श्री ना पेंडसेंचा जन्म ५ जानेवारी १९१3 मध्ये रत्नागिरी जिल्ह्य़ातील मुर्डी या गावी झाला. १९२४ मध्ये पेंडसे मुंबईला स्थायिक झाले ते कायमचे. वयाच्या ११ व्या वर्षांपर्यंत त्यांनी जो कोकण पाहिला होता, आपल्या मनात साठवला होता, त्यावर ते आयुष्यभर लिहीत राहिले. मग तो साकव असेल, व्याघ्रेश्वराचे देऊळ असेल, किंवा नारळी-पोफळीच्या बागा असतील. त्या त्यांच्या भावविश्वाचा अतूट भाग झालेल्या होत्या. श्री. ना. पेंडसेंना खाजगीत शिरूभाऊ म्हणत. खाजगीतील (कौटुंबिक) हे नाव त्यांच्या मित्रमंडळीत आणि पुढे लेखनाच्या क्षेत्रातही रूढ झाले. त्यांच्या नावाचा उल्लेख साहित्य प्रांतातही ‘पेंडसे’ असा होण्याऐवजी ‘शिरूभाऊ’ असाच होत होता, याची प्रचीती ‘श्री. ना. पेंडसे : लेखक आणि माणूस’ या त्यांच्या आत्मचरित्रातूनही येते.
चार मुले असताना, नवरा सोडून गेलेल्या स्त्री च्या संघर्षाची कहाणी, काही चांगल्या तर बऱ्याचशा वाईट समाज प्रवृत्तीचं वर्णन आणि खूप काही करून, भोगुनही एखादा आपल्यामाणसां कडून होणारी अवहेलना जिव्हारी लागते याच हृदय वर्णन ह्या कथेत आहे.
A story of a woman who struggles towards her poverty to fulfill her dreams to make her sons' lives bearable, taking them out of orthodox joint family & starting own separate life without help of her indifferent husband. The story revolves around 3/4 major characters & keep one tied till end. Language used by writer includes some regional words providing this novel a regional touch