universal. By what name should I call you? `Partner`; actually we have no name; the name which we display as our own is given to the body, not to the soul. A young lady is like a cool breeze; which lingers around us, touches us, gives us pleasure but which cannot be hold. What is hell? It is the company of a third person when most undesired. Just remember friend, because you need me, I too need you. As you write more and more personal, it becomes more and more universal.
Vasant Purushottam Kale, popularly known as Va Pu, was Marathi writer who wrote short stories, novels, and biographical sketches.He authored more than 60 books. His well-known books include Partner, Vapurza, Hi Waat Ekatichi, and Thikri.
एवढ्यातच वपुं चे 'पार्टनर' सुन्न मनाने वाचून काढले.
भन्नाट पुस्तक आहे. मी खूप खूप वर्षांपूर्वी म्हणजे माझ्या शालेय जीवनात वाचली होती. तेव्हाही 'पार्टनर' मस्त वाटली होती. पण त्यातील दाहकता जाणवली नव्हती. काही संदर्भ, अर्थ व भूमिका कळण्यासाठी लग्नाचा अनुभव गाठीशी (किंवा किमान तेवढी मॅच्युरिटी) असल्याशिवाय 'पार्टनर'मधील दाहकता जाणवणे शक्य नाही. पहिल्या ११ पानांतच मी 'पार्टनर' मध्ये गुरफटलो.
कुठे मनसोक्त हसलो ... तर कुठे मनसोक्त रडलोही... होय खोटे कशाला सांगू? 'पार्टनर' वाचल्यामुळे असेल कदाचित पण त्यातील रोखठोक पार्टनर चे विचार जळजळीत असले तरी प्रामाणिकपणे पटले. वैयक्तीक आयुष्यावर कदाचित अगणित कादंबर्या लिहिल्या गेल्या असतील.... वाचल्या गेल्या असतील... पण स्त्री-पुरुष , नवरा-बायको , आई - मुलगा, सासू - सून , भाऊ भाऊ, जिवाभावाचा मित्र, मालक-नोकर, विक्रेता-ग्राहक, दीर वहीनी या सर्व नात्यांवर कमी शब्दांत पण परिणामकारकपणे आणि विलक्षण प्रभावीपणाने क्वचितच कोणी लिहिले असावे.
पहिल्याच सार्वजनिक भेटीत ज्या सौंदर्यवतीला पाहताच एका सामान्य दिसणार्या तरुणाचे चित्त हरवते. तिला आपल्या खर्या प्रेमाची कबुली एकदम स्पष्टपणे देऊनही तिच्याशी लग्न होण्याची शक्यता नाही या वास्तवाचे भान आहे हे देखील तिलाच स्पष्टपणे सांगणे. तिच्याशी संसार फुलवताना प्रचंड समाधानाची भावना फक्त त्यालाच नव्हे तर तिलाही तितक्याच समर्पणाने जाणवते. तिला प्राप्त करताना त्याला मिळालेले समाधान, आणि त्याचबरोबर वाट्याला आलेला सख्ख्या आईसकट भाऊ व वहिनीचा तिरस्कार. असे कित्येक वेगवेगळे पण वेगवान घटनाक्रम वाट्याला येऊनही अधून मधून धूमकेतू सारखा अवतीर्ण होणारा 'पार्टनर'च त्याला प्रत्येक प्रसंगात जवळ कसा वाटतो. प्रेयसीचे रुपांतर आधी अर्धांगिनीत त्यानंतर मग आईत झाल्यावर तिच्या स्वभावातील बदल किती छोट्याशाच पण काळजाला चटका लावणार्या प्रसंगांतून वपुंनी दाखवून दिले आहे.
अर्थात कथानक हे 'पार्टनर' चे बलस्थान आहे की नाही माहिती नाही. किमान माझ्यामते तरी नाही. कारण घराघरात घडणार्या दाहक सत्याचेच पार्टनरमध्ये जळजळीत चित्रण केलेले आहे पण त्याहीपेक्षा अद्वितिय आणि मनात घर करुन बसणारी वपुंची योग्य वेळी केलेली योग्य वाक्यांची पेरणी आहे. जसे "पोरगी म्हणजे एक झुळुक. अंगावरून जाते, अमाप सुख देऊन जाते. पण धरून ठेवता येत नाही." "आपल्याला हवा तेव्हा तिसरा माणूस न जाणं हा नरक." यातही 'नरक' या व्याख्येवर वपुंनी कोटी केली आहे. हाच नरक 'पार्टनर' मध्ये तीन वेगळ्या व्याख्यांनी दाखवलेला आहे. ते इथे सांगून या सुंदर पुस्तकाचा रसभंग नाही करत "तुला मी हाक कशी मारू? पार्टनर ह्या नावानं. आपल्याला खरं तर नावच नसतं. बारशाला नाव ठवतात ते देहाचं." "कुणाचा तरी मुलगा होणं टाळता येत नाही. कुणाचा तरी बाप होणं टाळता येतं." ही असली सुंदर सुंदर वाक्ये पुस्तक हातातून खाली ठेवलं तरी मनात हिंदोळत असतात. आणि त्याही पेक्षा मति गुंग करणारे म्हणजे क्वचित समोर येणार्या 'पार्टनर' चे विचार आणि त्याचे जीवन "पार्टनर" केवळ एक कादंबरी नाहिये.... केवळ एक घटनाक्रम नाहिये.... तर एक सखोल चिंतन आहे. मला वाटते यातच व.पुं.च्या 'पार्टनर' चे यश दडलेले आहे.
ज्याचे अनुभवविश्व समृद्ध झाले आहे त्याला पार्टनर कळला असे मी म्हणणार नाही तर त्याने 'पार्टनर' जगण्याचा अनुभव घेतला असेच म्हणेन. आणि म्हणूनच 'पार्टनर' हे लग्नानंतर काही वर्षांनंतर वाचायचे पुस्तक असे मी आवर्जून म्हणेन.
This book is so close to my heart. Somehow I had forgotten how I felt after reading it the first time and now after rereading, all the memories came rushing back. I can't express in words how much I love and cherish V. P. Kale's writing but among all of his works, this one is my favorite.
Sometimes we can not comprehend the full meaning of certain things especially when it comes to relationships. This book makes it easier to grasp the meaning of complexities in life.
This story starts with a narrator who is despised by his own mother and brother coz he earns well and better than his brother. There's a special person in his life he calls "Partner" who understands him better than anyone else in his life has ever done. Their bond is Special.
His dreams come true when he marries a girl who he likes very much. His mother and brother are still same , albeit hates him even more for being married to a girl he wanted.
Everything is good until everything just turns upside down and his life comes crashing down. When it happens even his wife blames him for everything. And he feels utterly alone and then he remembers partner again. Throughout his journey, Partner is the only person who remains a constant companion to him.
This book made me cry rivers, it's heartbreakingly beautiful.
तशी ही प्रेमकहाणीच आहे पण ती वपुंनी लिहिलेली आहे, हेच तिचे वैशिष्ठ्य . त्याला ती आवडणे आणि तिला जिंकण्यात त्याने यशस्वी होणे हे अशा कहाणींचे वळण. ते दोघेही आहे पण ते कोण्या 'जोश्या'चे नसून वपुंचे आहे म्हणून ते येथे 'वलय’ झाले आहे. राजवाड्यावर म्हणाल ती अप्सरा टाळीच्या इशार्यावर नाचवण्याची ज्याची ताकद तो वेडबंबू शकुंतलेसाठी पागल व्हावा तसेच हे आहे आणि वेडबंबू येथे औषधानिमित्ताने दुकानात येणार्या अनेकांपैकी एका मुक्त वागणार्या पण स्वत:ला गुप्त ठेवणार्या पार्टनरची लाजवाब साथ मिळाली आहे म्हणूनच ही कहाणी. 'शाकुंतल' सारखी वारंवारं 'आवृत्ती'त जात राहिली आहे.
पार्टनर… ह्या पुस्तकाबद्दल मी काय लिहु… एक विलक्षण प्रेम-कहाणी जी मानवी भाव - भावनांचे कंगोरे दाखवते… "तुला मी हाक कशी मारू?, 'पार्टनर' या नावानं…" " लक्षात ठेव दोस्त, तुला मी हवा आहे म्हणूनच मला तू हवा आहेस" ही कहाणी वाचताना वाचक एका वेगळ्याच विश्वात जातो… मला अतिशय आवडलेली वपुंची ही कादंबरी…
Partner is not a just book , It is the Classical tone of human-life. This book tells us about the nature of various human relations and put forward the life of every conman man.It shows almost every relation through which a human goes. On every other page you will find the sentences which you will want to underline. Such a noble read. Every person can see himself in one of the character. Most of the quotes will be reverberating in your mind even after finishing the book. There are very few authors who can write on relationships so straight forward and thoroughly. Looking forward to read every book by Va. Pu. Sir.
पार्टनर खुप छान पुस्तक आहे किंवा खुप सुंदर आहे असं काही मी म्हणणार नाही. महोत्सव खरं तर सुंदर पुस्तक आहे. पण पार्टनर वास्तव आहे, शहरातल्या लग्न झालेल्या चाकरमान्याशी जास्त साम्य सांगणारं वास्तव. सुंदर शब्दरचना,अधोरेखीत करावी अशी अप्रतिम वाक्य, सुरेख कल्पनाविलास ह्या निकषांवर पार्टनरला तोलू नये. तर मनालाही विचार करणाऱ्या घटना, बेगडी नाती अन् जगात दुर्मिळ झालेली खरी मैत्री यांच्यासाठी ह्या पुस्तकाला दाद द्यावी. केवळ १५६ पानांमध्ये एक अफाट वास्तव उभे करण्याच्या वपुंच्या कसबासाठी ह्याला दाद द्यावी. जी लोकं आजही नाती, घरदार, परंपरा ह्या काउंटरच्या पलीकडे जाउन जग बघत नाहीत त्यांना ही कथा अचंबित करून जाते, एका वेगळ्या जगाची जाणिव करून देते. पण जी लोकं सारखी त्या काउंटरच्या पलीकडेच जगत आली आहेत ती कथेला नव्हे तर वपुंच्या कलेला, त्याच्यांतल्या लेखकाला प्रणाम करतील. एक नेहमीचा साचा घेऊन त्यात अत्यंत रेखिव आणि आशयबद्द कंगोऱ्यांनी विणकाम करावं तसं वपुंनी एक साधं कथानक निवडून त्याचं चीज केलयं.
प्रत्येकजण स्वतःच्या द्रुष्टीने कलेचा अर्थ लावतो. पण टारगेट आॅडियन्सना सहसा ती कला जास्त भावते, नातं सांगून जाते. पार्टनर बद्दलही हेच खरं आहे.
पार्टनरमध्ये न पटण्यासारखं वागणारी पात्र आहेत, कथेच्या मुख्य पात्राला अनेकदा त्यांचा रागही येतो. त्याला दिलेले सगळेच सल्ले आपल्याला पटले नाहीत, तरीही या पात्रांना वपुंनी छान रंगवलय. आयुष्य, अपेक्षा, कल्पना आणि सत्य, या सगळ्याच प्रकारांवर लिहीलेली पार्टनर वाचण्यासारखी!.
'The cemetery is full of people who once considered themselves indispensable' - just one of the gems scattered throughout Va Pu Kale's work. The storyline moves within the confines of courtship to post-happily-ever-after life of Sri & Kiran. However the crests & troughs are enough compensation for its lack of width.
Partner is Sri's nameless friend, confidante & philosopher. He flits in and out of the story , yet remains omniscient. Va Pu's brilliance lies primarily in etching nuanced characters & bitter-tender relations within families. Notable by her multilayered psyche is Sri's mother, his envious loser brother and the zesty Mai.
Peppered with the right dose of humor, wisdom, philosophy, erotica and quotes. Must read.
व पुं च पार्टनर... एक अफाट अनुभव कितीही वेळा वाचलं तरी मन न भरणारा पार्टनर व पुं च्या अफाट लेखणीने अक्षरशः वेड लावून जातो. कितीही नाही म्हटलं तरी आपला जीवनपट नकळत आपण श्री च्या कथेसोबत जोडतो आणि वाटायला लागतं अरेच्चा हि तर माझीच कथा (कि व्यथा?). व पुं च जीवनाबद्दल च तत्वज्ञान खरंच विचार करायला लावणारं. श्री ला मिळाला तसा पार्टनर आयुष्यात प्रत्येकाला मिळाला तर खरच जगणं अक्षरशः स्वर्ग होईल. सर्वानी आवर्जून वाचावा असा पार्टनर.... जगणं शिकवणारा, हसवणारा, रडवणारा आणि तसाच मनाला चटका लावून जाणारा.... A must read.
"Lakshat thev dost, Tula mee hawa aahe mhanun mala tu hawa aahes " this sums up the genius of va pu's writing. There is no happy philosopher and yet there is no escape from interpreting life in a philosophical way. Va pu writes this beautiful story where most Bollywood movies end, which is "and they lived happily ever After." Soul stirring book - extremely well written. Va pu is One of the few best writers who have ever lived in this world - real genius !!!
But title remains a puzzle until one realises that one's finished, not the first story as one had thought, but the book! One was so reluctant to go further and turn the page, one realises it only next morning.
And then one reads the poem addressed to 'partner', and suddenly knows - but lacks courage to go back and re-read. One has a clue to this maverick, heartbreaking tale. ................................................................................................
Publishers have made it difficult to use Marathi script in title of book for review, or for name of author, by giving first few - quite a few ! - pages in a format used for photographs.
For some reason, moreover, copying and pasting from text suddenly produces deformations in some letters. And then there are others where words are written improperly in the book. So quoting is difficult at best.
Pointing it out involves suggesting corrections, which, if one hasn't learned to type Devanaagarie, is highly non trivial.
And then there's incorrect usage of other languages, or usage of other languages incorrectly. ................................................................................................
"अमितचा फोटो पसंत पडल्याची बातमी दुकानात पोहोचली अाणि मित्रांनी पार्टीकरता तगादा लावला.
"सुरुवातीला विरोध दर्शवणारी किरण, पण तीच अाता कौतुकाने सगळ्यांना सांगत सुटली, ‘
"‘अामच्या बछड्याचे फोटो अाता सगळीकडे झळकतील.’’
"खरोखर ते तसे सगळीकडे झळकले. वर्तमानपत्रांत, बाटल्यांवर, डब्यांवर, पोस्टर्सवर-कुठेही जावं, अमित दिसायचा. तो दिसला रे दिसला की पार्टनरची अाठवण यायची.
"कंपनीकडून ज्या दिवशी तीन हजारांचा चेक अाला त्या दिवशी मी दुकानात दणकून पार्टी दिली. लग्नाची, ब्लॉकची, फर्निचर अाणि बारशाची सुद्धा ! पार्टीचा तो थाट, लोकांचं माझ्यावरचं पेरम पाहून अरविंद, मनोरमा अाणि अाई दिङ्मूढ झाली. तरी ती प्रत्येकास सांगत होती, ‘‘वयाची अट होती म्हणून, नाहीतर रंजनचे फोटो पण चांगले येतात.’’
"अमित तर त्या दिवशी खरोखरच राजबिंडा दिसत होता.
"अाणि पार्टीच्या चौथ्या दिवशी अमितला ताप अाला. किरकोळ असेल असं म्हणत पहिल्या दिवशी घरगुती उपाय केले. अाम्ही दोघं कामावरसुद्धा गेलो. दुसऱ्या दिवशी टेंपरेचर जरा वाढलं. मग किरणने रजा घेतली. मी दुकानात अालो. दुकानात अालो अाणि चार तासांनी किरणचा फोन अाला, ‘‘कोणत्या तरी चांगल्या डॉक्टरांना घेऊन या.’’" ................................................................................................
"चंद्रकिरण हाऊसिंग सोसायटीमधला हा पहिला मृत्यू. स्मशानात जवळजवळ अख्खी सोसायटी लोटली होती.
"अमितच्या ग्लॅक्सोच्या फोटोची ही किमया होती. अंत्यसंस्कार अाटपून अाम्ही सर्वजण बाहेर अालो. मन सुन्न झालं होतं." ................................................................................................
"‘‘पार्टनर, मी नीच अाहे. स्वार्थी अाहे, हलकट अाहे. मी एवढ्याशा त्या मुलाला त्याचा अपराध नसताना मारलं होतं. त्याला एका रात्री झोप येत नव्हती. मला अमितला खेळवायचं नव्हतं. अमितला मी हवा होतो. मला किरण हवी होती. मी मग त्या अजाण, निष्पाप जिवाला, माझ्या क्षणाच्या अानंदासाठी गॅलरीत नेऊन मारलं होतं. पोरगं त्या दिवशी रडून रडून झोपलं. पार्टनर, सोड मला. मी त्याला एकदाच जवळ घेतो. मला त्याची माफी मागायची अाहे. मला सोड. अजून काही तरी चमत्कार घडेल.’’" ................................................................................................ ................................................................................................
A must read book. A middle class man with the hopes to live the life on his terms changes the whole meaning of life for him as his Partner is the only person who ever understands and guide him through each situations. An epic story by Va.Pu.
This book was wayyyy ahead of its time! I did think it was a bit disjointed or abrupt, but I also suspect that's due to Kindle porting. Some quotes were amazing. I especially was intrigued by "As you write more and more personal, it becomes more and more universal."
वपु काळेंची “पार्टनर” ही लघु-कादंबरी काही वर्षांपूर्वी वाचली ���ोती. अफाट आवडलेल्या वाक्यांच्या प्रेमात पडता पडता काळजाचा कडेलोट करणारी शोकांतिका वाचून सुन्न झालेलं माझं मन मला अजून आठवतंय. कहाणीतून वपुंना काय सांगायचंय ते कळलं नव्हतं, त्याचं कुतूहल होतं, पण अंताची धास्ती होती. पुस्तक पुन्हा उचलायला हात कचरत होता. internet वर कादंबरीचा भावार्थ शोधला, पण काही मिळालं नाही.
पुढे वपुंनी लिहिलेली रंगपंचमी, का रे भुललासी वगैरे पुस्तकं वाचली. ती आवडली. पण पार्टनर चा कडेलोट स्वस्थ बसू देत नव्हता. लेखकाला त्यातून काहीतरी सांगायचंय, अन आपण त्याकडे लक्ष न देता भलत्याच वाक्यांच्या प्रेमात आंधळे होऊन बसलोय की काय, असं वाटत होतं. मग लॉक डाउन मध्ये आलेल्या वाचनौघात धीर करून पार्टनर पुन्हा उचललं.त्या वाचनात मला लक्षात आलेले काही मुद्दे या लेखात मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. आंतरजालाच्या महाविश्वात त्यानिमित्ताने मराठी साहित्य क्षणभर अजून प्रचलित व्हावं, हाही एक छुपा उद्देश.
कादंबरी चा सूत्रधार, किंवा narrator म्हणजे श्री. पण कादंबरीला नाव मात्र दुय्यम पात्राचं! इथूनच विचार-चक्र सुरु झालं: ही कथा श्री ची नाहीच मुळी! श्री या कथेचा भाग जरूर आहे, पण तो फक्त कथाकथनाची योजना म्हणून. कथेमागची मूळ विचारधारा, तत्वज्ञान, हे पार्टनर चं. एखादा वगळून महत्वाचे संवाद पार्टनर च्या तोंडी. कादंबरीच्या शेवटी सुद्धा, श्री ला भीती वाटावी अशा नजरेने पहाणारी किरण, आणि पार्टनर ला घर सोडायला लावणारी त्याच्या वडिलांची नजर यातील तुलना हेच दर्शविणारी.
“संसाराचा अर्थ अशाच एखाद्या क्षणी समजतो,” श्री म्हणतो. हा अर्थ म्हणजे या शोकांतिकेचा केंद्रीय प्रश्न- to be or not to be? कुणासारखं जगावं? श्री सारखं, “नमत्या स्वभावाने”, इतरांचं मन राखता राखता, स्वतःचं मन मारत? की पार्टनर सारखं, फक्त आणि फक्त स्वतःसाठी? कोणत्या जीवनशैलीचे परिणाम आपल्याला पचवता येतील? किंबहुना, पचवता येतील का?
fight club चित्रपटाशी साम्य जुळवत विचार केला तर पार्टनर हा श्रीचाच subconscious म्हणता यावा. त्याचं बोलणं, भेटणं, केवळ श्रीशी. दुकानातल्या देवधरांना फोन करतो म्हणून, आणि किरण ला पत्रं सापडली म्हणून, एवढं वगळता कथेत इतर पात्रांशी त्याच्या भेटी, अथवा बोलणं नाही. पार्टनर ने श्रीला उद्देशून लिहिलेल्या पत्रात त्याला “पार्टनर” म्हणून संबोधावं, ही याची पहिली निशाणी. “आई, बाप, भाऊ, वाहिनी, पुतण्या, बायको, सासू, सासरे, सगळे भास... पार्टनर, तू तरी मला खराखुरा भेटला होतास का रे? का जसं जगायची वारंवार इच्छा होत होती, त्या मारलेल्या इच्छांचं भूत म्हणजे तू?” असा सरळ प्रश्नही वपु श्रीच्या तोंडी शेवटी विचारतात. घर सोडल्याच्या प्रसंगाशिवाय पार्टनर ला भूतकाळ नाही, भविष्य नाही. “स्वतःबद्दल काही सांगत नाही... मागचं उलगडत नाही, पुढचं आखत नाही. पार्टनर म्हणजे नुसता वर्तमानकाळ होता.” असं कादंबरीत वाक्यच आहे. प्रतीकात्मक कादंबरीत असा प्रयोग काही नवीन नव्हे. कदाचित हस्तलिखितात वपुंची अशीच काही योजना असावी, जी पुढे बदलून वास्तविक आणि प्रतीक यातली सीमारेषा धूसर करण्यासाठी कदाचित, पार्टनरला अधिक समूर्त रूप दिलं गेलं.
कथेच्या शेवटी, अमितच्या जन्मानंतर, किरण आणि श्री मधला दुरावा वाढीला लागतो. आई आणि बायको यामध्ये विभागला गेलेला श्री, पार्टनरला याबद्दल गार्हाणी सांगतो : “तिच्यातली प्रेयसी सोडाच, पण पत्नीसुद्धा जळून गेलीय असं वाटतं... तिला काय हवंय तेच कळत नाही.” शेवटी झालेली शोकांतिका ही वपुंनी वापरलेली दुहेरी – नव्हे, तिहेरी – योजना. श्री आणि किरण चं नातं पराकोटीला ताणणारी, पार्टनरने घर का सोडलं हे श्री ला पटवणारी, अन हृदयाला चटका लावेल असा कादंबरीचा अंत करणारी.
“आता माझं नशीब चांगलं, त्याला मी काय करणार?” असं म्हणणारा श्री सुद्धा शेवटी अगतिक होतो. माणसाने कितीही नाती, माणसं जोडली तरी शेवटी दोन माणसं ही दोन विभक्त माणसं असतात – त्यांच्यात काळानुसार अंतरं येतातच. “आयुष्यात अशीच माणसं येतात आणि जातात, पार्टनरसारखी. जितकी जवळ, तितकीच दूर. जितकी समजतात तितकीच अनाकलनीय राहतात.” “मेड फॉर गरवारेज एंड आपटेज” अशी सौन्दर्यमूर्ती किरण, श्रीला भाळवते, त्याच्यावर जीव टाकते, पण शेवट हा असा. “दु:ख बोलतं, त्याला विवेक असत नाही.” पण असं क्षणिक अविवेकी बोलणं जन्माचे घाव करून जातं. “अशाच एखाद्या क्षणी संसाराचा अर्थ समजतो.” अन मग माणसं जोडण्याच्या वायफळ प्रयत्नांचा वीट येऊन शेवटी “श्री”चा ही “पार्टनर” होतो – असा वपुंच्या कथेचा रोख आहे.
शोकांतिका प्रश्न मांडते – त्या प्रश्नाचं उत्तर शोधायला प्रेक्षकाला, रसिकाला, वाचकाला अंतर्मुख करते. पण त्या शोकांतिकेतही वपु एकाधिक एक सुंदर विचार मांडून जातात. “तुला मी हवा आहे म्हणून मला तू हवा आहेस.” यासारख्या ओळी हातातलं पुस्तक मिटून विचार करायला भाग पाडतात. किती सांगाव्या! अशा ओळींसाठी मग ही काळजाला चटका लावणारी कादंबरी पुन्हा पुन्हा वाचावीशी वाटते.
नको नको वाटणारे विचार मनातून हुसकावून न लावता येणे हाही नरकच!
पोरगी म्हणजे झुळूक , अंगावरून जाते, अमाप सुख देऊन जाते पण धरून ठेवता येत नाही.
शब्द हे जंकशन स्टेशन सारखे असतात, तिथे सगळ्या गाड्या थांबतात हेच, एवढंच त्याच वैशिष्ट्य. पण दोन जंकशन मध्ये खूप काही घडत असतं त्याची त्या जंकशन ना दाद नसते.
सौन्दर्याची ओढ वाटणं ही जिवंतपणाची खून आहे.
कायम आजारी असलेल्या माणसाला जेव्हा इतर कंटाळतात तेव्हा त्याचा तो किती कंटाळलेला असतो हे इतरांच्या लक्षात येत नाही, माणसाचं स्वतःच्याच कंटाळ्यावर प्रेम असत!
माणसातला नको असलेला भाग दूर करायला शिका. ह्याची सुरवात स्वतःपासून करा. स्वतःला नको असलेला भाग कोणता? तर ज्यापायी आपला आनंद, प्रगती, निष्ठा आणि आत्मविश्वास ह्याला तडा जातो तो आचार , तो विचार हा टाकायचा भाग!
मी आस्तिक आहे का नास्तिक ह्याचा मी कधी शोध घेतलेला नाही. मे श्रद्धावंत जरूर आहे. सौंदर्य , संगीत, सुगंध , साहित्य ह्या सर्वांसाठी मी बेभान होतो. पण माझी जमीन कधी सुटत नाही. मी माणूस आहे ह्याचा मला अभिमान वाटतो. मला परमेश्वर व्हायचं नाही.
माणूस नुसतं काव्यावर जगत नाही, मागची बाजू व्यवहाराचीच!
सुखदुःखाचा वर्षाव सुस्तावतो, दुःखाने जागृत राहतो. सौख्याने तो सर्वत्र पळत राहतो, दुःखाने तो स्थिर होतो. सौख्य बाहेर पाहायला लागतं, दुःख आत पाहायला शिकवतं.
there is not a single example of happy philosopher
गैरसमज हा कॅन्सर सारखा असतो. तिसऱ्या अवस्थेत पोहचल्यावर तो आपलं स्वरूप प्रकट करतो.
as you write more and more personal, it becomes more and more universal.
अडचणी येतात आणि जातात, फक्त जाताना वय घेऊन जातात
संसारात आपण निर्णय घ्यायचा नाही, बायकांना घ्यायला लावायचा चुकला तर त्यांचा आवाज बंद, बरोबर आला तर क्रेडिट त्यांना मिळतं पण काम आपलं झालेलं असतं.
मन सांभाळायचं ठरवलं तर मन मरावं लागतं, एका वेळेला एकच साधता येतं- स्वतःच सुख नाहीतर दुसऱ्याच मन.
शेवटी फोटो म्हणजे तरी काय?- आपलंच हूल देत गेलेलं वय , पुन्हा आपल्याला भेटायला येतं.
दुःख आयुष्य संपवत नाही, आयुष्याला नवा अर्थ देतं.
वपुं ना पुन्हा एकदा सलाम 🙏 ह्या माणसाची निरक्षण शक्ती म्हणा किंवा विचार शक्ती अफाट आहे. जगण्याची कला शिकवली ह्या माणसानि असा म्हणलं तरी खोट ठरणार नाही.
वपु, तुम्ही तर आधीपासूनच जिवलग मित्र होतात परंतु या पुस्तकाच्या वाचनानंतर तुम्ही पार्टनर झालात आणि पार्टनर म्हणजे काय हे देखील उमगले! भन्नाट वाक्ये आणि दाहक विचार याच अप्रतिम कॉम्बिनेशन आहे हे पुस्तक.
तुमच्या आताच्या जन्मदिनी लिहिलेलं जरा पोस्ट करतोय इथेच. "सॉरी पार्टनर, जर उशीरच झाला विश करायला, जगाच्या धांगडधिंग्यात जरा उशीरच होतोय आजकाल सगळ्या गोष्टींना.
पार्टनर, यापेक्षा छान शब्द सापडूच शकत नाही तुमच्यासाठी! तुमच्या विचारांचे वाचन करताना एखादा अति जिवलग मित्र मिळाल्यासारखेच वाटले, जसे की फक्त ज्यालाच आपल्या भावना न सांगता समजतात, न बोलताही ज्याच्यामध्ये आपल्याला बळ देण्याचे सामर्थ्य असते!
जगण्याचे आणि त्याच बरोबर जगाचे पैलू उलगडून दाखवणारी तुमची लेखन शैली, काळजाला भिडणारी वाक्ये, तुमच्या लिखाणात कायम माझ्या आयुष्याची डोकावणारी सावली...अजून काय सांगावे, शब्दात वर्णन नाही करता येणार! भावना व्यक्त करायला शेवटी शब्द कमी पडतात हेच खरं, बघा हे व्यक्त करायला सुद्धा तुमच्याच विचारांची साथ.
एकाकीपण आणि एकांत यातला फरक ज्या शब्दात सांगितलात त्याला तोड नाही, अस नाही की फरक माहीत नव्हता, परंतु ज्या शब्दात तुम्ही सांगितलं ना तेव्हा एखाद्या गोष्टीचा साक्षात्कार होणं काय असत ते अनुभवलं.
आपलं घर आपणच सांभाळायच हे गोगलगायी कडून तुम्ही आम्हाला शिकवलंत आणि आठवणींना मुंग्यांच रूप देऊन देखील कित्येक आठवणींना जागवलंत.
खूप आयुष्य बाकी आहे आणि खूप शिकणं बाकी आहे, परंतु तुम्ही ज्या पद्धतीने माणसं शिकायला शिकवलंत आणि त्याचबरोबर स्वतःला ओळखायला शिकवलंत त्याचा आयुष्यभर ऋणी राहील.
तुम्हीच सांगितलं होतं ना पाऊस सगळीकडे सारखाच पडतो पण प्रत्येकाचं भिजणं वेगळं असतं, आपले विचार तरी काय या पावसापेक्षा वेगळे आहेत का? विचार एकच परंतु प्रत्येक वाचकाच्या आयुष्यातल्या निरनिराळ्या घटनांना स्पर्श करणारे.
शेवटी तुम्हीच तर सांगितलंय की काळ फक्त वय वाढवतो, परंतु आठवणींना वार्धक्याचा शाप नसतो, अगदी तसच तुमच्या आठवणी या कायम मनामध्ये चिरतरुण राहतील.
आयुष्याच्या "तप्तपदी" चालून "अर्जुना"सारखं ध्येयावर लक्ष केंद्रित करताना देखील काही गोड आठवणींचा "प्लेझर बॉक्स" उघडायला तुमच्यासारखा "दोस्त" च हवा. "चिअर्स" "पार्टनर"!"
Review : Partner Partner is about an inseparable part of life, it is about friendship, love and family. The story is about Shrinivas and his anonymous friend “Partner”. Shrinivas is ordinary but his thinking and mannerism makes him extraordinary. He works in a chemist shop and have a simple and typical Indian family. Shree fall in love with Kiran and soon got married to her.
Some part of the story is about Kiran and Shree’s love story. A story which is you feel indifferent from your life. Shree is a proudly middle classed person that he doesn’t have any guilt of being poor. He shared his true honesty with Kiran and Kiran was nothing but impressed on him.
Partner is a friend in need and a friend indeed. He is Shree’s friend, philosopher and guide. He never shared his real name with Shree, true to the thought of Shakespear “what in a name”. Partner helped him selflessly and unconditionally.
Partner is characterized as a free bird, he never used to bound himself with limits. He was a runout from his own house. Shree on the other hand is an overthinker and emotional person.
I loved the concept of W and M in the story. When Shree was being sandwiched between his Wife and Mother, partner beautifully explained him a science behind these two indivisible characters of life.
Author has wonderfully narrated the value of a true friend in one’s life. A true friend can be motivator, antidepressant and life saver. The description and presentation of characters are subtly accurate.
At the end, Shree had to face a painful incident in his life but his partner was standing next to him firmly. At the end author has flawlessly portrayed the real face of life and how unpredictable it can be.
The story is intriguing and absorbing with full of household drama. I would highly recommend this book, It’s worth it.
PS : I would say it’s a work of fiction but with unbelievable non fictional glimpses of life.
हे पुस्तक एवढे का नावाजले गेले, पहिल्या पानापासून छळणारा प्रश्न. वपु काळे हे लेखक मला फारसे कधीच रुचले नाहीत. एका उत्तमोत्तम पुस्तके वाचणाऱ्या मित्राने सुचवल्या मुळे मी हे पुस्तक हातात घेतलं.
भ्रमनिरास सोडून फार काही हाती लागलं नाही. ही म्हणे प्रेमकथा आहे, कुठल्या बाजूने ते कळलं नाही. किरण आणि श्री ची गोष्ट म्हणा हवं तर ..प्रेम वगैरे काही आपल्याला दिसलं नाही.
श्री हे पात्र मला अत्यंत पुरुषी मनोवृत्ती बाळगणारे आणि पुरुषी वर्चस्व वादाचे समर्थन करणारे वाटले. पुस्तकात असे अनेक दाखले देता येतील. तशी सगळीच पात्र कमी अधिक ह्याच मनोवृत्तीची. म्हणजे मध्येच तो श्री पुरोगामी वगैरे वाटतो पण परत शेण खातो... ह्यावर स्त्रियांनी खरतर बंदी घालायची मागणी कशी नाही केली ह्याचं मला आश्चर्य वाटलं.
हा पार्टनर नावाचा उपटसुंभ कोण? त्याची ' श्री ' च्या आयुष्यात इतकी का किंमत? रात्री झोपायला जागा दिली म्हणून? कारण तो जे काही बेगडी तत्वज्ञान देत सुटलाय कादंबरी मध्ये ते तद्दन फोलपट आहे...म्हणजेच एका अर्थाने वपु सांगत आहेत त्यालाच मी फोलपट म्हणतोय, हे सांगणे न लगे. हा तर स्त्रियांकडे उपभोग्य वस्तू म्हणून पाहतो...त्याच कारणासाठी श्री च्या बायकोला भेटण्याचं टाळतो...आणि हा श्री त्याला एवढी किंमत देतो?
बरं कितीही जवळचा असे ना का मित्र, नवरा बायको यांच्यातल्या काही गोष्टी बेडरूम च्या बाहेर येऊ नयेत, हा संकेत आहे...तर हा श्री त्या पार्टनर ला पत्राने अत्यंत खाजगी प्रसंग आणि घटना कळवतो, आणि वर समर्थन करतो आणि चिडते ह्यावर किरण तर ती चुकीची? हा काही औरच प्रकार आहे.
बरं बाकी रहुद्या ...फोलपट तर फोलपट तत्वज्ञान, पण नक्की काय सांगायचंय काय वपुना हे शेवट पर्यंत कळलं नाही मला. आणि शेवट तर इतका विचित्र आणि अर्धवट आहे की सांगता सोय नाही.
पूर्ण झाल्यावर एक विचित्र काहीशी भावना उरते मनात. अशुभ अशी.
एक मात्र नक्की की ह्या किंवा इतरही काही पुस्तकांतून वपुंची पुरुषी वर्चस्व वादाची मानसिकता ढळढळीत दिसून येते. जुन्या काळात लिहलंय आणि त्या काळाशी सुसंगत आहे असं म्हणावं तर श्री ना पेंडसे ह्यांच्या सारखे आधीच्या काळात लिहिणारे लेखक हे कितीतरी काळा पुढे होते.
एकुणात ह्या पुढे वपु हे नाव परत घेतले जाणे दुरापास्त.
I am nothing to review this book. This is something that changes your view towards life. Va.PU. surely sees world differently than others. The story is simply amazing. It makes us accept some bitter truths of human life. He has written on relations and relatives in few but effective words. And that Partner is a kind of friend everyone needs in life. He don't even exposed his name, but staying detached from systems made by society, he always gave life a neutral view, and because of that provided solutions to the common problems in life differently. He tells us some harsh realities of life. Some of his views really stupefy us and makes us think intensively about life. The book is bestrewed with beautiful sentences at perfect moments, And this the best thing about this book. I just loved it, and I am sure you will.
I remember I was in my balcony when I finished reading this book and when I read the end I almost threw the book from the 11th floor of my balcony. Why would you do this to me, Kale? Why did I read this book, why did I attach myself to the protagonist? I guess I had no choice. Reading this book was a perfect heartbreak experience that I’ve ever felt. Perfection delivered from Kale yet again!
Well, this author is all the way different thinking, in this book the way he has colored the relationship between people is one of its kind...great to know different definitions/thoughts of him about people
व. पु. काळे यांचे दोस्त हे पुस्तक मी मागच्या वर्षी वाचले होते त्या आधी व. पु. कधी वाचनात आलेच नव्हते. ते मुद्दाम आले नाही असे नव्हते परंतु योग आला नव्हता. दोस्त अतिशय हलकं फुलकं असं पुस्तक आहे आणि जेव्हा पार्टनर ही कादंबरी वाचायला घेतली तेव्हा अशीच समजूत होती की हे त्याच धर्ती वर जाईल कदाचित पण पहिल्या ५ पानांमध्येच वास्तविकतेची तपासणी करून व. पु खोल विचारांमध्ये टाकतात आणि शेवटच्या पाना पर्यंत आपण विचार करत राहतो की ही वास्तविकता आपण रोज अनुभवतो…. या ना त्या कारणामुळे…. ही गोष्ट जरी श्रीची असली तरी प्रत्येक पिढी मधला प्रत्येक पुरुष हा श्री आहे आणि त्याच्याही मनात ते सगळे विचार येऊन गेलेत जे श्री आतल्या आत करून कुढत आहे…किरण आणि त्याची भेट, लग्न, मध्यमवर्गीय घरातील संसार , नोकरीची असलेली निकड आणि नवरा बायको च्या नात्यात निर्माण होणारे वेगवेगळे डावपेच व. पुनी सरळ शब्दात कुठलाही आड पडदा न ठेवता मांडले आहेत. एकाच परिस्थिती वर स्त्री आणि पुरुष खूप भिन्न विचार करतात आणि तिथेच संसाररूपी ज्वाळेच्या ठिणग्या उडतात हे किती तरी शतके चालू आहे. पार्टनर ही व्यक्ती कोण आणि त्याचे श्री च्या आयुष्यातले स्थान हा कथेचा मुख्य गाभा आहे. या व्यक्तीचे व्यक्तिमत्व कथेत क्षणो क्षणी बदलते. पूर्ण पुस्तक वाचूनही पार्टनर खरं कसा आहे हे सांगणे मला तरी कठीण वाटते. या पात्राच्या तोंडी जी वाक्य आहेत ती एवढी अप्रतिम आहेत की २ ओळीत जीवनाचे सार सांगितल्या सारखे वाटते. “मी तुला कोणत्या नावाने हाक मारू? पार्टनरच म्हण …. खरं तर आपल्याला नावच नसतं बारश्याला ठेवतात ते देहाचं नाव….” या वाक्यात किती खरे पणा असावा??? “आपल्याला हवा तेव्हा तिसरा माणूस न जाणे म्हणजे नरक “ हे वाक्य आपण रोज नाही का अनुभवत?? संसार रथाला असलेली चाके निखळल्यावर झालेली दोघांची आणि संसाराची अवस्था आपण रोज नाही का पाहत? कोणा वाचून कोणाचे अडत नाही याची प्रचिती आपल्याला नाही का वरचेवर येत? पुस्तकाचा शेवट अतिशय हृदयद्रावक असा असून मन विदीर्ण होते पण तेही १० पैकी ४ घरात घडत असेलच की. थोडक्यात प्रत्येकाची कहाणी आणि सारांश या १५० पानांच्या कादंबरी मध्ये कुलूप लावून बंद केला आहे. पण प्रत्येकाने एकदा तरी ते कुलूप उघडून श्री च्या घरात डोकावून या… तिथे तुम्हीच स्वतःला सापडाल…. -सायली गुप्ते