Jump to ratings and reviews
Rate this book

Mazya Bapachi Pend (Marathi)

Rate this book
Otherwise famous for his humour, Da Ma colours the canvas in a different colour this time. Grief, longing, being away from near and dear…….. Colours not seen before, each story has a unique shade. Each reveals different pain. The story of the king titled perfectly as to Once Upon A Time…….. is the best example of this. The comedian in the Courts of the king helps him to win the heart of the most wise and beautiful damsel in the town. He uses all his wit so as to bring the beautiful maiden in the king’s palace. At the end, when he realizes that it is the wittiness that the lady was fallen for and not name or fame of the king, he pities himself. It could have been he himself who could have become the partner of the lady. She was not impressed with the king’s wealth neither craved for bravery. What she wished was a mind equivalent to her talents………. Alas……….

167 pages, Kindle Edition

Published January 1, 1957

69 people are currently reading
92 people want to read

About the author

D.M. Mirasdar

31 books46 followers
Dattaram Maruti Mirasdar (Devanagari: दत्ताराम मारुती मिरासदार) (born 1927) is a Marathi writer and narrator principally of humorous stories. He hails from Pandharpur(Maharashtra).

Many of Mirasdar's humorous stories revolve around village life in Maharashtra. However, some of his stories concern the serious social issues and lives of the poor living in villages. His stories Gavat, Ranmanus, Kone Eke Kali, Bhavaki, Hubehub, and Sparsha belong to the latter class.

For some years, Shankar Patil, Vyankatesh Madgulkar, and Mirasdar jointly presented, in different towns in Maharashtra, highly popular public recitations of their short stories.

Mirasdar was a professor of Marathi in a college in Pune. He is currently the Acting President of Maharashtra Sahitya Parishad, Pune.

Ratings & Reviews

What do you think?
Rate this book

Friends & Following

Create a free account to discover what your friends think of this book!

Community Reviews

5 stars
97 (47%)
4 stars
64 (31%)
3 stars
31 (15%)
2 stars
4 (1%)
1 star
7 (3%)
Displaying 1 - 7 of 7 reviews
2,142 reviews27 followers
August 27, 2022
All good to excellent stories, the collection alternates between humour and various other shades of emotions evoked in reading.

Someone like Mirasdar, who can and most often does make one explode with unexpected laughter as he does in the very first story, 'माझ्या बापाची पेंड', next going on to writing something like 'भावकी' is so unexpected, it makes one wonder.

Does everyone with such capabilities for humour, before acquiring such capabilities, necessarily have seen such horrors in life, experienced such cruelty, such pathos, before a spirit can grow to find it in oneself to give such laughter to the world?

Pathos, although not the horror, repeats in the next story,
नव्याण्णवबादची एक सफर. Mirasdar begins it in a style normally used, across all cultures, in literature of yore, of romantic genre revolving around adventures and courage, but he's only using it in telling of someone completely opposite of expectations aroused by the style - and yet, one only becomes conscious of this little hint of humour signifying the pathos at the very end, when finally the pathos is revealed bare of all humour.

In कळस, he surprises with multiple twists, last one leading to a smile.

But next, सोन्या बामण, again with multiple twists, goes opposite, from pathos to horror to complete melting of heart. From being disgusted at yhe grown up man who was a poor boy, one finds oneself absolving him because the boy was good, kind, compassionate beyond his years.
***

माझ्या बापाची पेंड

"“गांजा सापडला त्या कडब्याच्या खोलीत. पेंडीत ठिवला हुता म्हणं! बेकायदा इकत व्हता. सापडला आज. धरला आन् नेला.”

"मग बाजूला बसलेला एक तांबड्या डोळ्यांचा म्हातारा म्हणाला,

"“व्हय रे बाबा, व्हय नेला की रं तुझ्या बा ला धरून. इक्ता मोठा गांजा; पण समदा तुडिवला मुडद्यांनी.”

"ते ऐकून मला काही विशेष वाटले नाही. आमचा बा खंबीर होता. त्याची काळजी नव्हती.

"– पण भीती एवढीच वाटली, की मास्तरांच्या खिशातून पडलेले तुकडे हेडमास्तरांना आवडले, तर काय घ्या?"
***

भावकी

"बामणआळीच्या अगदी टोकाला बल्लाळाचा वाडा होता. वाड्याचा दरवाजा दगडी होता. आणि घोड्यावरची असामी जाईल इतका उंच. आत मोठे लांबोळके अंगण. दोन्ही बाजूंना मोठ्या खणाच्या एकमजली इमारती. पडायला झालेल्या त्या जुनाट घरातून देशपांडे घराण्यातली सगळी कुटुंबे राहत. पडझड थांबवण्याइतकी ऐपत कोणाचीच नसे. ही मंडळी मोठ्या दाराचा, परसदाराचा नि अंगणाचा समाईक उपयोग करीत. तिथे स्वत:च्या मालकीचे खण सोडून बाकी सगळे समाईकात होते. ... या घरातला धूर त्या घरात गेला, तरी ते निमित्त भांडणाला पुरे वर्दळ माजे. मग कोर्टात खटले-खोकले, दावेदोरखंडे चालत. शेताचे तुकडे विकून सरकारी अधिकाऱ्यांची धन होई. त्याचा निकाल लागायच्या आत नवी चारदोन भांडणे झालेली असत."
***

नव्याण्णवबादची एक सफर

"आणि मग संध्याकाळच्या त्या शांत, उदास वेळेला नानाच्या आयुष्याला पुन्हा एकदा अर्थ आला. तो गोष्ट सांगत राहिला. माणसे तन्मय होऊन ऐकत राहिली आणि ते रुक्ष, भकास वातावरण पुन्हा एकदा अद्भुततेने भरून गेले."
***

कळस

"चेहरा दिसत नव्हता; पण तुकाने त्या अंधारातही ते माणूस बरोबर ओळखले. अंगाला आळोखेपिळोखे देऊन तो कंटाळलेल्या आवाजात म्हणाला,

"“कोन राधे, आलीस का तू?”

"राधा मंजुळ आवाजात बोलली, “कवाधरनं त्या समूरच्या ववरीत बसून ऱ्हायले हुते मी.”

"“त्ये वळखलं मी, तकडची पाकुळी उडाली तवाच.’

"राधा हसली आणि म्हणाली,

"“गेली का मानसं समदी?”

"यावर तुकाही थोडासा हसला.

"“गेली. मला वाटलं, हितंच झोपत्यात काय की! मग काडलं काय तरी बोलल्यावरनं बोलनं. पैशे मागितले. मंग काय? पळाले समदे!”

"मग घोगऱ्या आवाजात तो पुढे म्हणाला,

"“आता काय भ्या न्हाई. ये वर!”"
***

सोन्या बामण


"सोन्या माझ्याजवळ आला. अगदी मुकाट्याने आला. तो काही बोलला नाही. चालला नाही. माझ्या हातातला वाळूचा गोळा तेवढा त्याने काढून घेतला आणि खाली टाकला. मग एवढेच म्हणाला,

"“जाऊ दे. मारु नकोस त्याला.”

"मला पुन्हा चमत्कारिक वाटले. मारू नको? का? सोन्याने हे असे कसे सांगितले?

"“का रे? का मारू नको?”

"यावर कधी न होणारा त्याचा चेहरा बापडा झाला. कळवळून तो म्हणाला,

"“नको रे. जाऊ दे त्याला. आई-बाप नाहीत त्या पोराला. त्याला नको मारूस.”

"बस्स! सोन्या एवढेच म्हणाला. अडखळत अडखळत म्हणाला आणि त्याच्या डोळ्यात पाणीच आले.

"आज सोन्याची एवढीच आठवण मला येते."
***

कोणे एके काळी

" ... डोळ्यांच्या कोपऱ्यात साचलेले पाणी मी केव्हा पुसून टाकले, हे कोणाला कळलेही नाही."
***

माझी पहिली चोरी

" ... वर्तमानपत्रात आमच्या घरच्या चोरीची बातमी होतीच. टपालात बहुतेक नातेवाइकांची पत्रे होती. सगळ्या पत्रांतून ‘तुमच्या घरी चोरी झाल्याचे वर्तमानपत्रांतून वाचले’ अशी सुरुवात होती आणि ‘समक्ष येत आहोत, काळजी करु नये’ असा मजकूर होता. पत्राव्यतिरिक्त चारदोन ताराही होत्या. ‘समक्ष येत आहोत, तोपर्यंत भिंतीचे भोक बुजवू नये’ अशी सगळ्या तारांमधून आगाऊच सूचना दिलेली होती.

"आश्वासन दिल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत सगळे नातेवार्इक सहकुटुंब येऊन दाखल झाले. चुलतभाऊ, चुलतचुलतभाऊ, मावसभाऊ, आतेभाऊ, मामेभाऊ, मावस-आतेभाऊ, आते-मावसभाऊ, आर्इवडील, सासूसासरे, मेव्हणे, मेव्हण्या, साडू, इत्यादी सारे जवळचे नातेवार्इक तर आलेच; पण आणखी त्यांचेही नातेवार्इक माझ्या समाचारासाठी आले. त्यामुळे माझ्या घराला एखाद्या लग्नघराचे स्वरुप आले."

" ... पाहुणेमंडळी हिंडायला बाहेर पडली आणि मी त्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात गुंतलो. नाही म्हटले तरी पन्नास-पाऊणशे मंडळी आलेली होती. त्यामुळे घरात गर्दी वाटतच होती. अनायासे खर्च होतोच आहे, तर या गडबडीत पोराची मुंज उरकून घ्यावी, असा एक धूर्तपणाचा विचार माझ्या मनात आला. पण मी तो बोलून दाखवल्यावर सगळ्यांनी त्याला मोडता घातला. हा दु:खाचा प्रसंग आहे, आम्ही तुमचे सांत्वन करण्यासाठी आलो आहोत, अशा वेळी मुंजीसारखी मंगल गोष्ट नको, असे म्हणून सर्वांनी तो विचार हाणून पाडला."
***

रानमाणूस

" ... “हां. आता तुझं काम. बोल. बघ ही यादी. वाच.”

"मी ते सगळे प्रकरण दुरूनच बघितले. गाडगे, बांबू, चिपाडे... मला अर्थबोध होर्इना.

"“बघितली. काय मला समजलं नाही.”

"“समजेल हं आता!” कडवट आवाजात तो म्हणाला, “अरे, काय माझं दिवाळं काढायचं ठरवलं होतं का काय तुम्ही?”

"“दिवाळं?”

"“तर!” यादीकडे नजर ठेवीत तो कर्कश आवाजात ओरडला, “पंचेचाळीस रुपये कसे झाले? परवा रात्री मसणात दोन बत्त्या आणल्यात तुम्ही! दोन बत्त्या न्यायला काय मला जाळायचं होतं काय?”"
***

झोप

"असा प्रकार पहाट होर्इपर्यंत चालला. नागूला उठवायचा प्रयत्न करून करून त्या भामट्याच्या अंगाला दरदरून घाम सुटला. त्याच्या कपाळावरून, गळ्यावरून घामाचे ओघळ वाहू लागले. मारून मारून हात दुखले. बोलून बोलून आधीच घोगरा असलेला त्याचा आवाज बसला. पण नागू गवळी जागा झाला नाही. कलियुगातल्या परमेश्वराप्रमाणे तो गाढ झोपेतच राहिला...."
***

व्यंकूची शिकवणी

"“ती हल्ली माझ्याकडे असते.”"
***

हरवल्याचा शोध

"आम्ही दोघेही सभ्य आणि सात्त्विक माणसे अशा रीतीने पुढे चाललो."
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
August 27, 2022 - August 28, 2022.
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
2 reviews1 follower
February 18, 2024
शेंगदाण्याची पेंड...
माझ्या बापाची पेंड बनल्यामुळे उडालेला सावळागोंधळ...
अनंता व केशव या शाळकरी मुलांमध्येही निर्माण झालेली भ���वकीतली तेढ...
स्वतःच्या अन् दुसऱ्याच्याही आयुष्याला अर्थ प्राप्त करून देणारी, नाना घोडकेची नव्याण्णवबादची एक सफर...
आई बापाविना वाढलेल्या सोन्या बामणाची अधोगती...
मुलाच्या मृत्यूनंतरही कोरडा राहणारा रानमाणूस...
शिष्याने गुरुलाच दिलेले व्यावहारिक धडे आणि गुरूने शिष्याला दिलेली टांग म्हणजे व्यंकुची शिकवणी...
इनामदाराच्या जावयाचा हरवलेला घोडा आणि त्याला शोधण्यासाठी झालेली वणवण, परंतु शेवटी घोड्याबरोबरच मिळालेली राधेची थोडीशी जवळीक म्हणजेच हरवल्याचा शोध...
कुभकर्णासारखा झोपनारा आणि चोर आला तरी ना उठणारा पैलवान गडी नागू गवळी...
चोरी झाल्यावर नुसत्या उठाठेवी करणाऱ्या लोकांपासून वाचण्यासाठी अण्णासाहेबांनी केलेली माझी पहिली चोरी...
राधेला भेटण्याच्या वेळी अनाहूतपणे आलेल्या गावकऱ्यांना कळस बांधण्याच्या कामासाठी वर्गणी गोळा करायला सांगून, सुरुवात त्यांच्यापासून करायला सांगणारा तुका पैलवान...
अशा अनेक कथा विनोदी अंगाने मांडणाऱ्या द मा मिरासदारांची आणखी एक मिरासदारी!
3 reviews
January 18, 2022
funny and unique

All stories and refreshing and unique. A must read masterpiece from d ma Mirasdar. Should not miss thus book if you are mirasdar fan.
10 reviews
October 28, 2022
Heartfelt and light read

वाचावे आणि वाचत रहावे. First read from DM Mirasdar and felt really good. Planning to read all books of Mr. Mirasdar
Profile Image for Geetanjali.
87 reviews6 followers
June 17, 2020

विनोदी कथासंग्रह असला, तरी सगळ्याच कथा अगदी खळखळून हसवणाऱ्या नाहीत. पण बऱ्याच कथा मजेशीर आहेत. एकूण अकरा गोष्टींपैकी, “माझ्या बापाची पेंड, भावकी, नव्व्याण्णवबादची एक सफर, कोणे एके काळी, झोप, आणि हरवल्याचा शोध” या गोष्टी मला विशेष मनोरंजनात्मक वाटल्या आणि आवडल्या. यातील ‘व्यंकूची शिकवणी’ ही कथा पूर्वी कधीतरी ( कदाचित दहा-पंधरा वर्षांपूर्वी असेल) सह्याद्री वाहिनीवर पाहिल्याचं आठवतं.. निखिल रत्नपारखी आणि अंशुमन विचारे अभिनीत ही कथा बहुधा नंतर हिंदी भाषेतही भाषांतरित केली गेली होती.
107 reviews
September 17, 2019
some of the funniest stories I have encountered in marathi literature. Worth reading once.
Profile Image for Sujay Sawant.
102 reviews1 follower
February 15, 2023
दर्जेदार कथा आणि मनोरंजनात्मक लिखाण. बहुतांश कथा मिश्किल पठडीतील असल्या तरी मानवी स्वभावाचे अनेक पैलू उलगडणारे आहेत. Must Read !!
Displaying 1 - 7 of 7 reviews

Can't find what you're looking for?

Get help and learn more about the design.