हर्षद बर्वे याचे हे पुस्तक काल मिळाले आणि १ तासात वाचून झाले. १०० पानी पुस्तकात लेखकाने स्वतःचे अनुभव अतिशय सोप्या शब्दात आणि ओघवत्या शैलीत लिहिलं असल्यामुळे एका बैठकीत वाचून झालं.. हर्षद दादा आणि मी आता या माध्यमातून मित्र झालो आहोत. त्याचा struggle हा इतरांच्या तुलनेत जरा जास्तच झाला आहे पण प्रत्येकाला घडवताना नियती काहीतरी संचित जमा करत असते. तो ज्या परिस्थितीतुन गेला त्यामुळे तो जसा होता त्यापेक्षाही लाख पटीने आज चांगला आहे. हर्षद दादाची ही नवी ओळख आणि हे स्वानुभवाचे वाचन होऊ शकलं.
ऋचा वहिनी ची जी साथ आहे त्यासाठी तिला खरंच सलाम आहे. आज जिथे काही शूल्लक कारणाने divorce साठी अर्ज करणारे बरेच आहेत त्यांना नक्कीच ती चांगले मार्गदर्शन करू शकते. मला वाटतं तिने माझ्या पिढीच्या लोकांना या बाबतीत councelling करावं. ती एक inspiration आणि रोल मॉडेल आहे. ज्या परिस्थितीत तीने तुला जी साथ दिली ती आज कुठेही बघायला मिळत नाही. आजच्या तारखेला तडजोड करायला कुणीही तयार नसतात. सरळ divorce घेऊन मोकळे होतात. तुझी कहाणी प्रत्येकाला कुठे ना कुठेतरी co-relate होतेच. पण तू ज्या पद्धतीने सगळ्या परिस्थितीशी लढला त्यासाठी तुला हॅट्स ऑफ 🙌.
या माध्यमाची हीच खरी ताकद आहे असं कायम वाटतं आणि तुझ्याशी कनेक्ट होऊ शकलो याचा मनापासून आनंद आहे. तुझी वाटचाल नित्यनूतन व वर्धिष्णू होत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. 👍🏻🙏🏻👏🏻🙆🏻♂😍