What do you think?

Kajalmaya
A Novel By G A Kulkarni
309 pages, Kindle Edition
First published January 1, 1972
About the author
G.A. Kulkarni
31 books96 followersG.A. Kulkarni or simply "GA” was a legendary Marathi writer of short stories.
GA, who bought new strength and vitality to the Marathi short story, is admittedly the most distinguished exponent of that genre. He did not subscribe to the cause of modernism in literature. He charted his own separate course and cultivated new acuity and taste for a class of faithful readers.
GA created a world of his own in his short stories where his characters are in pursuit of the unknowable destiny. A dark mode reflects the inscrutable ways in which destiny shadows his characters. His use of symbolism, allegory and irony provides his stories a unique texture and ethos. His world encompasses a wide diversity of locales, situations, characters and experiences. The mythic, allegorical experiences make it difficult to sort out the realities from the dreams, themes, and meditations. Yet, it is possible for the reader to identify with is characters, places, and experiences because of his keen observation of human, animal, and social worlds in their beauty and deformity.
Critics observe that characters in GA’s world are multifaceted, but they are not independent. They lead their lives as if they are puppets guided by an unseen hand are unable to change the direction. Why they follow that path to their demise or why they cannot change it by their volition is not known. In that sense, his work is a reversal of direction fostered by the modernist short story in Marathi. GA's earlier short stories depicted the tragic and cruel aspects of human situation.

Ratings & Reviews
Friends & Following
Create a free account to discover what your friends think of this book!
Community Reviews
Displaying 1 - 14 of 14 reviews
October 2, 2017
Little bit difficult to read, different style, the general theme of this book is sadness, despair, negativity in life, dark shades. for the change of topic, I picked it up and read. Author's writing style is convincing and detailed. I like this book but I wont read any other books of this author,one seems more than enough for me.
Latest re-review= I will read all books of G A kulkarni. Finally ,Read whole book, I like all the stories. some of my favourite stories are Pradakshina (very depressing), Kalsutra, Ratna (abstract), Vidushak (philosophical masterpeice and my most favourite).

July 25, 2026
१९७२ - काजळमाया
जी. ए. कुलकर्णी
-------------
मराठी साहित्यातील निवडक, वेचक कथालेखक, कादंबरीकार आणि कवी यांच्या सहज मिळू शकतील अशा काही प्रातिनिधिक साहित्य कृती वाचून, त्याविषयी मला वाटणारे विचार लिहणे व साहित्यिक आवड असणाऱ्या मोजक्याच मित्राऺना पाठवणे असा एक माझा छंद आहे.
तर आता उदाहरणार्थ जी. ए. कुलकर्णी..
अचाट कल्पनाशक्ती, विलक्षण शब्द सऺपदा अन् त्यावरील प्रभुत्व, सखोल प्रतिभा, अर्थघन शैली, कनिष्ठ आणि निम्न मध्यमवर्गीय नागरी व ग्रामीण जीवनातील सऺस्कार, सऺस्कृती, विकृती, अस्तित्व सऺघर्ष, पापभीरुता, त्या बरोबरच सोऺग-ढोऺग, पाखऺडीपणा, षड्रीपू, श्रद्धा, अंधश्रद्धा, वैचारिक विरोधाभास, जादूटोणा, अघोरी विद्या, उत्पीडन, व्यथा व प्रामुख्याने कधीही न सऺपणारी, मानवीय जीवनातील सर्वव्यापी, ठसठसणारी चिरऺतन वेदना या व तदानुषऺगिक अनेक गोष्टीऺविषयी चौफेर अभ्यासपूर्ण जाणीव, व्यापक सखोल ज्ञान आणि लेखनामधून सऺदर्भानुसार त्या त्या धाग्याऺची नेमकी पकड घेणारी वीण याबाबतीत जीए श्रेष्ठ वाटतात हे अगदी खरं आहे.
परंतु, समीक्षक गऺगाधर गाडगीळ यांच्या मते, लेखन वेगळ्याच वैशिष्ट्यपूर्ण रितीने खरोखरच जरी अत्यंत प्रभावशाली असले, तरीही...
जी.एं.च्या बहुतांश कथा म्हणजे सहज, सोप्या आनंदाकडे सतत पाठ फिरवून दुखः, दैन्य, पराकोटीच्या वेदनांना गळामिठी मारून, जीवन-परांङमुख, अत्यंत नैराश्यवादी व परिस्थितीशरण मानसिकतेने पिचलेल्या मनुष्यांची कळकट, ओशट, काळीकभिन्न व बेंगरूळ आयुष्ये.... ज्यामधे एखाद्या पात्राचा खंगत खंगत अतिकरूण मृत्यू वगैरे बहुधा असतोच.
नाहीतर ...
दुसरे टोक म्हणजे अलौकिक, अचाट व अतर्क्य काल्पनिक जगतातल्या (भव्य महाल, राजे, राजवाडे इ.) आत्यंतिक ऐश्वर्य-विलासी, नवलकथांचे स्वप्नवत नेत्रदीपक रंगबिरंगी इमले!
अजब पात्रांच्या गजब कथा वगैरे वगैरे...
एका - काहीशा अतर्क्य - मनोविकृतीने पछाडलेल्या प्रतिभावंताचा चाकोरीत अडकलेला साहित्य विलास असा एकूण गाडगीळांच्या समीक्षेचा गोषवारा.
कदाचित जीएनी, त्यांनीच म्हणल्याप्रमाणे "आय वॉन्ट टू कट क्लोजेस्ट टू द नर्व कॉझिऺग पेन" ह्यामुळे अशा मर्यादा स्वतःहून टाकून घेतलेल्या असाव्यात.
जीए आणि त्यांचे बरेच चाहते त्याऺच्या "कथाकथनातील तोचतोचपणा.." या आक्षेपावर स्ट्रिऺडबर्ग या पाश्चात्य लेखकाच्या वाक्याचे उदाहरण देतात.
तो म्हणतो "मीडिऑकर्स डिमांड व्हरायटी"... असो!
एक प्रातिनिधिक उदाहरण म्हणून मी जीएंचा कथासंग्रह "काजळमाया" वाचला.
या १९७२ साली प्रकाशित झालेल्या एकाच पुस्तकात वरील दोन्ही प्रकारच्या कथा आहेत.
पहिली "प्रदक्षिणा" आणि शेवटची कथा "विदूषक" मला स्वतःला खूप आवडल्या.
कथेतील प्रमुख पात्राच्या भावविश्वातील उलथापालथ या निकषावर "प्रदक्षिणा" ही नवकथाच आहे परंतु त्यामध्ये नित्य व्यवहारात सभोवताली घडणाऱ्या विविध घटनांच्या चमत्कारिक वाटणाऱ्या उपमा किंवा अतिशयोक्ती सारखे अलंकार नाहीत. त्याचा ढाचा हा पारंपारिक कथा कथनानुसारच आहे.
नुकत्याच दिवंगत झालेल्या रावसाहेब नामक - सामाजिक प्रतिष्ठा राजकीय पत असलेल्या - आपल्या पतींच्या स्मृतीमध्ये शांताक्का गढून गेलेल्या असतात. अगदीच सामान्य रूप व शिक्षण असलेल्या या शांताक्कांच्या उच्चशिक्षित आणि सुस्वरूप धाकट्या बहिणीशी, रावसाहेब तरुण असताना त्यांचे लग्न ठरलेले असते. परंतु काही परिस्थिती जन्य विचित्रच अनपेक्षित कलाटणीमुळे रावसाहेबांना शांताक्कांची लग्न करावेच लागते.
रावसाहेबांच्या तथाकथित कडक शिस्तीमुळे व त्यांच्या अत्यंत कठोर वर्तणुकीमुळे भाऊ, बहीण, मुला-बाळांसह सर्व नातेवाईक दुरावलेले असतात. विवाहित असूनही शांताक्का साऺसारिक जीवनातील पहिल्या दिवसापासून अक्षरशः एखाद्या अस्पॄश्य परित्यक्तेचे जीवन जगत असतात. त्यांची एकमेव छोटीशी समाधानाची बाजू अशी की एका प्रतिष्ठित व्यक्ती असेलेल्या समाजात वजन असलेल्या रावसाहेबांच्या आपण पत्नी आहोत.
निधनानंतरचे सोपस्कार म्हणून कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईक त्यांच्या घरी येऊन दोन दिवसातच निघून जातात. रावसाहेबांच्या कर्तव्य कठोर वर्तणुकीमुळे दुरावलेल्या या नातेवाईकांपैकी (बहीण, दीर, मुलं) कोणीतरी आपली स्थिती, मनस्थिती समजून उमजून आपल्याला साथ देईल अशी एक त्यांना आशा असते. पण त्या दोन-तीन दिवसांमध्ये त्या सर्वांशी झालेल्या संभाषणातून शांताक्कांना रावसाहेबांची माहिती नसलेली अत्यंत काळीकुट्ट , दुष्ट, कपटी आणि रंगेल अशी बाजू दिसून येते.
मनं अतिशय दुखावलेले हे जीव ताबडतोब काढता पाय घेत परत निघाल्याने त्या अक्षरशः विदीर्ण होतात आणि परत एकटेपणाच्या अधिकाधिक खोल गर्तेत जाऊन पडतात.
वाचकांच्या मनाचा ताबा घेऊन शाऺताक्काऺच्या औदासिन्यपूर्ण विलक्षण मानसिक उलाघालीत त्यास ढवळून काढण्यात ही कथा यशस्वी झालेली आहे असं मला वाटतं.
शेवटच्या विदुषक या कथेचा आकृतीबंध पूर्णतः सालंकृत पौराणिक कथेसारखा आहे. जी.एऺ. चे टीकाकार नेहमी म्हणत की जीए कुलकर्णी हे मोठ्यांचा चांदोबा लिहितात ते या आकृतीबंधावरूनच! परंतु मला स्वतःला असे वाटते की आकृतीबंध हा केवळ कथाकथनातील अर्थघनतेचा वाहक असतो. कथेतील वैचारिक, भावनिक मर्म, त्याच्यातील सार, हे वाचकांना विविधतापूर्ण कसदार अशा साहित्यिक निर्मितीने अधिक श्रीमंत करत आहेत वा नाहीत हे बघणे जास्त महत्त्वाचे असावे. असो.
ही कथा गाजलेली आहे व वाचनाचा अनुभव मला स्वतःला एकप्रकारे संपन्न करणारा वाटला.
कुठल्याशा साम्राज्याच्या वयोवृद्ध महाराजांनी उत्तराधिकारी नेमण्यासाठी दिलेल्या सूचना व नियोजनबद्ध अहिंसात्मक प्रक्रिया अशा पार्श्वभूमीवर किंवा पूर्वपेठीकेवर ही कथा पुढे उलगडत जाते.
इच्छुक स्पर्धकांनी पार पाडावयाची दिव्ये व त्यांचे विविध नियम, त्यात स्वतःहून निवडलेल्या सल्लागारांशी केलेली सल्लामसलत, टप्प्याटप्प्यावर अंतर्भूत असलेली अनेक प्रतीकं, प्रतिकाऺचा अन्वयार्थ लावत घेतलेले पर्याय निवडण्याचे निर्णय, कूटनीती, दडवलेली रहस्यं, रहस्य भेद, मृत्यूला दिलेली हुलकावणी इत्यादी अनेक चांदोबा वैशिष्ट्ये इथे भेटतात.
दोन राजकुमार, प्रधान, अमात्य, सेनापती, प्रमुख धर्मगुरु त्यांचे शिष्यगण, शेजारच्या पराभूत राजाचा पराक्रमी युवराज, अत्यंत चतुर (पंडित असलेला) विदुषक, राजघराण्यातील सुऺदर उपवर कन्या, दासी कन्या व डोऺब सुद्धा या व्यामिश्र प्रक्रियेत सहभागी असतात.
प्रतिकाऺमधे दडलेल्या सत्याचा - परिस्थितीला अनुसरून, व्यक्ती सापेक्ष, स्वार्थ सोयीस्कर, पूर्वानुभूतीवर आधारित, अंतर्मनाच्या आवाजाचा कौल घेत, संयमाने तर कधी पांडित्यपूर्ण विश्लेषणाने - लावलेला अर्थ हा कधीकधी कित्येक विसंगती दर्शवणारा व वैश्विक कसोटीला बगल देऊन विलक्षण अंतर्विरोध उभारून वर आणणारा असा असतो. तर कधीकधी घडून आलेल्या एकमेव अंतिम परिणामाची विश्लेषण एवं मीमाऺसा करणाऱ्या विचार पद्धती व्यक्ती निहाय किती परस्पर विरोधी असू शकतात याचे फारच मन गुंगवून टाकणारे अत्यंत प्रभावी शब्दचित्र जीए रेखाटतात.
विलक्षण शब्द प्रभुत्व, ओघवती शैली आणि जबरदस्त पकड! शब्दछल, बुद्धीभेद, अर्थ, अनर्थ, अन्वयार्थ इ. संभ्रमाचे फिरत्या रंगाचे जाल यांची धमाल!!
परंतु यासारख्या मनाची पकड घेणाऱ्या प्रभावी कथाऺसमोर बाकीच्या अनेक कथा म्हणजे ना धड वेडसरपणा आणि ना शहाणपणा अशा अंधुक, धूसर वा पुसट सीमारेषेवर विचित्र कल्पनाशक्तीने अनियंत्रितपणे विहार करणाऱ्या, एखाद्या - काहीशा गूढ अर्थानं - मनोविकृती कडे झुकत चाललेल्या लेखकाने मनातल्या आवरता येत नसलेल्या विविध पण विक्षिप्त कल्पनास्रोताऺचऺ केलेलं, वाहतं शब्दांकनच जास्त वाटतं!
कथासंग्रहातील "वंश" आणि "अंजन" या कथा तर अत्यंत किळसवाण्या, बीभत्स, अर्थशून्य आणि अनावश्यक वाटतात. प्रतिकात्मक वा रुपकात्मक दृष्टीने जरी त्यात काही अर्थपूर्णता - आपल्याला तितकीशी उमजून न आलेली - समजा असलीच, तरीही त्या एवढ्या गढूळ, विकृत, दुःख-पीडात्मक किनारा असलेल्या गहिऱ्या औदासिन्यामध्ये अगदी खोलवर बुचकळून का काढलेल्या आहेत हे काही उमगत नाही.
"पण कशाला हे असलऺ??" असा बेमालूम प्रश्न डोकं वर काढतोच....
लेखनाचे स्वरूप, प्रारुप व आकृतीबंध हा लेखकाचा विशेषाधिकार आहे हे तत्वतः मान्य करून सुद्धा व्यामिश्रते करता व्यामिश्रता, क्लिष्टते करता क्लिष्टता, अधिकाधिक दुर्बोधपणा या दृष्टीने पाहिलं तर काही कथा अक्षरशः अनाकलनीय व अनावश्यक वाटतात. त्यांचे चाहते "जीए रंजनाकरता लिखाण करत नाहीत" असे प्रतिपादन करतात, पण सर्व कथा काही मानवी जीवनातील आगळीवेगळी, सर्वस्पर्शी ज्ञानात्मक सखोलता, व्यापकता - भले क्लिष्ट किचकट आवरणातून का होईना - उभारुन आणतात अशातलाही काही प्रकार वाटला नाही..
(वैयक्तिक आकलन मर्यादा असणेही सहज शक्य आहे!)
लिखाणाच्या दर्जात्मकतेबद्दलचे - व्यक्ती सापेक्ष- वाद-विवाद बाजूला ठेवून, एक लेखन विशेष मात्र स्पष्ट उठून दिसतो की जीएंच्या लेखन शैलीचा प्रवाह किंवा कथनातील ओघवतेपणा हा निर्विवाद पणे अस्खलित आहे आणि तो फार कमी लेखकांमध्ये इतक्या प्रभावी प्रमाणात दिसून येतो.
कदाचित एकटं आयुष्य घालवणाऱ्या अत्यंत संवेदनशील आणि अविरत स्वैर विचार करणाऱ्या लेखकाची प्रसंगी संकेत संकल्पना झुगारून देऊन सतत लेखनाद्वारे व्यक्त होत रहाण्याची ही एक अत्यंत मूलभूत मानसिक आणि व्यक्तीगत गरज असू शकते.
साहित्य किंवा कुठल्याही कलेचा प्रांत हा व्यक्तीसापेक्ष असल्याकारणाने प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगळ्या. परंतु नोबेल पारितोषिक विजेत्या आणि/ किंवा पुलित्झर, बुकर पारितोषिक विजेत्या काही इंग्रजी साहित्यिकांचं थोडंसं क्लिष्ट किंवा व्यामिश्र असं लिखाण वा साहित्यकृती ह्या याच्यापेक्षा जास्त मनाला भावतात व अधिक श्रेष्ठ वाटतात.
परंतु मला स्वतःला "चाकोरीत अडकत राहिलेला प्रतिभावान" या समीक्षक टिपण्णी विरुद्ध केलेल्या जीएंच्या मल्लीनाथीचे - "मिडीऑकर्स डिमांड व्हरायटी" - हे जे काही कारण आहे ते तितकंसऺ पटल॑ नाही.
मर्यादा मानणं हे काही कोणालाही कमीपणा आणणारं कधीही असत नाही आणि त्यांच्या दोन चार अर्थगर्भ व निश्चितच प्रभावी कथा सोडता, एक हौशी साहित्य रसिक वाचक म्हणून मला जीए परिपूर्ण किंवा अत्यंत उत्कृष्ट चौफेर सर्वांगीण लिखाण करणारे उच्च साहित्यिक वगैरे काही वाटले नाहीत.
----निरऺजन आकूत.

January 11, 2023
A Masterpiece in Marathi Literature! एखाद्या कादंबरीचा आवाका असलेल्या ह्या दीर्घकथा थरारक अनुभव देतात!
"अंजन", "दूत" ह्या कथेंतील रहस्य चुटपुट लावतं. "विदूषक" अस्सल Storytelling चा नितांत सुंदर अविष्कार!
G A यांच्या कथांतून आजही अद्भुत Fantasy चित्रपट बनू शकतात.

Want to Read
February 5, 2020I AM FAN OF GA IN EIGHTYES. I READ THIS BOOK ,MANY TIMES AND STILL LIKE TO READ IT. IT IS ONE OF THE BEST BOOKS I READ.
July 15, 2023
प्रत्येक कथा एका वेगळ्या दुनियेत घेऊन जाते.. एखाद्या कादंबरीला लाजवेल अशा.. Great of all time.. GA♥️
October 22, 2025
I rarely write reviews for books online, but Kajal Maya compelled me to do so. This book is an absolute masterpiece. It’s a collection of short stories by G. A. Kulkarni, and my first introduction to his work, yet it left me completely awestruck.
Kulkarni is an exceptional writer. There are many things in this book that you might not fully understand at first, but the parts that you do grasp will stay with you forever. The sentences are so rich, layered, and beautifully crafted that you almost want to pause and reread them just to soak in their depth.
This is one of the most beautifully written Marathi books I’ve ever come across. If you want to explore Marathi literature or experience G. A. Kulkarni’s genius, I think Kajal Maya is the perfect place to start.
October 13, 2021
Very "meta" stories. The best part is that time/place does not matter for such fantasy settings. They never grow old because they are about human beings. About us.
The stories are not to be analyzed. They have to be felt and then let go.
The stories are not to be analyzed. They have to be felt and then let go.
Want to Read
October 10, 2019Watched a short film "Chaitra" based on Kulkarni's short story. From there got to know of him.
This entire review has been hidden because of spoilers.
Want to Read
April 18, 2020Good
June 29, 2020
अप्रतिम पुस्तक
July 19, 2020
अप्रतिम केवळ अप्रतिम
This entire review has been hidden because of spoilers.
April 1, 2015
As rightly said in the description of the book, its all about human sorrow,emotions.Favourite author,favourite book...these are gems of my personal liabrary
October 11, 2015
i loved it
December 21, 2018
I have read this book.... I just love his imagination....
Yes, stories are depressing but the imagination and life lessons are convincing.