Writing this review in marathi because I want my marathi readers to read this book.
जरी तुम्ही मराठी वाचक असलात तरीपण हे पुस्तक नक्की वाचा.
ह्या नुसत्या कविता नाहीत तर एक वेगळीच भावना आहे. पुस्तक वाचल्यावर भारावून जाणे कशाला म्हणत असतील तर ह्यालाच, असे मी म्हणेन.
जॉन एलियांचे वैशिष्ट्यच हे आहे की ते शब्दांशी खेळतात.
जसं कि हिसाबे-तमन्ना म्हणजे आकांक्षाओ की गणना, ख्वाबे-जमर्रूदैने-खयाल म्हणजे हरियाले सपनों का विचार आणि असं बरंच काही.
जॉन एलियांच्या प्रत्येक शब्दांतच कविता आहे.
ह्यातील बरेच शब्द हे उर्दू, शुद्ध हिंदीत आहेत, पण त्यांची सुंदरताच ती आहे. काही शब्द कवीने स्वतःचे बनवलेले आहेत. पुस्तकात कठीण शब्दांचे अर्थ पण खाली दिले आहेत त्यामुळे समजण्यास मदत होते.
त्यांच्या कविता जीवन, प्रेम, एकटेपणा, प्रवासी व कला यावर आहेत तरीपण त्या वाचल्या की उदास न वाटता आपल्याला एक वेगळंच सुख मिळतं, काहीतरी अतिसुंदर वाचल्याचे सुख.
ह्या बद्दल लिहावे तेवढे थोडेच आहे म्हणून प्रत्येक वाचकाने जॉन एलियांना नक्कीच वाचले पाहिजे.