Each nation has historical figures to worship. Apart from this, many a times each state of each nation has role models from the past but not forgotten history. Maharashtra has its own idols. The greatest and most loved of them all is shivaji maharaj.
प्रसिद्ध कादंबरीकार , कथालेखक , नाटककार . रणजित देसाई मूळचे कोल्हापूरच्या कोवाडचे. इंग्रजी शाळेत असतानाच त्यांनी लेखनाला सुरुवात केली. कोल्हापूरच्या ' महाद्वार ' मधून त्यांनी कथालेखन करायला सुरुवात केली.
इंटर नापास असलेल्या देसाई यांनी १९४७ मध्ये प्रसाद मासिकाने आयोजीत केलेल्या कथास्पर्धेत भैरव ही कथा सादर केली. त्यांच्या कथेला पारितोषिक मिळाले. या पारितोषिकामुळे त्यांच्या कथालेखनाला प्रोत्साहन मिळाले. रुपमहाल (१९५२) , कणंव (१९६०) , जाण (१९६२) , कातळ (१९६५) , गंधाली (१९७१) , कमोदिनी (१९७८) , आलेख (१९७९) , मधुमती (१९८२) , मोरपंखी सावल्या (१९८४) असे अनेक लोकप्रिय कथासंग्रह त्यांनी लिहिले.
सामाजिक आशयाच्या , ग्रामीण परिवेशातील त्यांच्या कथांमधून त्यांच्या लेखनाची खास वैशिष्ट्ये जाणवतात. खेडुतांच्या जीवनाचे चांगुलपणा मांडणा-या आकर्षक शैलीतील कथा त्यांनी लिहिल्या. बारी , माझा गाव , या प्रारंभीच्या कादंब-यांनंतर १९६२ मध्ये थोरल्या माधवराव पेशव्यांच्या जीवनावर त्यांनी स्वामी ही कादंबरी लिहिली.
या कादंबरीने त्यांना लोकप्रियतेच्या शिखरावर नेले. त्यानंतरच्या श्रीमानयोगी या शिवाजी महाराजांवर लिहिलेल्या कादंबरीने त्यांची कादंबरीकार म्हणून असलेली लोकप्रियता आधिकच वाढली.
ऐतिहासिक वातावरणाचे वैभव आणि व्यक्तीरेखांना दिलेली भावोत्कट उंची यांमुळे त्यांच्या ऐतिहासिक कादंब-यांनी लोकमानस जिंकले. स्वामीतील माधवराव आणि त्यांची पत्नी रमा तसेच श्रीमानयोगीतील शिवाजी आणि त्यांचे गुरु रामदासस्वामी यांच्या नात्यांना देसाई यांनी वेगळी परिमाणे दिली. लक्ष्यवेध (१९८०) , पावनखिंड (१९८०) , कर्णाच्या जीवनावरील राधेय (१९८६) , राजा रविवर्मा (१९८६) , अशा अनेक ऐतिहासिक पौराणिक कादंब-या लिहून देसाई यांनी या प्रकारच्या कादंब-यांचे युग स्वातंत्र्योत्तर काळात निर्माण केले.
गरुडझेप (१९७३) , रामशास्त्री (१९८३) , स्वरसम्राट तानसेन , हे बंध रेशमाचे , कांचनमृग , धन अपुरे , वारसा , स्वामी , आदी नाटकेही त्यांनी लिहिली. नागीण , रंगल्या रात्री अशा , सवाल माझा ऐका या चित्रपटांचे पटकथालेखन , स्नेहधारा , मी एक प्रेक्षक असे लेखसंग्रहही त्यांनी लिहिले.
शिवाजी महाराजांनी केलेला अफझलखानाचा वध ही महाराष्ट्रातील लहानथोरांना माहित असणारी रोमांचक कहाणी आहे. कितीही वेळा ऐका किंवा वाचा, त्यातला थरार अजिबात कमी होत नाही. अशी उत्तम कहाणी जेव्हा रणजित देसाईंसारख्या दैवी लेखणीतून उतरते, तेव्हा तो तर दुग्धशर्करा योगच ! देसाईंच्या इतर पुस्तकांप्रमाणे हेही पुस्तक एकदा वाचायला घेतले कि खाली ठेवणे अशक्य आहे. कथेतले अनेक बारकावे या पुस्तकातून नव्याने समजले. खानाशी युध्द्व करतानाही त्याने आणलेले अफाट हत्ती-घोडे यांना धक्का लागणार नाही याची घेतलेली काळजी, खानाचे वकिल कृष्णाजी भास्कर यांच्याकडून खानाचा खरा हेतू हेरणे, खानाने आणलेले जड-जवाहिरे स्वराज्याच्या तिजोरीत सामावून घेणे अशा सर्व प्रसंगात राजांची मुत्सद्देगिरी इतकी उत्तम ऊठून दिसते की काय सांगावे. श्री समर्थ रामदास स्वामींशी असलेले महाराजांचे घट्ट नाते, त्यातून समर्थांनी राजांना येणाऱ्या संकटाची अगोदरच सूचना देणे आणि महाराजांनी समर्थांच्या सुरक्षिततेसाठी महाबळेश्वर सोडण्याची विनंती करणे हेही प्रसंग उत्तम आहेत. जावळी खोऱ्याचे, प्रतापगडाचे आणि खानाच्या छावणीचे वर्णन इतके प्रभावी आहे की वाचकांच्या डोळ्यासमोर या गोष्टी दिसतात. प्रत्येक मराठी वाचकाने नक्की वाचावे असे हे पुस्तक आहे.
लेखकाने अत्यंत सरळ आणि उत्कृष्ट वर्णन केले आहे. रणजीत देसाई ह्यांची लेखनशैली ओळखीच्या वाचकांना नवीन नाही. वाचन करताना डोळ्यांदेखत घटना घटित व्हावी असे लेखन केले आहे. पुस्तक संपुष्टात आणताना राजे गड उतरून पन्हाळा मोहिमेस प्रारंभ करतात, ह्याची कल्पना येते. परंतु शेवट अर्धवट केल्यासारखा भासतो. परंतु, ११० पानाच्या ह्या कथारुपात आमच्या छ्त्रपती महाराजांना किती समस्यांना सामोरे जावे लागले, हा विचार करून अभिमान आणि कर्तव्याची जाणीव झाल्याशिवाय राहत नाही .
बारा मावळांत स्वराज्याचं रोपटं रुजतं न रुजतं, तोच अफजलखानाचं संकट अवतरलं. वाईपासून प्रतापगडापर्यंतच्या हिरव्यागर्द रानावर राजकारणाचा पट मांडला गेला. चढे घोडियानिशी राजांना पकडून नेण्याची अफजलखानाची गर्वोत्त्की होती; आणि खानास मारल्याविना राज्य साधणार नाही, हे राजे पुरे जाणून होते. या दोन राजकारण-धुरंधरांनी खेळलेला डाव म्हणजेच ‘लक्ष्यवेध’.