There is nothing like magic; it is all trickery. Babu of Bhokarwadi dons the mantle of magician (‘Jadugaar’) to prove this point! Bajaba makes a complaint about a robbery in the hotel; but then also gives a written submission that the theft never took place (‘Chori zalich nahi’)! Fed up with the local politics (‘Gavgundi’), the newlyappointed lady teacher decides to quit her job and leave the village! Babu and Chengtya too face the same travails (‘Vanvaas’) as Rama had to. The Government issued an Ordinance legalizing corruption (‘Bhrashtaachar’); but this only serves to double Balu’s workload since he is a government servant! Bapu Patil did complete the adoption formalities (‘Dattakvidhi’) for his son, but Babu and Chengta manage to mess things up! Dagadu Gawali one conducts the class (‘Taas’) otherwise taken by the Std. IV Maths teacher who took pleasure in caning the boys! Siva Jamdade, Rama Kharat, Gana Mastar, Nana Chengat, and Babu Pailwan go for a picnic (‘Company’)! Fun…Irony…Advice…Sharp criticism…and tragedy too…such is the nature of this collection of stories.
Dattaram Maruti Mirasdar (Devanagari: दत्ताराम मारुती मिरासदार) (born 1927) is a Marathi writer and narrator principally of humorous stories. He hails from Pandharpur(Maharashtra).
Many of Mirasdar's humorous stories revolve around village life in Maharashtra. However, some of his stories concern the serious social issues and lives of the poor living in villages. His stories Gavat, Ranmanus, Kone Eke Kali, Bhavaki, Hubehub, and Sparsha belong to the latter class.
For some years, Shankar Patil, Vyankatesh Madgulkar, and Mirasdar jointly presented, in different towns in Maharashtra, highly popular public recitations of their short stories.
Mirasdar was a professor of Marathi in a college in Pune. He is currently the Acting President of Maharashtra Sahitya Parishad, Pune.
The series of stories about Bhokarwadi and its characters is so consistent, it has an unexpected result of making them endearingly familiar, apart from the unstoppable laughter induced suddenly at various points.
Credits in book, although nor on kindle, or goodreads, mention the name of renowned author Vyankatesh Madgulkar. It's unclear why. Perhaps he wrote a preface that's omitted from the kindle version?
Again, looking to see if it's for cover, there's another strange factor - cover credit, on the cover but not inside, is the renowned artist S. Phadnis. Why he isn't mentioned inside is a puzzle. ***
भोकरवाडीतील जादूगार
"एकदम बाबूच्या डोक्यात गोंधळ उडाला. पुढचा प्रश्न त्याला काही आठवेना. तो गांगरला. बिडी ओढणार्या एका माणसाचा हात धरून त्याने विचारले,
"‘‘ये माणूस देखो.’’
"‘‘देख्या –’’
"चेंगट ओरडला. ‘‘क्या करता है?’’
"‘‘मांडी खाजवता है –’’
"हे उत्तर ऐकल्यावर गर्दीत एकदम प्रचंड हशा झाला. काही जणांनी टाळ्या वाजवल्या. आता मात्र बाबू भलताच गांगरला. सगळे सवाल त्याच्या डोक्यात उलटे-पालटे झाले. तो काहीही प्रश्न विचारू लागला आणि चेंगट त्याची ठरलेली उत्तरे देऊ लागला. लहान पोराचा हात धरून त्याने हा काय करतोय, म्हणून विचारले, तेव्हा ‘चेंगटाने बिडी वढता है –’ म्हणून उत्तर दिले. एका म्हातार्या माणसाला उद्देशून प्रश्न विचारल्यावर ती बाई असून तिच्या लुगड्याचा रंग हिरवा आहे म्हणून त्याने जोरदार उत्तर दिले. तर बाईने चड्डी घातली असून तिच्या चड्डीचा रंग खाकी असल्याचे, त्याने ठणकावून सांगितले. दुसर्या एका म्हातारीने डोक्यावर काळी टोपी घातली आहे आणि ती पानतंबाखू चघळीत आहे, हेही त्याने न चुकता सांगून टाकले.
"चेंगटाच्या एकेका उत्तराबरोबर लोकांत हशा होत होता. हसून हसून त्यांची पोटे अक्षरश: दुखू लागली. लोक टाळ्या वाजवू लागले. शिट्ट्यांचे आवाज ऐकू येऊ लागले. आरडाओरडा सुरू झाला. हा भलताच विनोदी कार्यक्रम आहे, याबद्दल मात्र सर्वांचे एकमत झाले."
"लोकांत केव्हाच पांगापांग झाली. बघताबघता सगळे गेले. ... "
"थोड्या वेळाने चेंगट आपोआप उठून बसला. काय घोळ झाला, हे कळल्यावर तो तावातावाने म्हणाला, ‘‘तूच समदा घोटाळा केलास, बाबू. माझी काई चुकी न्हाई..’’
"गोष्ट खरीच होती. चूक बाबूचीच होती. बाबूलाही मनातून ते मान्य होते; पण ते कबूल न करता तो म्हणाला, ‘‘आता तरी लोकांना पटलं का न्हाई?’’
"‘‘काय पटलं?’’ चेंगटाने विचारले.
"‘‘हेच... ही जादूबिदू काई नसती. समदी बनवाबनवी आसती. ह्या तायताफियतात तर काई दम न्हाई. मला तेच लोकांना सांगायचं हुतं.’’" ***
चोरी झालीच नाही!
"नुकतीच नवीन ग्लास, फुलपात्री, पेले, डिशेस यांची ऑर्डर दिलेली खोकी माडीवर येऊन पडली होती. त्यातील जवळजवळ निम्मा माल गडप झाला होता आणि हॉटेलातला एक पोरगा कालपासून बेपत्ता होता. जवळजवळ पाच हजारांचा तरी माल असेल." ***
भोकरवाडीतील ‘गावगुंडी’
"वर्तमानपत्रात एकापेक्षा एक वाईट बातम्या होत्या. पंजाबात दहशतवाद्यांनी निरपराध लोकांना विनाकारण ठार मारले होते. बंगालमध्ये नक्षलवादी लोकांनी अनेकांची हत्या केली होती. बिहारमध्ये एक कुटुंबच्या कुटुंब कुणीतरी गारद केले होते. गुजरातमध्ये मिरवणुकीतून दंगल उद्भवली होती आणि त्यात अनेकजण घायाळ झाले होते. महाराष्ट्रात कुठेतरी एक बस नदीत कोसळली होती आणि त्या अपघातातही अनेकांचे बळी गेलेले होते. त्याशिवाय इतर बातम्याही फारशा चांगल्या नव्हत्या. संप, मोर्चे, हरताळ, सासूने सुनेला जिवंत जाळले... रोजच अशा बातम्या. त्यावर चर्चा करणार तरी किती आणि कशी?" **
" ... गावातील प्रत्येकाला कळले, की गावातील शाळेत एक शिक्षिका आली आहे. ती चांगली तरणीताठी असून बहुधा तिचे लग्न व्हावयाचे आहे आणि बाबूचे तिच्याकडे लक्ष आहे. त्यामुळे गावातील मंडळींचे कुतूहल वाढले. बाबू पैलवान एवढे बोलतो, त्या अर्थी त्या बाईत काहीतरी विशेष असले पाहिजे, असे अनेकांना वाटले. जाता-येता लोक तिच्याकडे टवकारून पाहू लागले. बोटे दाखवून तिच्याबद्दल काहीतरी कुजबुजू लागले." **
"शांताबाई देशमुख या शिक्षिकेला या गोष्टीची अर्थातच काही कल्पना नव्हती. ती आपली मान खाली घालून शाळेत जात होती आणि मान खाली घालूनच परत येत होती. गावातले लोक एवढे टवकारून आपल्याकडे का पाहतात, हे तिला कळत नव्हते; पण हे खेडेगाव आहे, थोडेफार असे चालायचेच, अशी कल्पना करून तिने तिकडे फारसे लक्ष दिले नव्हते. काही काही मंडळी निरनिराळ्या निमित्ताने शाळेत डोकावून जातात आणि आपल्याकडे बारकाईने पाहतात, हेही तिच्या लक्षात आले होते; पण तरीही तिने धीर सोडला नव्हता. पण अलीकडे आणखी एक गोष्ट तिच्या ध्यानात आली होती. रात्रीच्या वेळी आपल्या घराच्या जवळपास कुणीतरी घुटमळत असते, हे तिला समजले होते. त्यामुळे मात्र ती मनातून घाबरून गेली होती. एकदा तर कुणीतरी जाडजूड पैलवानासारखा एक माणूस खिडकीतून डोकावताना तिला दिसला होता. तेव्हापासून तर ती हादरलीच होती. कुणीकडून आपण या गावात आलो, असे तिला होऊन गेले होते." **
" ... बाबूने एकदा ताठ मानेने सगळ्यांकडे पाहिले. मग तो हळूच म्हणाला, ‘‘चिलाच्या वाडीला आपलं पाव्हणं हैतच की, मधनंमधनं मी जात जाईन तिथं. म्हंजे तिथंबी तिला गावगुंडीचा ताप व्हायला नको.’’" ***
रस्त्यावरील भुताटकी
"जुन्या पेठेतून नव्या पेठेकडे जाणारा जो रस्ता होता, त्याच्या वळणावरच एक भले मोठे चिंचेचे झाड होते. हे झाड भुताटकीसाठी प्रसिद्ध होते. रात्रीच्या वेळी वार्याने त्याच्या फांद्या हलू लागल्या की, बघणार्याच्या छातीत धसकाच बसत असे. या झाडावर एका पठणाचे भूत बसलेले असते, असे जाणकार मंडळी सांगत. अमावास्येच्या दिवशी रात्री-अपरात्री कुणीही या झाडाजवळून चालले की, हा पठाण त्याला आपला हिसका दाखविल्याशिवाय सोडत नसे, असेही कुणाकुणाच्या बोलण्यात येई. एका पैलवानाला त्याने चांगले घोळसले होते आणि धोबीपछाड करून आपटले होते. एका तरण्याताठ्या बाईला तर त्याने झाडावरच बसवले होते आणि तिची दातखिळी बसवली होती. कुणाला तिथे काय दिसेल आणि काय होईल, याचा नेमच नव्हता. रात्रीच्या वेळी माणसे जरा जपूनच त्या झाडाजवळून जात." **
"‘‘मुडदा सरळ उचलायचा आन् त्या गल्लीत नेऊन ठिवायचा. तिथले पोलीस अन् मुडदा. बघून घेतील. आपण बिनघोर.’’" **
"मग एकदम चमत्कार घडला!
"रस्त्यावर पालथे पडलेले ते प्रेत हळूहळू हालचाल करू लागले. ते बघताबघता उताणे झाले. पहिल्यांदा त्याने पाय झाडले. दोन्ही तंगड्या हवेत खालीवर केल्या. डोळे किलकिले केले. तोंडाने एक जांभई दिली.
"मग एकदम ते उठून बसले. त्याने आश्चर्याने इकडेतिकडे बघितले. आपण नेमके कोठे आहोत, याचा त्याने शोध घेतला. मग आपले खिसे चाचपले. स्वत:शीच पुटपुटला, ‘‘साला, बाटली कुठं गेली? पडली वाटतं वाटेत कुठंतरी. जाऊ द्या, मरू द्या.’’ असे म्हणून तो उठला. पानतंबाखूने भरलेल्या तोंडाने पुन्हा एकदा त्याने थुंक टाकली. कुतूहलाने इकडे-तिकडे पाहिले. मग डुलतडुलत तो निघाला. पलीकडच्या गल्लीत घुसून दिसेनासा झाला." ***
भोकरवाडीतील ‘वनवास’ प्रकरण
"सबंध गावाने त्यांचे स्वागत केले. गळ्यात हार घातले. कुणी कुणी त्यांच्या पायाही पडले. शिंग फुंकून, ताशेवाजंत्री लावून या वीरांची लहानशी मिरवणूक निघाली.
"त्यांचे कौतुक करून बुवा म्हणाले, ‘‘अशी धार्मिक माणसं गावोगाव निघाली पायजेत. आठ दिवस दोघांनीही वनवास भोगला. देवाचं नामस्मरण केलं. मिळेल ते खाल्लं. कधी उपाशी राहिले. धन्य आहेत त्यांच्या मातोश्री! आता वनवासाची समाप्ती झाली. यांच्या पुण्याईनंच लक्षुमणावरचं संकट टळलं म्हणानात.’’
"आ���ि दुसर्या दिवसापासून रामायणाची पोथी नियमितपणे सुरू झाली. फक्त हे दोघे मात्र देवळाकडे पुन्हा कधी फिरकले नाहीत." ***
शाळेतील धडाड्धूम
"तात्या त्या गोलाच्या जवळ गेला. खाली वाकला. त्याने दोन्ही हात पसरले. तेवढ्यात एकदम ‘धडाड्धूम’ असा जोरात आवाज झाला. अगदी मोठ्यांदा आवाज झाला. बाप रे! मग काय? अशी पळापळ झाली म्हणता! काही विचारू नका.
"गर्दीतल्या मुलांनी तर धूम ठोकलीच, पण बहुतेक सगळे सरही पळाले. जिन्याच्या तोंडाशी एकच गर्दी आणि चेंगराचेंगरी झाली. काही पोरांनी एकदम गळा काढला. जोशीसरांनी काकडेसरांना एकदम घट्ट मिठी मारली. दोघेही थरथर कापतच राहिले. जे धीट होते, ते ताबडतोब पळाले. जे घाबरट होते, ते मात्र किंचित थरथर कापत उभे राहिले. कुणी कुणी एकमेकांना घट्ट आवळून धरले. कुणी एकदम गळा काढला. कुणाच्या टोप्या पडल्या. कुणाच्या चपला निसटल्या. एकच गोंधळ माजला." ***
देव पावला
"‘‘अन् ते शंभर रुपये तू घेऊन जा. गणपतीची प्रार्थना केलीस. देव खूश. पैसे चालत आले बघ तुझ्याकडं. जा, नीघ. पोरं वाट बघत असतील घरी. पळ.’’" ***
भोकरवाडीतील बाँबस्फोट
"बातमी सर्वांनाच अस्वस्थ करणारी होती. एरवीच्या वर्तमानपत्रातील बातम्या साध्यासुध्या असतात. कुठे अपघात होऊन माणसे मेली, कुठे विषारी दारू पिऊन माणसे खलास झाली. कुठे उगीचच्या उगीच काही कारण नसताना माणसे ठार झाली. काही ठिकाणी सासरच्या लोकांनी घरात नवीन आलेल्या सुनेला जाळून मारण्याचा उद्योग केला. काही ठिकाणी पूर येऊन लोकांचे नुकसान झाले. या बातम्या वाईट होत्या, पण त्यात काही नवीन नव्हते. रोज रोज त्याच त्या बातम्या ऐकून त्यातील भयंकरपणा नाहीसा झाला होता. अतिरेकी नावाची माणसे विनाकारण कुणावर तरी हल्ला करून त्यांना ठार मारीत आहेत, ही बातमीसुद्धा आता बातमी राहिली नव्हती. तीही रोजचीच घटना झाली होती. गणामास्तराने ताजे वर्तमानपत्र नुसते उघडले, तरीसुद्धा ‘आज किती लोक मेले?’ असा प्रश्न नाना चेंगट विचारीत असे. एकदा तर काहीच बातमी नव्हती तेव्हा, ‘आज कुनी मेलं न्हायी वाटतं?’ असाही अभिप्राय व्यक्त करायला त्याने कमी केले नव्हते. सारांश काय, कुठलीही बातमी ऐकून अस्वस्थ व्हावे, असे अलीकडे काही घडलेच नव्हते.
"आज मात्र मंडळी अस्वस्थ होती. वातावरण थोडे गंभीर झाले होते.
"बातमीच तशी होती. दिल्लीत आणि कुठेकुठे बॉम्बस्फोट झाले होते. रस्त्यात कुणीतरी ट्रान्झिस्टर टाकून दिला होता. एखादे डबडे, खोके पडलेले होते. ते जाणार्या-येणार्याने उचलले. त्याबरोबर धडाड्धूम असा आवाज होऊन बॉम्बचा स्फोट झाला. काही माणसे मेली. काही गंभीरपणे घायाळ झाली. हे काम अतिरेक्यांचेच होते, हे नि:संशय! म्हणून सरकारने इशारा दिला होता की, रस्त्यात, वाटेत, बाजूला, कचराकुंडीपाशी कुठेही अशा तर्हेच्या वस्तू पडलेल्या आढळल्या, तर त्यांना अजिबात हात लावू नका. फार मोठा धोका आहे. अशा वस्तूत एखादा जिवंत बॉम्ब असण्याची शक्यता आहे. तो उडाला, तर अनेक जण मरण्याची शक्यता आहे. म्हणून अशा गोष्टींना अजिबात हात लावू नका. पोलिसांना याची खबर द्या. म्हणजे ते येतील आणि या वस्तू खबरदारीने उचलून घेऊन जातील आणि नाहीशा करतील. हा प्रकार कुठेही घडण्याचा संभव आहे." **
"गोपाळच पुढे बोलला, ‘‘सध्या काय देशात इचित्र चाललंय म्हनं?’’
"‘‘चाललं आसंल, आपल्याला काय करायचंय?’’
"‘‘तसं न्हवं.’’
"‘‘मग?’’
"‘‘रस्त्यात काय कशात तरी बॉम्ब ठिवत्यात. हात लावला की उडतोय म्हनं.’’
"‘‘आरे ठिवनारं ठिवत्यात, हात लावनारं लावत्यात, मरनारं मरत्यात. तुला लेकराला कशापायी चौकशी येवढी?’’" **
" ... ‘‘अरे, दिवाळीचा सण न्हाई का जवळ आला? सदा वाण्यानं तालुक्याला जाऊन फटाके, तोटे, अॅटमबॉम्ब आसलं काही तरी खरेदी करून आणल्यालं. वाटेत परसाकडला लागली, म्हणून ते खोकं देवळाजवळ ठेवलं आणि गेला परसाकडला. तेवढ्यात कुनी काडी टाकली की काय केलं – खलास! धडाड्धडाड् आवाज नुस्ता आर्धा घंटा. समदं गाव गोळा झालं. बिचार्याचं लै नुकसान झालं रे. कुणी हालकटपणा केला कुनास ठाऊक. तुला कसं काय कळलं न्हाई?’’
"हात पुढे पसरता पसरता बाबू थांबला. हात मागे घेऊन ते त्याने झाकले. मग मान खाली घालून तो हिरमुसल्या तोंडाने म्हणाला, ‘‘मी झोपलो हुतो. मला काही कळलंच न्हाई.’’" ***
भुताचा खून!
"‘‘अहो, गंमत काय झाली, मघाशी एक माणूस आला. भुताचा खून झालाय म्हणाला.’’
"‘‘भुताचा खून ना? बरोबर आहे. होतो एखाद्या वेळेस. चला.’’" ***
भ्रष्टाचार बंद!
"‘‘केवढी खळबळजनक बातमी आहे आज! सगळ्या पेपर्सनी पहिल्या पानावर बोल्ड टायपात छापलीय. जिकडतिकडं तीच चर्चा चाललीय.’’
"‘‘कसली बातमी?’’
"‘‘कमाल झाली बाबा तुझी! अरे, भ्रष्टाचार सरकारनं कायदेशीर ठरवलाय!’’" ***
भोकरवाडीतील दत्तक-प्रकरण
" ... पहिल्या फोटोत जनाबाई दिसतच नव्हती. चेंगटाचे डोके एकदम पुढे आले होते आणि दुसर्या फोटोत जनाबाईच्या मांडीवर बाबूच बसलेला होता आणि त्याच्या शेजारी चेंगट हसर्या मुद्रेने बसलेला दिसत होता!" ***
गणिताचा तास
"‘‘एका व्यापार्याने एकदा चाळीस घोडे चाळीस हजार रुपयांना खरेदी केले. मग त्यातील निम्मे घोडे त्याने सव्वापट किमतीस विकले. राहिलेल्या घोड्यांतील निम्मे घोडे दीडपट किमतीस विकले, तर त्यास किती फायदा झाला व त्याच्याकडे किती घोडे शिल्लक राहिले? हं, आटपा लौकर, पाच मिनिटांत उत्तर आलं पाहिजे.’’"
" ... वेळ संपत आली. गणित केलेच नाही, तर सुरुवातीसच मार खावा लागेल. उत्तर बहुधा अपूर्णांकात असणार, हे मला ठाऊक होतेच. म्हणून उत्तर दाबून लिहून टाकले – नफा साडे-दहा हजार रुपये आणि शिल्लक घोडे साडेबारा..." **
"श्री. दगडू आंबू गवळी यांसी –
"तुमची चिठ्ठी पोचली. घोडे आणि म्हशीत काहीच फरक नसतो. घोड्याऐवजी म्हशीचे गणित घातले असते, तर उत्तर बरोबर आले असते, हे वाचून हसू आले आणि तुमच्या अडाणीपणाची कीव आली. ... "
"आपला,
"गुंडो गणेश डफळापूरकर" **
"गुंडो गणेश डफळापूरकर मास्तर यांसी –
"माझेपण तुम्हाला हे शेवटचे पत्र पाठवतो. तुम्ही माझ्या मुलाबद्दल जर काही तक्रार कराल, तर याद राखून ठेवा. शाळेत येऊन तंगडे मोडीन. मला तुम्ही ‘रेडा’ म्हणालात, हे कळले. मी रेडा तर तू घोडा आहेस – रेड्याची काय ताकद असते, ती शाळेत येऊन दाखवू का?
"आपला,
"दगडू आंबू गवळी
"हे पत्र वाचल्यावर मास्तरांची मुद्रा एकदम बदलली. त्यांनी प्रेमळ दृष्टीने माझ्याकडे पाहिले, मला म्हणाले, ‘‘बाळू, आता तुझं गणित पुष्कळ सुधारलं आहे. पहिल्यासारखं कच्चं राहिलेलं नाही. तरीपण अभ्यास कर. आं?’’
"मी मान डोलावली. हळूच विचारले, ‘‘बाला माझ्या सांगू मी?’’
"‘‘सांग –’’ त्यांनीपण मान डोलावली. मग मला हळूच म्हणाले, ‘‘आणि त्यांना हेपण विचार, तुमच्या दुधाचा रतीबपण लावीन म्हणतो. घरी केव्हा येऊ म्हणावं, चीक खायला.’’" ***
कंपनीची ट्रिप
"गोपाळने मग सविस्तर वृत्तान्त सांगितला. मध्यंतरी तो सासुरवाडीला गेला होता. तिथले त्याचे पाहुणे महिन्याच्या वारीला जाणारे. ‘चला जाऊ पायीपायी...’ असा आग्रह झाला आणि गोपाळही त्यांच्याबरोबर गेला. फार मजा आली. पहाटेच्या गार वार्यात मजल दरमजल करायची. सूर्य जरा वर आला, की कुठेतरी ओढा, नदी बघून थांबायचे. आंघोळी करायच्या. तीन दगडाची चूल मांडून भाजीभाकरी करून खायची. उन्हे उतरल्यावर पुढे चालू लागायचे. वाटेत नाना प्रकारची माणसे भेटतात. त्यांच्याशी गप्पा करायच्या. कुठे सिनेमा पाहायचा. कुठे तमाशाला जायचे. कंटाळा आला, तर हॉटेलात जाऊन खायचे... एकूण ही ट्रिप फार छा�� झाली. देवदर्शन तर झालेच, पण एकमेकांच्या संगतीत गप्पागोष्टी, थट्टामस्करी ही गंमत फार आली. माणसाने मधूनमधून अशा ट्रिपा काढल्या पाहिजेत."
हलक्या फुलक्या गावरान गोष्टी, कितीदाही वाचल्या तरी पुनर्रप्रत्ययाचा आनंद देणाऱ्या कथा! गावाचं वर्णन, तिथल्या इरसाल माणसांचे नीटस वर्णन तुम्हाला घटनास्थळी घेऊन जाते.