Vyankatesh Digambar Madgulkar (Marathi: व्यंकटेश दिगंबर माडगूळकर) (1927–2001) was one of the most popular Marathi writers of his time. He became well-known mainly for his realistic writings about village life in a part of southern Maharashtra called Maandesh, set in a period of 15 to 20 years before and after India's Independence.
Madgulkar wrote 8 novellas, over 200 short stories, about 40 screenplays, and some folk plays (लोकनाट्य), travelogues, and essays on nature. He translated some English books into Marathi, especially books on wild life, as he was an avid hunter.
● पुस्तक – वारी ● लेखक – व्यंकटेश माडगूळकर ● साहित्यप्रकार – ललित| कथासंग्रह ● पृष्ठसंख्या – ११० ● प्रकाशक – मेहता पब्लिशिंग हाऊस ● आवृत्ती – ०५ वी । प्रथम आवृत्ती -१९६२ ● समीक्षक – विक्रम चौधरी ● मूल्यांकन – ⭐⭐⭐⭐
काही लेखकांच्या लेखणीला मातीचा गंध असतो, त्यांच्या लिखाणात गावाकडची पहाट असते, पाटावरच खळखळणारं पानी असतं, रानवाटा असतात, वाऱ्यावर डुलनारे जोंधळे असतात, गायी म्हशी अन पहाटे आरवणारे कोंबडे देखील..
व्यंकटेश माडगूळकरांनी आपल्या अनेक कथासंग्रहात गावातील सामूहिक जीवनाचं विविधांगी चित्रण केलेलं दिसून येतं..
“अशा या गावात असतात काही साधीभोळी, काही बेरकी, काही ओबोडधोबोड माणसं.. अशा या माणसांच्या गावाच्या वेशीभोवती फिरणाऱ्या विश्वाचं चित्रण म्हणजे वारी..”
माणूस हा कितीही आधुनिक किंवा देश-विदेशात फिरलेला का असेना, तरी गाव कुठेतरी आपल्या शरीरात, मनात दडून बसलेले असतं.. अश्या ह्या दडून बसलेल्या गावाला, गावाच्या सुगंधाला, जिव्हाळ्याला माडगूळकरांच्या कथा हात घालतात आणि त्यांचं बोट धरून ते आपल्याला घेऊन जातात गावाकडच्या साध्या सोप्या जीवनात..
वारी मधली प्रत्येक कथा ही एक एका पात्राच्या आयुष्यातील एखादी सामान्य वाटणारी घटना आहे. घटना सामान्य असली तरी लेखकाने त्या वेळची त्या त्या पात्राची मनाची अवस्था, त्याची नैतिक आणि अनैतिकतेच्या कुंपणात बांधलेली विचारसरणी, त्याच्या सभोवताली सुरू असलेल्या सूक्ष्म नैसर्गिक हालचाली ई. चे वर्णन त्याच पात्राच्या बोलीभाषेत रेखाटले आहे.. माडगूळकरांच्या या लेखनशैलीमुळेच त्यांना या छोट्या छोट्या घटनांत रंग भरणे शक्य झाले आहे..
गावाच्या परिसरात असणाऱ्या पाटील, सुतार, लोहार, न्हावी, महार, मांग, चांभार, रामोशी हे ग्रामजीवनाचे अपरिहार्य घटक असतात. त्यांच्या श्रद्धा, रूढी, रिवाज, आस्था यांचे आर्थिक, भावनिक, सांस्कृतिक संबंधांसह आकलन हा माडगूळकरांच्या कथेतला उजवा भाग ठरतो.
म्हणूनच अर्जुना महार, बाबू म्हातारा, उमा रामोशी, राणू पाटील अशी ही सगळी पात्र पुस्तक वाचताना जिवंत होतात आणि त्यांच्या संवेदना आपल्याला सोपवतात. म्हणूनच पुस्तक वाचून झालं तरी ही पात्रे आपल्या मनात घोंघावत राहतात..
आजच्या धावपळीच्या जीवनात हरवत चाललेल्या साधेपणाची मनात परत उजळणी करण्यासाठी नक्की वाचा..
ओघवत्या भाषेतील व्यक्तिचित्रे! ग्रामीण बाज असलेल्या कथा, सत्याच्या अगदी जवळ जाणारे कथन, आणि 'व्यक्ती तितक्या प्रकृती' हे सार्थ ठरवणारी अनेक पात्रे हे या कथासंग्रहाचे वैशिष्ट्य. अतिशय उत्तम लेखन.
छोट्या पण चांगल्या गोष्टी आहेत. शेवटच्या 1-2 गोष्टी मात्र फारच लवकर संपवल्या आहेत.
मला सगळ्यात जास्त आवडलेलं वाक्य...
“माजा एक पुतण्या रेलवेवर वाचमेन हुता. त्यो गाडीखाली घावला आन् त्येचा उजवा पाय गुडघ्यातून पार गेला. सरकारनं भरपाई म्हणून पैका दिला... पन पाय न्हाई दिला!