पुण्याच्या कॉफीशॉपमध्ये जमणारा, ऐतिहासिक रहस्यांचा मागोवा घेणारा 'जेएफके' नावाचा कलंदर ग्रुप एका गडावरच्या भटकंतीत त्यांच्या हाती लागली एक अकल्पित खूण आणि मग सुरू झाला रोलरकॉस्टरसारखा एक थरारक प्रवास या प्रवासात प्राचीन, मध्ययुगीन संदर्भ आहेत; तसेच आजचे राजकीय, सामाजिक संदर्भही. आंतरराष्ट्रीय घटनांचे पडसाद आहेत. अज्ञात इतिहास आणि वर्तमान वास्तव, कल्पित आणि सत्य यांच्यामधल्या पुसट, धूसर सीमारेषांवर आटयापाटया खेळणारी नाटयपूर्ण, वेगवान घटनांच्या प्रवाहात वाचकाला खेचून नेणारी आणि खिळवूनही ठेवणारी कादंबरी |
विश्वस्त कथानाकाचा पाया आहे श्रीकृष्णाची बुडालेली द्वारका! द्वारका बुडताना द्वारकेचे वैभव देखील बुडाले का? जर ते वैभव बुडाले असेल तर ते आहे कुठे? ते कुणाला खरेच मिळू शकेल? "विश्वस्त" श्रीकृष्णाची त्या विषयी काही योजना होती का? असेल तर तर ती पूर्ण झाली का?
अशा अनेक गूढ (अर्थातच काल्पनिक ?) गोष्टींचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न या कादंबरीत केलेला आहे.
पण...
काही गोष्टी / संदर्भ नक्कीच टाळता आले असते (आणि बरीचशी पाने कमी झाली असती.) काही ठिकाणी खूपच detailing आहे. (कादंबरीतील पात्रे ज्या हॉटेल मध्ये नेहमी भेटतात त्या हॉटेल मधील table चा रंग देखील लेखकाच्या Detailing मधून सुटत नाही.)
स्थळांची वर्णन वाचताना अक्षरशः दमछाक होते. बरेचदा आपण प्रवास वर्णन वगैरे वाचतो आहोत कि काय असे वाटायला लागते. (विशेषतः Scotaland मधील काही प्रसंग) काही ठिकाणी जर संदर्भासाठी आणखी नकाशे दिले असते तर अजून मजा आली असती (उदाहरणार्थ विजयदुर्ग प्रकरण... किंवा ते प्रकरण पूर्ण टाळले असते तरी चालते असते. It doesn't add any value as such other than introducing some characters in main plot.)
सध्याचा एक प्रबळ राजकीय पक्ष, त्या पक्षाला पूरक असलेली संघटना, त्या संघटने मागचे विचार, त्या पक्षाचा प्रबळ असा नेता "वाघा", त्या नेत्याची राजकारणाची समज, त्याचे प्रचार तंत्र, आणि पात्रांच्या तोंडून त्याचे बरेच कौतुक - यात आणखी काही पाने खर्च होतात. आणि नंतर तो "वाघा" कादंबरीचे एक पात्रच बनून जातो. इथपर्यंत कि तो "वाघा" जणू श्रीकृष्णाचा "निर्मोही" आणि "सत्प्तात्र" वारसदार बनून जातो. (हे समजण्यासाठी तुम्हाला कादंबरी वाचावी लागेल). "वाघा"च्या कौतुकात लेखक आता मधेच त्याचे व्यक्तिचरित्र वगेरे सुरू करतात की काय अशी भिती वाटते.
पण तरीही... मराठी मध्ये हा "प्रकार" मी तरी कमी पाहिलेला / वाचलेला आहे. (मागे एकदा मुरलीधर खैरनार यांची "शोध" वाचली होती. It is much better than this I feel. The plot is also similar - about treasure hunt.) एकदा (आवर्जून नव्हे!) वाचण्यासारखी कादंबरी आहे.
(Note: For Dan Brown fans could be bit boring.)
This entire review has been hidden because of spoilers.
It's a brilliant book. A rare find in Marathi literature. The canvas is so huge and has never been tried earlier in Marathi literature. It spans from last days of Mahabharat to the current age. You meet Krishna, Chanakya and Chandragupta, and 'Wagha', history, mythology and present is so impressively woven together that you are always on the edge and excited about what comes next. As pointed out in some of the reviews, it's the 'Da Vinci Code' of Marathi. A must read.
काही काळापूर्वी मी लॉक ग्रीफ्फिन वाचले आणि वसंत लिमये यांच्या लिखाणाच्या प्रेमात पडले. त्यानंतर विश्वस्त वाचायचे असे ठरवले होते पण म्हणतात ना 'हर एक चीज का वक़्त होता है|' २ आठवड्यापूर्वी प्रत्यक्ष लेखकाच्या भेटीचा योग इथे दुबईमध्ये जुळून आला. विश्वस्तच्या मागची कहाणी जाणून घेता आली आणि त्यांची स्वाक्षरी पुस्तकावर घेता आली. पुस्तक हातात आल्यावर अधाश्यासारखे त्यावर तुटून पडले. पुस्तक वाचताना लक्षात येते कि लेखकाने किती अभ्यास केला आहे प्रत्येक गोष्टींचा.
इतक्या खोलात जावून लिहिलेली पुस्तके मराठीत कमी आहेत जवळ जवळ नाही म्हटले तरी चालेल. प्रत्येक घटना इतक्या सुंदरपणे वर्णन केली आहे कि डोळ्यसमोर एक चित्र उभे राहते. काही लोकांनी वसंत लिमयेंना भारताचा डॅन ब्राउन म्हटले आहे. जे वर्णन अत्यंत सार्थ आहे.
कोण कुठली ५ मुले एका इतिहास अभ्यास आणि गिर्यारोहणाच्या छंदामुळे एकत्र येतात. गड किल्ल्यांना भेटी देता देता त्यांच्या हातात काही असे पुरावे लागतात कि ज्यामुळे कदाचित इतिहासच बदलून जाईल. यासाठी संशोधन करताना त्यांना सरकारी लाल फितीचा सामना करावा लागतो त्याचसोबत काही वाईट प्रवृत्ती त्यांच्या मागावर असतात. हे संशोधन करताना त्यांचे काही साथी मारले जातात. अर्थात यापेक्षा जास्त सांगणे म्हणजे रहस्यभेद केल्यासारखे होईल. यातील काही पात्रं ही अस्तिवात आहेत पण त्यांची नावे बदलली आहेत. घडलेल्या घटना काही अंशी खऱ्या आहेत. ज्या घटनाबद्दल काही ठोस ऐतिहासिक पुरावे उपलब्ध आहेत त्या घटनांमध्ये काहीच बदल केलेला नाही. थोडक्यात सांगायचे तर एक उत्तम सत्यावर आधारित एक काल्पनिक कथानक आहे.
पूर्ण कथानक खुर्चीला खिळवून ठेवते. लिखाणाची शैली उत्तम आहे यात वादच नाही. एक उत्तम कलाकृती! वाचलीच पाहिजे!
ह्या पुस्तकाची सुरुवातीची काही पाने बुकगंगाच्या वेबसाईटवर वाचली होती आणि हे पुस्तक आपण वाचावे असे मनात आले पण त्याचे रिव्हियू कुठे जास्त प्रमाणात बघायला मिळाले. त्यामुळे विकत घेऊन वाचावे अशी इच्छा मनात नव्हती पण आज हे पुस्तक मागवले आहे, तरी आता मी "तुंबाडचे खोत" ही कादंबरी वाचत असल्यामुळे कदाचित ह्या पुस्तकाची सुरुवात पुढच्या महिन्यात होईल.
कथानक आणि मांडणी खूप सुंदर आहे. रंगवलेली पात्र तसेच ठिकाणांची वर्णने खूप detailed आहेत. कधी कधी उगाच ताणल्या प्रमाणे वाटू शकते. महाभारतावर पुस्तक लिहिणारे खूप आहेत पण हा plot थोडा वेगळा भासतो. अति वर्णन नक्कीच टाळता येऊ शकला असतं आणि त्यामुळे लांबते. Overall, लिखाण खूप रंजक आहे आणि एकदा वाचण्या सारखी नक्कीच!
चित्तथरारक Historical Suspense thriller.. लेखकाने द्वापार युग पासून चाणक्य तेथून महमूद गझनी ते सरदार पटेल असे भारतातील 3000 वर्षांपूर्वीचे संदर्भ कुशलतेने वापरून एक चित्तथरारक कादंबरी रेखाटली आहे.. नक्कीच खिळवून ठेवणारी गोष्ट..
अहाहा.... खूप दिवसांनी असे काही थरारक,नावीन्यपूर्ण, रहस्यमय वाचायला मिळाले. खूप आवडली कादंबरी... त्यातील काही जागांवर स्वतः गेलेलो असल्यामुळे अजुन भारी वाटलं वाचताना....
अप्रतिम आणि वाचनीय, हातात घेतल्या नंतर संपवूनच ठेवण्या जोगी कादंबरी, स्थळ आणि काळ यांचे सुरेख वर्णन, वसंत लिमये हे डयान ब्राऊन आणि जेफ्री आर्चर यांचा सुवर्ण मध्य आहेत
Excellent book!!! Must read!! This is equivalent to Da Vinci.. खूपच छान लिहिले आहे... सर्व संदर्भ अचूक आहेत... मी स्वतः क्रॉस verify केले आहे... जरूर वाचा
Mostly in suspense thriller books sometimes author forget to explore side characters but the touch of every character in this book is unique. Sometimes you do feel for these characters and relate to them. Overall a very good read i loved it
150 ते 200 पानात संपणाऱ्या गोष्टीसाठी लेखकाने 555 पाने लिहिली आहे आणि बहुतेक वेळा विकिपीडिया वाचतो की काय असेच वाटत राहते आणि लेखक मोदींचा भक्त आहे त्यामुळे संघ आणि मोदींचा उदोउदो करण्यात अनेक पाने खर्च झालीत परिणामी कादंबरी कधीच तिचा मूळ उद्देश साध्य करत नाही. हे फारच बोर प्रकरण आहे. लेखक म्हणतो ह्या कादंबरी साठी चार वर्षे लागली आणि खूप लोकांनी सहकार्य केले पण मूळ कथानकात गडबड असल्यामुळे सगळं वरवर चाललंय अस वाटत राहतं. एकही पात्र आपलंसं वाटत नाही. 100 पान वाचल्यावर कादंबरी कधी एकदा संपते अस वाटत राहते पण कदंबरी संपतच नाही. मुंगीच्या वेगाने कथा पुढे सरकते. परिणामी ही एक उथळ कादंबरी म्ह्णूनच हिचा शेवट होतो.
डॅन ब्राऊन यांच्या लेखनशैली शी साधर्म्य असणारी लेखनशैली , वाचकांना क्षणभर उसंत मिळणार नाही याची लेखकानी विशेष काळजी घेतली आहे.... Detailing टाळता आल असतं. संपुर्ण पुस्तकं वाचताना एक मात्र जाणवत राहत की वाघा (वासुदेव घांची) हे पात्र माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे विश्वस्त श्रीकृष्ण यांचे वारसदार आहेत हेच वाचका���च्या मनावर बिंबवण्यासाठी ह्या पुस्तकाच लेखन केलं असावं. पदोपदी त्यांच्या कार्याचा गौरव आणि प्रचार कुठे तरी अतिरेक केल्यासारख वाटत राहतं.. कारण नसतानाही दुवे जोडल्यासारखे वाटतात.
While reading you will fill like its a Story tell of narendra modi. Author trying to implement his views on modi on readers. We can say that this book is written by AndhBhakt.
ही कादंबरी विनाकारण वाढविली आहे. 500 पानांची ही कादंबरी, जर लेखक 300-325 पानांमध्ये अगदी व्यवस्थित बसवू शकला असता आणि त्यायोगे, कादंबरीमधील वाचकाची उत्सुकता शेवटपर्यंत चांगली टिकली असती.. रहस्यमय कादंबरीचे यश मोजायचा एक साधं परिमाण आहे. कादंबरी हातात घेतल्यानंतर ती संपेपर्यंत, वाचकाला भूक - झोप महत्वाची वाटते का कादंबरी? इथे भूक आणि झोप तर सोडाच, वाचक अधेमध्ये आपला मोबाईल बघत राहतो. साधारण पहिली 50 पाने संपेपर्यंत च वाचकाला येणारा हा तुटक तुटक अनुभव शेवटपर्यंत तसाच राहतो. ओढून ताणून संपवावी लागली ही कादंबरी. या पुस्तक - प्रकारात, ' शोध ' ही मुरलीधर खैरनार यांची कादंबरी खऱ्या अर्थाने champion ठरते. तुलनाच करायची झाल्यास, ' शोध ' ला १०० पैकी ९० गुण मिळत असतील तर ' विश्वस्त ' ला मी ५० गुण देईन..
महाभारतावरचं हे पुस्तक रंजक आहे, नक्कीच. पण थोडं प्रचारकी वाटलं. कथानक आणि मांडणी छान आहे. पण, कधी कधी काही प्रसंग उगिचच ताणल्यासारखे वाटतात, हे अति वर्णन नसतं तर जरा जास्त आटोपशीर झालं असतं. एकदा नजरेखालून घालायला काहीच हरकत नाही.
Nice concept but does not hold the grip till end, unnecessary technical detailing at some places makes it dull, concept is good amd new. And makes many political statements which somewhat shifts the focus.
द्वारका..महाभारत...व त्याभोवती फिरणारी अनेक गूढ रहस्ये उकलण्याचा चित्तथरारक प्रवास..(थांबा, इथे थोडं डॅन ब्राउनच्या कादंबर्यांशी साधर्म्य साधण्याचा प्रयत्न झाला असता तर ठीक होतं...) विश्वस्त संशोधनपर माहितीचा लेखाजोखा रोचकपणे पुरवते.मात्र एक साहसपूर्ण प्रवाही कादंबरी म्हणून वाचकाला खिळवून ठेवण्यात थोडीशी कमी पडते. पहिला भाग "युगंधर" ची आठवण करून देतो. मात्र त्यानंतरची रहस्याची उकल करण्याची पूर्ण प्रक्रिया थोडी शास्त्रीय, रटाळ वाटली, तरी उत्सुक वाचकाला ऐतिहासिक संशोधनाच्या प्रवाहात ओढून नेण्यात लेखक काहीप्रमाणात यशस्वी झाला आहे. थोडक्यात तुम्हाला इंडियाना जोन्स किंवा द विंची कोड सारखा पापणी लेशभरही न हलू देणारा रोलर कोस्टर हवाय तर तो नाहीये, मात्र आजूबाजूच्या सुरम्य दुनियेचा आँखो देखा हाल देणारी झुक झुक गाडी मात्र आहे!