"Many marathi authors write short stories, long stories but ranjit desai has adopted a very unique style. His story blends harmoniously with the magnificent background. It is always coloured in beautiful shades of blue, giving everything a dreamy touch.
प्रसिद्ध कादंबरीकार , कथालेखक , नाटककार . रणजित देसाई मूळचे कोल्हापूरच्या कोवाडचे. इंग्रजी शाळेत असतानाच त्यांनी लेखनाला सुरुवात केली. कोल्हापूरच्या ' महाद्वार ' मधून त्यांनी कथालेखन करायला सुरुवात केली.
इंटर नापास असलेल्या देसाई यांनी १९४७ मध्ये प्रसाद मासिकाने आयोजीत केलेल्या कथास्पर्धेत भैरव ही कथा सादर केली. त्यांच्या कथेला पारितोषिक मिळाले. या पारितोषिकामुळे त्यांच्या कथालेखनाला प्रोत्साहन मिळाले. रुपमहाल (१९५२) , कणंव (१९६०) , जाण (१९६२) , कातळ (१९६५) , गंधाली (१९७१) , कमोदिनी (१९७८) , आलेख (१९७९) , मधुमती (१९८२) , मोरपंखी सावल्या (१९८४) असे अनेक लोकप्रिय कथासंग्रह त्यांनी लिहिले.
सामाजिक आशयाच्या , ग्रामीण परिवेशातील त्यांच्या कथांमधून त्यांच्या लेखनाची खास वैशिष्ट्ये जाणवतात. खेडुतांच्या जीवनाचे चांगुलपणा मांडणा-या आकर्षक शैलीतील कथा त्यांनी लिहिल्या. बारी , माझा गाव , या प्रारंभीच्या कादंब-यांनंतर १९६२ मध्ये थोरल्या माधवराव पेशव्यांच्या जीवनावर त्यांनी स्वामी ही कादंबरी लिहिली.
या कादंबरीने त्यांना लोकप्रियतेच्या शिखरावर नेले. त्यानंतरच्या श्रीमानयोगी या शिवाजी महाराजांवर लिहिलेल्या कादंबरीने त्यांची कादंबरीकार म्हणून असलेली लोकप्रियता आधिकच वाढली.
ऐतिहासिक वातावरणाचे वैभव आणि व्यक्तीरेखांना दिलेली भावोत्कट उंची यांमुळे त्यांच्या ऐतिहासिक कादंब-यांनी लोकमानस जिंकले. स्वामीतील माधवराव आणि त्यांची पत्नी रमा तसेच श्रीमानयोगीतील शिवाजी आणि त्यांचे गुरु रामदासस्वामी यांच्या नात्यांना देसाई यांनी वेगळी परिमाणे दिली. लक्ष्यवेध (१९८०) , पावनखिंड (१९८०) , कर्णाच्या जीवनावरील राधेय (१९८६) , राजा रविवर्मा (१९८६) , अशा अनेक ऐतिहासिक पौराणिक कादंब-या लिहून देसाई यांनी या प्रकारच्या कादंब-यांचे युग स्वातंत्र्योत्तर काळात निर्माण केले.
गरुडझेप (१९७३) , रामशास्त्री (१९८३) , स्वरसम्राट तानसेन , हे बंध रेशमाचे , कांचनमृग , धन अपुरे , वारसा , स्वामी , आदी नाटकेही त्यांनी लिहिली. नागीण , रंगल्या रात्री अशा , सवाल माझा ऐका या चित्रपटांचे पटकथालेखन , स्नेहधारा , मी एक प्रेक्षक असे लेखसंग्रहही त्यांनी लिहिले.
मधुमती ! रणजित देसाईंनी लिहिलेला हा कथासंग्रह प्रत्येक मराठी वाचकाने वाचावा असा आहे. सर्व कथा मंत्रमुग्ध करणाऱ्या आहेत. ताजमहाल, चांदीरा, उन्मेष, रसूल, प्यारीबाई आणि अर्थातच मधुमती यांचा विशेष उल्लेख करावा लागेल. कला - संगीताच्या महफिली आणि त्यात मंत्रमुग्ध झालेली पात्रे ही बऱ्याच कथांची समानता आहे. सोबत विड्याच्या पाने आणि मदिरेच्या सुरया - पेलेही आहेत. मानवी भावना आणि नातेसंबंधांमध्ये त्यांची होणारी ओढाताण देसाईंनी अप्रतिम रेखाटली आहे. आणि म्हणूनच या कथा काळजाला भिडणाऱ्या आहेत. 'मधुमती' हे नाव आणि चंद्र, समुद्रकिनारा, मदिरेची सुरई, फुले आणि तंबोरा यांचा समावेश असलेले मुखपृष्ठ या कथासंग्रहाला अगदी समर्पक आहे. हा कथासंग्रह प्रवासात किंवा धावपळीचं वाचण्यासाठी नाही. शांत, एकांत वेळी आणि जमल्यास निसर्गाच्या सानिध्यात वाचल्यास उत्तम. काहीतरी दर्जेदार वाचल्याचे समाधान मिळेल हे नक्की.
Ranjeet Desai's writing style is amazing as always. Tajmahal, chandira, rasool and Madhumati were best stories. Taj Mahal was superb of all. Must read. For other stories were not bad but expectations raises after reading tajmahal.
It's a collection of short stories in writers signature style. Music, Liquor, Love. Lovers and their sacrifice for love and passion for art. madhumati is best one among them. Rasul is also a good story, Rasul is struggling to manage his love, his friendship and his passion. In Bakul an aged artist is telling a story about his only student. In Babali, raysaheb was unable to recognize babli's love and devotion towards him. Unmesh is a love story between Uma and ravikant both rich, where uma's unconditional love brings ravikant to good values.
This entire review has been hidden because of spoilers.
सुंदर व मनाला भावणाऱ्या कथा. रणजित देसाई यांच्या कथेची नायिका ही कथेचा आत्मा आहे. अतिशय रूपवान, नाजूक, प्रेमळ अशी तिची प्रतिमा अन तितकाच रसिक स्वभावाच्या पुरुष कथेत नायिकेची साथ देतो. अप्रतिम व मन मोहून टाकणारा असा कथासंग्रह.