Our daily life is full of rays, it does not have any big event or a serious struggle of any type, that is the only problem. Otherwise, our routine life goes on as it is. Actually, our minds are prepared for the traumas of life, but then we come across someone who sees us through it. But this very mind set of ours is not at all prepared for the small traumas in daytoday life, which actually have the utmost power of disaster. They attack separately while we are alone and take out liveliness from our mind and soul. We have to suffer alone, there is no one to come along with us. A human mind thus attacked, gets terribly upset, his courage fails him, he then pauses for some time, rests for a while and once again gathers his strength with new hope and desire. No one notices his tiredness, no one detects his recovering. His journey continues. Everyone has to continue his or her own journey, sometimes falling and then getting up, with a new hope every time, with a glance at the past over and over, the journey has to be continued. This is a glimpse of such sufferings, of those walking and trudging, by you and of course by me!!!
Vasant Purushottam Kale, popularly known as Va Pu, was Marathi writer who wrote short stories, novels, and biographical sketches.He authored more than 60 books. His well-known books include Partner, Vapurza, Hi Waat Ekatichi, and Thikri.
My mother tongue is Marathi and I do read books in Marathi sometimes. But on the contrary, my speed while reading English books is way better than Marathi. So it always takes me longer to finish Marathi books.
"Language is the dress of thought", The quote above is from 18th century english writer, Samuel Johnson. It suggests that the style of our speech or writing indicates our way of thinking. It tells us that the specific words, phrases, and patterns of language we use, reveal how and what we think.
I can speak and understand 4 languages in total that include Marathi, Hindi, sanskrit and English. I want to learn even more before I die coz languages fascinates me. If you have command over any language other than your mother tongue, I congratulate you as learning a new language is enriching and gratifying experience.
Coming to the book, it is written originally in Marathi by V. P. Kale. I have read many of his books, loved them so he has become my absolute favorite. He wrote about relationships, love, marriage and complex feelings. His ideas were amusing and pleasantly clear. For the age he lived in, his philosophy was quite modern and forward.
One of the must read authors in Marathi.
या तुमच्या- आमच्या कथा. दैनंदिन जीवनातील हे कवडसे. यात मोठे संघर्ष नाहीत हीच त्यांची व्यथा. मोठ्या आघातांसाठी माणसाच्या मनाची तयारी झालेली असते आणि तशा प्रसंगी सावरणारेही अनेक भेटतात. छोटे-छोटे आघात असंख्य असतात. ते एकट्याला गाठून हतप्रभ करतात. त्यात वाटेकरी नसतात. ते एकट्याने सोसायचे! माणूस थांबतो, शिणून जातो, खचतो; पण पुन्हा सावरतो. तो शीणवटा कुणाला कळत नाही, सावरणंही समजत नाही! नव्या उमेदीनं, मागं पाहत-पाहत प्रवास चालू असतो; ठेवावा लागतो. त्या वाटेवरच्या व्यथा! त्यांच्या या कथा. तुमच्या आणि माझ्याही!!!
पुस्तकाचे नाव - नवरा म्हणावा आपला. पुस्तक प्रकार - कथासंग्रह. लेखक - व.पु.काळे. प्रकाशन - मेहता पब्लिशिंग हाऊस. मूल्य - १४०₹ पृष्ठ संख्या - ९०
व.पु. काळे हे मराठी साहित्यातील एक अग्रगण्य नाव. त्यांच्या लेखणीतून उतरलेले प्रत्येक पुस्तक वाचन म्हणजे वाचकांसाठी एक पर्वणीच असते.त्यांचं प्रत्येक लिखाण हे वाचकांना विचारप्रवृत्त करणारं आणि त्याचबरोबर निखळ आनंद देणारं.असाच त्यांच्या नर्मविनोदी शैलीतील एक खुमासदार प्रवास म्हणजे "नवरा म्हणावा आपला"हा कथासंग्रह.
खरंतर पुस्तकाचं शीर्षक वाचून आपण पुस्तकाविषयीचा एक अंदाज बांधतो. तसंच मी ही या पुस्तकाच्या शीर्षकावरुन नवरा - बायको मधील Typical कथा असतील असा एक ढोबळ अंदाज केला होता पण; तरी व.पुं च पुस्तक म्हणून मी वाचायला घेतलं आणि पहिल्याच कथेने माझा हा अंदाज खोटा ठरवला.यातील कथा या तुमच्या आमच्या आहेत.आपल्या दैनंदिन जीवनातील हे कवडसे.अर्थात प्रत्येक कथेचा गाभा हा स्त्री-पुरुषांमधील नातं हा असला तरी रोजच्या जीवनात आपण अनुभवत असलेल्या अनेक लहानसहान गोष्टी, त्यातील आनंद पती-पत्नींमधील गोड तक्रारी,रूसवे-फुगवे,एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न, कधी कधी होणारे गैरसमज हे सर्व वैवाहिक जीवनात किती महत्त्वाचे आहे,हे वपुंनी अप्रत्यक्षपणे सांगितले आहे. प्रत्येक नात्यात काही प्रमाणात तडजोड आणि समायोजन असतेच,आणि ते किती आनंददायी असू शकते हे ह्या कथा दाखवून देतात व या सर्वांचे चित्रण व.पुं नी इतक्या सहज व विनोदी पद्धतीने केले आहे की,वाचक त्यात स्वतःला कुठेतरी नक्कीच शोधतो.
या पुस्तकाच्या माध्यमातून एकूण 13 कथा आपल्या भेटीस येतात. त्यातील 'घरोघरी','नवरा म्हणावा आपला', 'श्रावणी सोमवार','घास' या कथांमध्ये घरच्या जबाबदाऱ्या,मुलाबाळांच्या जबाबदाऱ्या हे सर्व सांभाळत असताना गैरसमजातून होणारी लुटुपुटुची भांडण आहेत. 'किल्ली','भित्यापाठी','वह कौन थी' या कथांमघील प्रसंगांमध्ये अनेक गमतीजमती व एक वेगळीच मजा आहे. यातील 'आठ त्रिक चोवीस' आणि 'मी दिवाळी अंक घेतो' या कथा मात्र मला अधिक भावल्या.
वपुंची भाषाशैली हे ह्या पुस्तकाचं अजून एक वैशिष्ट्य. त्यांची लेखनशैली म्हणजे–सहजता आणि सजीवता. अतिशय सोपी, प्रवाही व वाचकाशी थेट संवाद साधणारी भाषा इ.मुळे कुठलाही संवाद खोटा वाटत नाही, कृत्रिम वाटत नाही. म्हणूनच प्रत्येक कथा वाचकांच्या मनात घर करते.
असं पती-पत्नी या नात्याला नवं परिमाण देणारं, हसवत-सांभाळत अंतर्मुख करणारं, विनोद,हळवेपणा, आणि वास्तवाची समज यांचा उत्तम मेळ असणारं हे पुस्तक प्रत्येक वाचकाने एकदा तरी वाचावंच हे आत्मनिवेदन.
................................................................................................ ................................................................................................ नवरा म्हणावा आपला : वपु काळे / कथासंग्रह NAVRA MHANAVA AAPLA by V. P. KALE ................................................................................................ ................................................................................................
To begin with, bought out of a need to travel to world of one's own language, there was an unexpected thrill of coming across name of someone known decades ago, however distantly.
श्री. गजाननराव वाटवे, सुधीर फडके, हृदयनाथ मंगेशकर, श्रीनिवास खळे, यशवंत देव यांच्या कारकिर्दीनंतर अभिजात संगीत म्हणजे काय, त्या युगाचा प्रारंभ श्रीधर फडके यांनी केला. ही आवृत्ती श्रीधरला –वपु
And then the introduction, by someone who knew the author long and well, made one realise one might have read, in one's younger years, this author's work in magazines one read in quantities, hardly ever noticing names.
And the introduction is quite right, this author tickles, while writing of a familiar world - that of middle class family. ................................................................................................
अनुक्रम
घरोघरी नवरा म्हणावा आपला धुंडण्यात मजा आहे श्रावणी सोमवार आठ त्रिक चोवीस भित्यापाठी किल्ली दोनच! तूर्तदान-महापुण्य वह कौन थी? घास प्रमाद मी दिवाळी-अंक घेतो! ................................................................................................
घरोघरी
"... जीव टाकून प्रत्येक गोष्ट करणाऱ्या माणसाचं असंच असतं. जीव टाकण्याची त्याची वृत्तीच ती. मग करायची असलेली गोष्ट कितपत योग्यतेची आहे त्याचा विचार त्यांना शिवत नाही. हातात घेतील ते काम सुबक, नीटनेटकं आणि म्हणूनच सतेज. त्यामुळं या अशा माणसांना येणारा कंटाळादेखील सामान्य नसतो. त्यांची आसक्ती जेवढी तीव्र तेवढीच तीव्र विरक्तीही. अरुणा त्याच जातीतली!" ................................................................................................
Shraavanie Somwaar
श्रावणी सोमवार
"“मुंबईत सगळ्या भाज्या बारमास मिळतात. मी तर कालच मिरच्या पाहिल्या.”
"“असतील, पण त्या खऱ्या; भोपळी नाहीत. त्या फार तिखट असतात. त्यांची भाजी व्हायची नाही.”
"“होईल होईल; त्या तिखट असोत वा खट असोत, आज मिरच्यांची भाजी हवी म्हणजे हवी.”
"मला हवं ते केल्याशिवाय मी राहत नाही, हा अनुभव गीताला फारसा नवीन नाही. अर्थात, तशी कधी तिनं कुरकुर केली नाही. फार गरीब आहे पोरगी! स्वयंपाक तर असा मारू करते की पूछो मत! तिच्या हातच्या भाज्या खाव्यात आणि त्यांची चव जिभेच्या टोकावर ठेवून ऑफिसात यावं.
"आमची आई स्वयंपाक बेफाटच करते. लग्नापूर्वी मी तिला नेहमी म्हणायचो, “जिभेचे चोचले पुरवून पुरवून तू सोकावून ठेवलंस आम्हाला. लग्नानंतर एखादी बया पडेल गळ्यात. जिरेल आमची. ती समोर ठेवील ते ‘पूर्णब्रह्म’ म्हणून रोज ‘यज्ञकर्म’ उरकावं लागेलं. कुणी सांगावं, एखाद्या दिवशी ‘वदनी कवळ’ घेताना कवळीच यायची हातात!”
"पण नाही. जेवणापूर्वी रोज न चुकता केलेला ‘रघुवीर समर्थांचा’ जयजयकार सार्थकी लागला होता आणि गीतासारखी ‘चविष्ट’ (स्वयंपाक करणारी) ‘अन्नपूर्णा’ घरात आली होती! गादीची सूत्रं उगीच नाही आमच्या मातुःश्रींनी गीताच्या हातात दिली!
"गीताचं हे पाककौशल्य आमच्या मित्रवर्गानंपण एकमुखानं मानलं होतं. त्यातल्या अनेकंनी लग्नानंतर त्यांच्या बायकांना गीताच्या हाताखाली काही दिवस स्वयंपाक शिकण्यासाठी पाठवण्याचा संकल्प सोडला होता!-- अर्थात, अद्यापि एकाची बायको शिकायला आलेली नव्हती हा भाग अलाहिदा! लग्नानंतर नवी नवलाई, हनीमून वगैरे वगैरे धबडग्यात बायकोनं केलेला बिनसाखरेचा चहाही गोड लागतो आणि काही दिवसांनी ती बनवत असलेल्या स्वयंपाकाची सवय जडून जाते. असो!" ................................................................................................
"भित्यापाठी
"काही काही घरांत काही काही वैशिष्ट्यं असतात. काही काही घरातली तमाम मंडळी तापट. आमचा मन्या अशा लोकांना ‘Not to be loose shunted’चे डबे म्हणतो. केव्हा तडकतील नेम नाही.
"काही काही घरांत सगळीच हुशार. प्रत्येक जण निर्माण झालेली पदवी केवळ आपल्याचसाठी या जाणिवेनं शिकलेला. अगदी सात वर्षांचं पोरटंदेखील सबंध रामरक्षा घडाघडा म्हणून दाखवून कुठं तरी बक्षीस उपटणार! बाकी अशी वैशिष्ट्यांची यादी देण्यात वेळ घालवण्यात काही अर्थ नाही. स्वतःच्या घरातलं वैशिष्ट्य सांगून मुद्द्यावर यावं, हे बरं!
"आमच्या घराचं वैशिष्ट्य म्हणजे ‘चर्चा’. प्रत्येक गोष्टीवर! चर्चेची सूत्रचालक ‘आई’ ................................................................................................
Key
किल्ली
"आज पुष्कळ दिवसांनी फिरायला बाहेर पडलो होतो. अगदी सहकुटुंब सहपरिवार!– ‘सहपरिवार’– हा शब्द स्वतःच मोठा आहे. त्यामुळं तुमचा गैरसमज होणं अगदी शक्य आहे; पण तसं नाही. आम्हाला फक्त एकच (अजून तरी!) मुलगा आहे. नाव विजय! नाव ठेवण्यात तशी आमची जरा गफलतच झाली आहे. त्याचं नाव ‘झुंजार’– ‘छोटू’ किंवा ‘धनंजय’– अशा चालीचं हवं होतं. (मात्र अगदीच ‘काळा पहाड’ नाही, बरं का!) तुम्ही यावर कारण विचारणार. साहजिकच आहे. ते ओघानंच आलं. पण मला वाटतं– मी ‘झुंजार’ नाव ठेवावंसं वाटतं म्हणालो– यात सगळं नाही का आलं? घरातली यच्चयावत काचेची भांडी म्हणजे त्याच्या दृष्टीनं ‘यवन’. त्यामुळं काठ न तुटलेली एकही बशी घरात नाही आणि एकाही कपाला कान नाही. आम्हा उभयतांचा, लग्न झाल्याबरोबरच्या काळात- जेवढी असेल नसेल तेवढी अक्कल गहाण ठेवलेली असते (त्या काळाचं प्रतीक म्हणून–) काढवलेला (हसऱ्या चेहऱ्याचा, फोटोग्राफरच्या सूचनेसह) एक फोटो आहे. त्यालाही आता काच नाही. –एकंदरीत मामला लक्षात आला असेल. मघाशी मी गफलतीनं एकच मुलगा असं म्हणालो– पण दहा मुलांचा ऐवज भरून काढणारा हा झुंजार- चुकलो, विजय- त्याची माता व मी, असे कधी नव्हे ते फिरायला निघालो. बाहेर जाण्याचे कपडे घालण्याच्या सुमारास अनेक गोष्टींचा शोध लागला : विजयच्या सदऱ्याचं एकही बटण जाग्यावर नव्हतं. माझ्या दाढीच्या ब्लेडनं त्यानं ती कापून टाकलेली चक्क दिसत होती. त्यानं प्रामाणिकपणं खुलासाही केला. तो त्या वेळी शिवाजी झाला होता आणि त्यानं कोंढाणा जिंकल्यावर केलेली ती कत्तल होती. मला दोन गोष्टींचा तेव्हा खेद वाटला. एक तर सदऱ्याची बटणं नाहीशी झाली होती व दुसरं म्हणजे कोंढाणा सर करायला त्यानं तानाजीऐवजी शिवाजी महाराजांनाच पाठवलं होतं. एवढ्यावर तो थांबला तर ठीक, पण पुढं तो धडधडीतपणं म्हणाला, शिवाजीनंच किल्ला घेतला. तानाजी म्हणाला, “मी कामावर जाणार नाही. परवा नमूताईचं लग्न होतं, तेव्हा तुम्ही नाही का ऑफिसला दांडी मारलीत?–”
"आहे काही अपील?
"त्यानंतर दोन बुटांतल्या नाड्यांतली एक नाडी, कमरेचा पट्टा या सर्वांचा शोध! या सर्व संशोधनात दीड तास खर्ची घातला, तेव्हा सहकुटुंब सहपरिवार आम्ही बाहेर पडलो." ................................................................................................
Oh, so familiar! ................................................................................................ ................................................................................................
व. पु. काळे यांच्या कथा या नेहमीच भवतालच्या समाजाचं, समाजात वावरणाऱ्या लोकांच्या भावनांचं आणि परस्परांतील नातेसंबंधांचं चित्र वाचकांसमोर जिवंत करणाऱ्या असतात. या कथा कधी हलक्याफुलक्या स्वरूपाच्या तर कधी छोट्या छोट्या प्रसंगांतून समाजातील एखाद्या महत्वाच्या विषयावर भाष्य करणाऱ्या असतात. नुकताच वाचून झालेल्या ‘नवरा म्हणावा आपला’ या कथासंग्रहातील कथादेखील अशाच हलक्याफुलक्या प्रसंगांमधून नवरा-बायकोमधील नात्याचे निरनिराळे पैलू उलगडणाऱ्या आहेत, परंतू या एकाच नात्यापुरती त्या मर्यादित नाहीत.
या १३ कथा साधारण ८०-९० च्या दशकांत मुंबईत राहणाऱ्या मध्यमवर्गीय कुटुंबांतील नवरा बायकोच्या आयुष्यांभोवती गुंफलेल्या आहेत. त्यांतील ‘घरोघरी’, ‘नवरा म्हणावा आपला’, ‘श्रावणी सोमवार’ आणि ‘घास’ या कथांमध्ये काही वर्षांच्या सहजीवनानंतर कुटुंबाच्या, मुलाबाळांच्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना गैरसमजातून होणारी लुटुपुटूची भांडणं आणि दिवसाअखेरीस समोरचा आपल्यासाठी घेत असलेल्या कष्टांची आणि ते करत असताना त्यांच्या पुढ्यातल्या आव्हानांची जाणीव झाल्यानंतर होणारी समेट यांचं चित्रण आहे. ‘भित्यापाठी’, ‘किल्ली’, ‘धुंडण्यात मजा आहे’ आणि ‘वह कौन थी’ का कथांमधील प्रसंगांत घडणाऱ्या गमतीजमती, कधी होणारी फजिती आणि त्यामुळे आपसूकपणे एखाद्या चिवट पाहुण्याला परतवून लावण्यासारखा घडणारा प्रसंग आणि त्यातून कथेतील पात्रांना होणारा आनंद वाचकाच्या चेहऱ्यावरही आपसूकपणे हास्याची लकेर उमटवून जातो. ‘दोनच’ ‘तूर्तदान - महापुण्य’, ‘प्रमाद’ या कथांमधून नोकरदार कुटुंबातील दाम्पत्यांची मुंबईसारख्या महानगरात राहत असतानाची दररोजची धावपळ, वाढत्या महागाईला तोंड देताना महिनाअखेरीपर्यंत पगार पुरवण्यासाठी करावी लागणारी तडजोड, लहानशा घरात एकत्र कुटुंबपद्धतीत राहताना पेलावी लागणारी लहानमोठी आव्हानं पण त्यातूनही त्यांची सहजीवनाबद्दलची ओढ सांगणाऱ्या या कथा वाचकाला सुखावून जातात. “देण्यातला आनंद मिळवण्याची सवय, लुटवण्याचा कैफ - या गोष्टी आपण ‘येताना’च आपल्याबरोबर आणलेल्या आहेत. त्या वृत्तीला सुरुंग लावण्याची वेळ आली म्हणून ही अस्वस्थता निर्माण झाली.” ‘दोनच’ या कथेच्या शेवटाकडे जाताना येणाऱ्या या ओळी कथेच्या निवेदकाला स्वतःच्या उपजत स्वभावाची नव्याने ओळख करून देतात. या कथांमध्ये येणारे असे बरेच प्रसंग त्या पिढीच्या भावभावनांचं, तत्कालीन सामाजिक परिस्थितीचं चित्रण करणारे आहेत.
या कथासंग्रहातील ‘आठ त्रिक चोवीस’ आणि ‘मी दिवाळी अंक घेतो’ या दोन कथा मला विशेष आवडल्या. ‘आठ त्रिक चोवीस’ या कथेच्या निवेदकाला ट्रेनच्या प्रवासात भेटलेल्या अनेक वर्ष नोकरीसाठी पुणे-मुंबई प्रवास करणाऱ्या गृहस्थाची गोष्ट खूप रंजक आहे. ते गृहस्थ नोकरीसाठी घराबाहेर असताना घराची, कुटुंबाची पूर्ण जबाबदारी बायकोने उचलल्यामुळे आपण निर्धास्तपणे नोकरी करू शकतो याची जाणीव त्यांना आहे. तिच्याकडून त्यांनी घेतलेला शांत राहण्याचा गुण, तिच्या वाट पाहणाऱ्या डोळ्यांना दिलेली निरांजनाची उपमा यांतून अधिकच्या संसारिक जबाबदाऱ्या आनंदाने स्वीकारणाऱ्या आणि तितक्याच समर्थपणे पेलणाऱ्या पत्नीप्रती त्या गृहस्थाना वाटणारा आदर अधोरेखित होतो. परिस्थितीमुळे बरेचदा स्वतःच्या जोडीदाराच्या जबाबदाऱ्या, आव्हानं कमी करण्यासाठी इच्छा असूनही तसं करता येत नाही परंतू त्यांची जाणीव असणं आणि त्यांच्या मेहनतीची कदर असणं, यामुळे अनेक आव्हांनांना सामोरं जाऊनही संसार सुखाचा होतो हे वाचकाला पटू लागतं. ‘म�� दिवाळी अंक घेतो’ ही हलकीफुलकी कथा ८०-९०च्या दशकांतल्या चाळीतल्या किंवा कॉलनीतल्या घराचे दरवाजे शेजाऱ्यापाजाऱ्यांसाठी सदैव उघड्या असणाऱ्या काळात वाचकाला घेऊन जाते. दिवाळी अंकांसारख्या गोष्टीवरही स्वतःपेक्षा शेजाऱ्यांनी दाखवलेला हक्क आणि त्यांच्यापुढे हतबल झालेल्या दाम्पत्याची ही हलकीफुलकी गोष्ट वाचताना मज्जा येते. आज एकविसाव्या शतकात लग्न, कुटुंबव्यवस्था आणि एकूणच नातेसंबंधांचं बदललेलं स्वरूप लक्षात घेता या कथा आजच्या पिढीच्या वाचकाला या सर्व परिस्थितीकडे पाहण्याचा एक निराळा आणि सकारात्मक दृष्टिकोन देतात.
या कथासंग्रहाच्या सुरुवातीची पुरुषोत्तम काळे म्हणजेच वपुंच्या वडिलांची प्रस्तावनाही तितकीच वाचनीय आहे. वपुंचं संपूर्ण आयुष्याचा, त्यांच्यातील गुणांचा, त्यांच्या लेखनप्रवासाचा आलेखच त्यांच्या वडिलांनी या प्रस्तावनेतून त्यांनी वाचकांसमोर उलगडला आहे. जगाकडे, नात्यांकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन देणारा हा कथासंग्रह आवर्जून वाचा.
................................................................................................ ................................................................................................ नवरा म्हणावा आपला : वपु काळे / कथासंग्रह NAVRA MHANAVA AAPLA by V. P. KALE ................................................................................................ ................................................................................................
To begin with, bought out of a need to travel to world of one's own language, there was an unexpected thrill of coming across name of someone known decades ago, however distantly.
श्री. गजाननराव वाटवे, सुधीर फडके, हृदयनाथ मंगेशकर, श्रीनिवास खळे, यशवंत देव यांच्या कारकिर्दीनंतर अभिजात संगीत म्हणजे काय, त्या युगाचा प्रारंभ श्रीधर फडके यांनी केला. ही आवृत्ती श्रीधरला –वपु
And then the introduction, by someone who knew the author long and well, made one realise one might have read, in one's younger years, this author's work in magazines one read in quantities, hardly ever noticing names.
And the introduction is quite right, this author tickles, while writing of a familiar world - that of middle class family. ................................................................................................
अनुक्रम
घरोघरी नवरा म्हणावा आपला धुंडण्यात मजा आहे श्रावणी सोमवार आठ त्रिक चोवीस भित्यापाठी किल्ली दोनच! तूर्तदान-महापुण्य वह कौन थी? घास प्रमाद मी दिवाळी-अंक घेतो! ................................................................................................
घरोघरी
"... जीव टाकून प्रत्येक गोष्ट करणाऱ्या माणसाचं असंच असतं. जीव टाकण्याची त्याची वृत्तीच ती. मग करायची असलेली गोष्ट कितपत योग्यतेची आहे त्याचा विचार त्यांना शिवत नाही. हातात घेतील ते काम सुबक, नीटनेटकं आणि म्हणूनच सतेज. त्यामुळं या अशा माणसांना येणारा कंटाळादेखील सामान्य नसतो. त्यांची आसक्ती जेवढी तीव्र तेवढीच तीव्र विरक्तीही. अरुणा त्याच जातीतली!" ................................................................................................
Shraavanie Somwaar
श्रावणी सोमवार
"“मुंबईत सगळ्या भाज्या बारमास मिळतात. मी तर कालच मिरच्या पाहिल्या.”
"“असतील, पण त्या खऱ्या; भोपळी नाहीत. त्या फार तिखट असतात. त्यांची भाजी व्हायची नाही.”
"“होईल होईल; त्या तिखट असोत वा खट असोत, आज मिरच्यांची भाजी हवी म्हणजे हवी.”
"मला हवं ते केल्याशिवाय मी राहत नाही, हा अनुभव गीताला फारसा नवीन नाही. अर्थात, तशी कधी तिनं कुरकुर केली नाही. फार गरीब आहे पोरगी! स्वयंपाक तर असा मारू करते की पूछो मत! तिच्या हातच्या भाज्या खाव्यात आणि त्यांची चव जिभेच्या टोकावर ठेवून ऑफिसात यावं.
"आमची आई स्वयंपाक बेफाटच करते. लग्नापूर्वी मी तिला नेहमी म्हणायचो, “जिभेचे चोचले पुरवून पुरवून तू सोकावून ठेवलंस आम्हाला. लग्नानंतर एखादी बया पडेल गळ्यात. जिरेल आमची. ती समोर ठेवील ते ‘पूर्णब्रह्म’ म्हणून रोज ‘यज्ञकर्म’ उरकावं लागेलं. कुणी सांगावं, एखाद्या दिवशी ‘वदनी कवळ’ घेताना कवळीच यायची हातात!”
"पण नाही. जेवणापूर्वी रोज न चुकता केलेला ‘रघुवीर समर्थांचा’ जयजयकार सार्थकी लागला होता आणि गीतासारखी ‘चविष्ट’ (स्वयंपाक करणारी) ‘अन्नपूर्णा’ घरात आली होती! गादीची सूत्रं उगीच नाही आमच्या मातुःश्रींनी गीताच्या हातात दिली!
"गीताचं हे पाककौशल्य आमच्या मित्रवर्गानंपण एकमुखानं मानलं होतं. त्यातल्या अनेकंनी लग्नानंतर त्यांच्या बायकांना गीताच्या हाताखाली काही दिवस स्वयंपाक शिकण्यासाठी पाठवण्याचा संकल्प सोडला होता!-- अर्थात, अद्यापि एकाची बायको शिकायला आलेली नव्हती हा भाग अलाहिदा! लग्नानंतर नवी नवलाई, हनीमून वगैरे वगैरे धबडग्यात बायकोनं केलेला बिनसाखरेचा चहाही गोड लागतो आणि काही दिवसांनी ती बनवत असलेल्या स्वयंपाकाची सवय जडून जाते. असो!" ................................................................................................
"भित्यापाठी
"काही काही घरांत काही काही वैशिष्ट्यं असतात. काही काही घरातली तमाम मंडळी तापट. आमचा मन्या अशा लोकांना ‘Not to be loose shunted’चे डबे म्हणतो. केव्हा तडकतील नेम नाही.
"काही काही घरांत सगळीच हुशार. प्रत्येक जण निर्माण झालेली पदवी केवळ आपल्याचसाठी या जाणिवेनं शिकलेला. अगदी सात वर्षांचं पोरटंदेखील सबंध रामरक्षा घडाघडा म्हणून दाखवून कुठं तरी बक्षीस उपटणार! बाकी अशी वैशिष्ट्यांची यादी देण्यात वेळ घालवण्यात काही अर्थ नाही. स्वतःच्या घरातलं वैशिष्ट्य सांगून मुद्द्यावर यावं, हे बरं!
"आमच्या घराचं वैशिष्ट्य म्हणजे ‘चर्चा’. प्रत्येक गोष्टीवर! चर्चेची सूत्रचालक ‘आई’ ................................................................................................
Key
किल्ली
"आज पुष्कळ दिवसांनी फिरायला बाहेर पडलो होतो. अगदी सहकुटुंब सहपरिवार!– ‘सहपरिवार’– हा शब्द स्वतःच मोठा आहे. त्यामुळं तुमचा गैरसमज होणं अगदी शक्य आहे; पण तसं नाही. आम्हाला फक्त एकच (अजून तरी!) मुलगा आहे. नाव विजय! नाव ठेवण्यात तशी आमची जरा गफलतच झाली आहे. त्याचं नाव ‘झुंजार’– ‘छोटू’ किंवा ‘धनंजय’– अशा चालीचं हवं होतं. (मात्र अगदीच ‘काळा पहाड’ नाही, बरं का!) तुम्ही यावर कारण विचारणार. साहजिकच आहे. ते ओघानंच आलं. पण मला वाटतं– मी ‘झुंजार’ नाव ठेवावंसं वाटतं म्हणालो– यात सगळं नाही का आलं? घरातली यच्चयावत काचेची भांडी म्हणजे त्याच्या दृष्टीनं ‘यवन’. त्यामुळं काठ न तुटलेली एकही बशी घरात नाही आणि एकाही कपाला कान नाही. आम्हा उभयतांचा, लग्न झाल्याबरोबरच्या काळात- जेवढी असेल नसेल तेवढी अक्कल गहाण ठेवलेली असते (त्या काळाचं प्रतीक म्हणून–) काढवलेला (हसऱ्या चेहऱ्याचा, फोटोग्राफरच्या सूचनेसह) एक फोटो आहे. त्यालाही आता काच नाही. –एकंदरीत मामला लक्षात आला असेल. मघाशी मी गफलतीनं एकच मुलगा असं म्हणालो– पण दहा मुलांचा ऐवज भरून काढणारा हा झुंजार- चुकलो, विजय- त्याची माता व मी, असे कधी नव्हे ते फिरायला निघालो. बाहेर जाण्याचे कपडे घालण्याच्या सुमारास अनेक गोष्टींचा शोध लागला : विजयच्या सदऱ्याचं एकही बटण जाग्यावर नव्हतं. माझ्या दाढीच्या ब्लेडनं त्यानं ती कापून टाकलेली चक्क दिसत होती. त्यानं प्रामाणिकपणं खुलासाही केला. तो त्या वेळी शिवाजी झाला होता आणि त्यानं कोंढाणा जिंकल्यावर केलेली ती कत्तल होती. मला दोन गोष्टींचा तेव्हा खेद वाटला. एक तर सदऱ्याची बटणं नाहीशी झाली होती व दुसरं म्हणजे कोंढाणा सर करायला त्यानं तानाजीऐवजी शिवाजी महाराजांनाच पाठवलं होतं. एवढ्यावर तो थांबला तर ठीक, पण पुढं तो धडधडीतपणं म्हणाला, शिवाजीनंच किल्ला घेतला. तानाजी म्हणाला, “मी कामावर जाणार नाही. परवा नमूताईचं लग्न होतं, तेव्हा तुम्ही नाही का ऑफिसला दांडी मारलीत?–”
"आहे काही अपील?
"त्यानंतर दोन बुट���ंतल्या नाड्यांतली एक नाडी, कमरेचा पट्टा या सर्वांचा शोध! या सर्व संशोधनात दीड तास खर्ची घातला, तेव्हा सहकुटुंब सहपरिवार आम्ही बाहेर पडलो." ................................................................................................
Oh, so familiar! ................................................................................................ ................................................................................................
Nothing fancy. Day to day life of a middle class marathi family and the hurdles in it. Small talks as well as small fights between husband and wife. I loved the humour of the author, literally laughed loud, which is rare for me while reading a book. I would like to hold on to the simplicity in life, which is base of the book, and which i too, as a child, experienced around me . I guess it's hardly there anymore.
Anyways, if you're looking for no nonsense comedy drama, or a light read, this is a worth try. I am definitely going to read more V. PU books!!
कचेरीतले कारकून आणि त्यांचे विश्व - पेठे, कारखानीस, वगैरे लोकांचे विनोद त्यात मुली वर लाईन मारताना ती देशस्थ, कोब्रा की सी.के.पी. अशा चर्चा. प्रत्येक कथेत लोकल आलीच मुंबईची! यावरून पुस्तक वाचणाऱ्या व्यक्तीस अंदाज बांधता येईल पुस्तकाबद्दल.
Glimpses of usual life of common man...His stories & books are always entertaining..you dont have to think a lot about it...you grasp them easily & quickly without any hurdles...