‘फुकट’हा द.मा. मिरासदारांच्या रूपांतरित आणि स्वतंत्र कथांचा संग्रह. अर्थातच त्यांच्या स्वतंत्र विनोदी कथा वाचकाचं लक्ष वेधून घेतात. ‘शिवाजी महाराजांची पत्रकारांशी बातचीत’या कथेतून मिरासदार आजच्या राजकीय विसंगतींवर बोट ठेवतात. तर ‘टगेवाडी फेस्टिव्हल’मधून फेस्टिव्हलच्या फॅडवर त्यांनी भाष्य केलं आहे. आजची ढिसाळ कायदा-सुव्यवस्था आणि मंत्र्यांची ‘योग्यता’याचं मार्मिक चित्रण ‘मंत्र्यांवर ओढवलेला प्रसंग’या कथेतून केलं आहे. तर ‘एका शोकसभेचा वृत्तांत’या कथेतून त्यांनी माणसांचे विविध नमुने टिपले आहेत. या चारही विनोदी कथा श्रोत्यांना मनमुराद हसवतात आणि अंतर्मुखही करतात. राजकारण, समाजकारण, शिक्षण खातं, पोलिस खातं या क्षेत्रांतील व्यक्तींचं अत्यंत खुमासदार पद्धतीने केलेलं प्रातिनिधिक चित्रण त्या त्या खात्यातील विसंगतीवर बोट ठेवतंच; पण वाचकांना खळखळून हसायला लावतं. तेव्हा वाचकांना खळखळून हसवणारा हा कथासंग्रह सगळ्यांनी अवश्य वाचला पाहिजे, असा आहे.
Dattaram Maruti Mirasdar (Devanagari: दत्ताराम मारुती मिरासदार) (born 1927) is a Marathi writer and narrator principally of humorous stories. He hails from Pandharpur(Maharashtra).
Many of Mirasdar's humorous stories revolve around village life in Maharashtra. However, some of his stories concern the serious social issues and lives of the poor living in villages. His stories Gavat, Ranmanus, Kone Eke Kali, Bhavaki, Hubehub, and Sparsha belong to the latter class.
For some years, Shankar Patil, Vyankatesh Madgulkar, and Mirasdar jointly presented, in different towns in Maharashtra, highly popular public recitations of their short stories.
Mirasdar was a professor of Marathi in a college in Pune. He is currently the Acting President of Maharashtra Sahitya Parishad, Pune.
As mentioned by author, this collection of stories is a mix - some translated by Mirasdar and some written by him.
While it might or might not be easy enough to guess which are by him, some are obviously not by Mirasdar. Whether or not one guessed correctly, one would have liked references regarding the latter, and details such as original title, name of author, etc.. ................................................................................................
The first story sounds like it could be original by Mirasdar. But then it could be by someone else, including possibly by an author who is of ancestry from elsewhere, other than of India. ................................................................................................
Next one, however, is clearly of origin elsewhere, and definitely not by Mirasdar.
It's a little unclear if it's from WWI era, since neither author mentions the detail, but the story does mention 1905 revolution in past and Austria as enemy of Russia, so WWI is the best guess. ...............................................................................................
Looking at the next title शिवाजी महाराजांची पत्रकारांबरोबर बातचीत, one is reminded of a Marathi film.
The recent decades film with a similar theme, with a conversation between a modern man beleaguered with problems of honest, simple people of Maharashtra, but imagined in Mumbai instead of on the fort Raigad, the last capital of Emperor Shivaji, was perhaps inspired by this piece, albeit very different in tone. ................................................................................................
Next, जुळ्या भावांची गोष्ट, is short and fun. It wouldn't be surprising if the Hrishikesh Mukherjee film Golmaal were inspired by this short story.
It's unclear if Mirasdar is the author. ***
माकडांच्या राज्यात
"आणि सांगण्यासारखी गोष्ट अशी की, पुन्हा म्हणून माकडांचा त्रास आम्हाला बागेत कधीच झाला नाही. पूर्वीप्रमाणे दिवसातून दोनदा ती बागेजवळून जात. शिट्ट्या मारीत, चित्कार करीत जात; परंतु त्यांनी बागेत कधी चुकूनही पाऊल ठेवले नाही. कधीकधी बागेच्या कुंपणावर त्यांची ओळच्या ओळ बसलेली मला दिसत असे; पण कोणीही बागेत मात्र आले नाही. एकदा चुकून एक पिल्लू बागेत शिरले होते; पण ते आत शिरल्याबरोबर त्याच्या आईने धमकावणीवजा मोठा चित्कार केला आणि आपल्या केसाळ लांब हाताने त्याला बाहेर ओढून काढले आणि लांब हाकलले." ***
जिवंत समाधी
"आघाडीवर अनेक ठिकाणी शत्रू चढाईचे धोरण पत्करीत असल्याची अनेक चिन्हे दिसत होती. विशेषत: दक्षिण-आघाडीवर ऑस्ट्रियनांविरुद्ध त्यांचा विशेष रोख दिसला. त्यांच्या कित्येक बिनतारी संदेश-केंद्रांनी आपापली कामे थांबवली होती. याचा अर्थच असा होता की, त्यांचे दुसर्या जागी स्थलांतर झालेले होते. त्यामुळे संदेशवाहक कबुतरे हीच पुन्हा आमची प्रमुख साहाय्याचे साधने ठरली. त्या दृष्टीने, शक्य तितक्या लवकर ही कबुतरे पाठीमागे पोहोचविणे आवश्यक होते. म्हणून मी असे ठरवले की, दुसर्या दिवशी संध्याकाळी बरोबर चार विश्वासू माणसे घेऊन फेलिक्सने या कामगिरीवर जावे; त्यानंतर एक-दोन दिवसांनी जेनियाने ‘मोगीलेफ’ या ठिकाणी जावे. तिथे रशियन अधिकार्यांत मिसळून त्यांच्या चढाईच्या धोरणाविषयी काही माहिती मिळते का हे तिने पाहावे, एवढे ठरल्यानंतर दुसर्या दिवशी संध्याकाळी फेलिक्स आपल्या चार सहकार्यांना आणि कबुतरांना घेऊन आघाडीकडे गेला आणि दुसर्या दिवशी जेनियाही प्रवासाच्या तयारीला लागली." ***
नेम
" ... ‘‘आबा, देवाची शपथ. मी तुमालाच पाह्यलं. तुमच्या पायाला फडकं होतं, ते सुदिक मला दिसलं. आता आणखी खूण तुमाला काय सांगू?’’
"हे ऐकल्यावर आबाच्या पायातले बळच गेले. त्याचे हातपाय लटपटले. सबंध अंगातून मुंग्या आल्या. तो मटकन खाली बसला. कापर्या आवाजात म्हणाला, ‘‘देवा, आरे माझी इतकी लायकी न्हाई, लायकी न्हाई!’’
"आणि त्याच्या डोळ्यांतून पाण्याची धारच लागली." ***
शिवाजी महाराजांची पत्रकारांबरोबर बातचीत The recent decades film with a similar theme, with a conversation between a modern man beleaguered with problems of honest, simple people of Maharashtra, but imagined in Mumbai instead of on the fort Raigad, the last capital of Emperor Shivaji, was perhaps inspired by this piece, albeit very different in tone. ***
Here Mirasdar is scathing in his denunciation of modern era corruption as it existed (and grew until 2014) when he wrote thus piece, while the film came in an era when help and inspiration was needed for the said honedt, beleaguered people.
" ... एक पावसाळा सोडला, तर रायगडावर जाणार्या भक्तांची गर्दीही दिवसेंदिवस भलतीच फुगत चालली आहे. शिवनेरी गडावर शिवजयंती साजरी होते, तशी रायगडावर जयंतीप्रमाणेच शिवपुण्यतिथीही साजरी होते. हजारो लोकांची गर्दी होते. सिंहासनापासून महाराजांच्या समाधिस्थानापर्यंत शिवप्रतिमेची मिरवणूक निघते. मोठेमोठे मंत्री येतात ... "
" ... एकदा पुण्या-मुंबईतील पत्रकारांच्या सहज मनात आले की, आपणपण या रायगडाची सहल काढावी. ... "
"रायगडाच्या पायथ्याशी खूबलढा बुरुजापर्यंत सर्व काही ठीक होते; पण प्रत्यक्ष गड चढण्याचा प्रसंग आला, तेव्हा मात्र अनेकांचे धाबे दणाणले. गडाची चढणही इतकी मोठी असते आणि ती चढायला काही तास लागतात, हे कळताच अनेकांची छातीच दडपली. वरपर्यंत आपण सुखरूप पोहोचतो की नाही, अशीच शंका काहींना वाटू लागली ... " ***
"सिंहासनाचा चौथरा जसजसा जवळ आला, तसतशी ती व्यक्ती पत्रकार मंडळींना स्पष्ट दिसू लागली. त्या व्यक्तीच्या अंगावर राजघराण्यातल्या व्यक्तीच्या अंगावर असतात तसे मौल्यवान कपडे होते. पायात जरतारी चोळणा आणि खाली चढाव होते. गळ्यात अनेक मौल्यवान रत्ने असलेला हार रुळत होता. कमरेची तलवार म्यानात विसावा घेत होती आणि मुख्य म्हणजे मस्तकावर झगमगणारा टोप होता. त्या टोपाच्या कडेला मौल्यवान, सुढाळ ढाळाचे मोती गुंफलेल्या झिरमिळ्या होत्या. चांदण्यात त्या मोत्यांची शोभा अपूर्व दिसत होती. ... " ***
"एका बड्या इंग्रजी पत्राच्या प्रतिनिधीने खिशातून एक गलेलठ्ठ चिरुट बाहेर काढला आणि ऐटीत पहिलाच प्रश्न केला, ‘‘मिस्टर शिवाजी, आपल्या परवानगीनं मी सिगार ओढू शकतो काय?’’
"‘‘ही राजसभा आहे -’’ महाराज एकदम कडाडले. त्यांनी इतक्या तीव्र दृष्टीने त्या पत्रकाराकडे पाहिले, की त्याची गाळणच उडाली. त्याची पँट थरथरू लागली. हातात घेतलेला चिरूट त्याच्या हातातून गळूनच खाली पडला. ... " ***
"आपला जन्म नक्की केव्हा झाला. १६२७ साली का १६३० साली?’’ दुसर्या एका पत्रकाराने धीटपणे पुढे होऊन प्रश्न केला.
"महाराजांची मुद्रा उद्विग्न झाली. ते थोडा वेळ थांबले.
"‘‘नशीब, माझा जन्म झाला, ही गोष्ट तरी तुम्हाला मान्य आहे. नाही त्या लहानशा गोष्टीचे एवढे कुतूहल तुम्हाला कशाला पाहिजे? जन्मानंतर आयुष्यात मी पुढं काय केलं ते महत्त्वाचं आहे. त्याबद्दल बोललात, तर जरा बरं वाटेल मला.’’
"हे सद्गृहस्थ आपल्याला बरे वाटावे असे गोडगोड बोलत नाहीत, उलट सडेतोडपणे आपल्यालाच ताड्कन सुनावत आहेत, हे सर्वांच्या लक्षात आले. पुढार्यांचा हा अनुभव त्यांना नवीनच होता. पुढारी म्हणजे सर्वांना खूश करणारा, सर्वांशी गोडगोड भाषेत नम्रपणे बोलणारा इसम, अशीच सर्वांची कल्पना होती. त्यामुळे सर्व मंडळी तशी बिचकलीच. ... " ***
" ... ‘‘लोकशाहीचा अर्थ तुम्हाला समजतो का? लोकशाही म्हणजे लोकांच्या इच्छेनं चालणारं राज्य. लोकांना जे पाहिजे ते देणारं राज्य. लोकांना आपली संस्कृती, देवळं, धर्म सुरक्षित राहावा, असं वाटत होतं. त्यांना दुष्टांपासून संरक्षण पाहिजे होतं. लेकी-सुना यांना निर्भयता पाहिजे होती. त्यांना शेतं पिकावी आणि भरपूर धान्य घरी यावं, असं वाटत होतं. हे सगळं आम्ही त्यांना दिलं. मग ही लोकशाही नव्हे तर काय?’’" ***
"‘‘नाही, तुम्ही अफझलखानाला ठार मारलंत ना, त्या क्षणी तुम्हाला काय वाटलं? तुमच्यावर इथेच राज्याभिषेक झाला, त्या क्षणी तुम्हाला कसं वाटलं?’’
"महाराजांची मुद्रा एकदम रौद्ररूप झाली. ‘‘कसले गाढवासारखे प्रश्न विचारता आहात? कोण आहे रे तिकडे? या माणसाला टकमक टोकावर उभा करा आणि खाली ढकलण्यापूर्वी विचारा, आता तुम्हाला कसं वाटतंय?’’" ***
वचन
"तिनं फक्त कुलूप काढलं, कडी काढली आणि मागं फिरली. जड पावलांनी हळूहळू तिनं स्वयंपाकघर ओलांडलं. ज्या खोलीत मघाशी टॉमला ठेवलं होतं, त्या खोलीत ती गेली.
"आणि तिनं दार बंद करून घेतलं." ***
टगेवाडी फेस्टिव्हल
"अंगाभोवती गिरक्या घेत, हा���भाव करीत शेवंता कोल्हापूरकरणीने सवाल टाकला,
"‘‘अगं, समद्या घोटाळ्यात ब्रह्मघोटाळा लई गाजला सत्ययुगी! "अन् कलियुगात असा घोटाळा कोणता गाजला, सांग तू गं मजप्रती ॥’’
"यावर ठुमठुमकतच बकुळा नगरकरणीने चलाख उत्तर दिले.
"‘अगं सवाल कसला, फुसका समदा उगा दाविशी का फोर्स? "अन् कलियुगात गं लै गाजला घोटाळा हा बोफोर्स.’’" ***
जुळ्या भावांची गोष्ट
It wouldn't be surprising if the Hrishikesh Mukherjee film Golmaal were inspired by this short story.
It's unclear if Mirasdar is the author. ***
मंत्र्यांवरील भीषण प्रसंग
" ... बाबूरावांचे नशीबच बलवत्तर! सत्तेवर असलेल्या पक्षाला त्यांच्याइतका कमी शिकलेला, कुठल्याही विषयाची कसलीच माहिती नसलेला धष्टपुष्ट आमदार त्या भागात दुसरा कुणीच दिसेना. म्हणून नव्या मंत्रिमंडळाच्या बनावात त्यांचाही नंबर ताबडतोब लागला आणि राज्यमंत्री म्हणून त्यांची निवड जाहीर झाली. मुख्यमंत्र्यांना अशीच मंडळी मंत्रिमंडळात हवी होती. डोक्याला ताप देणारे लोक शक्यतो त्यांना नकोच होते. म्हणूनही त्यांची निवड झाली असावी; पण राज्यमंत्री म्हणून गृहखाते त्यांना मिळाले हे समजल्यावर तर बाकीच्यांनाच काय, पण खुद्द बाबूरावांनाही आश्चर्याचा धक्का बसला." ***
एका शोकसभेचा वृत्तान्त
"या पार्श्वभूमीवर नानासाहेबांनी अर्धातास भाषण केले. सवयीप्रमाणे त्यांच्या घशाला कोरड पडली. टेबलावर तांब्या-भांडे नाही, हे त्यांच्या लक्षात आले. इकडेतिकडे पाहत ते म्हणाले, ‘‘अं... प्यायचं पाणी नाही वाटतं इथे...?’’
"‘‘पाणी -’’ असे हळूच पुटपुटत हेडमास्तर लगबगीने उठण्याच्या बेतात होते. पण तेवढ्यात चीफसाहेबांनी त्यांना नजरेच्या इशार्याने दाबले. त्याबरोबर ते पुन्हा नीट बसले. मग कुणीच काही बोलले नाही. पाणी ही गोष्ट नानासाहेबांच्या वक्तृत्वाच्या दृष्टीने फार महत्त्वाची होती, हे बहुतेक सर्वांना माहीत होते. ग्लासभर पाणी प्याल्यानंतर ते आणखी बराच वेळ बोलू शकत. त्यामुळे चीफसाहेबांनी हेडमास्तरांना दाबले. इकडे-तिकडे पाहत आश्चर्याने ते म्हणाले, ‘‘पाणी विसरलंच का शेवटी? हे आमचे लोक म्हणजे अगदी नालायक आहेत. साध्यासाध्या गोष्टीसुद्धा यांच्या टाळक्यात शिरायच्या नाहीत. आपण पुढं सुरू करा. तोपर्यंत मी करतो व्यवस्था.’’
"मग बाहेर कुणाला तरी त्यांनी हाताने तांब्याभांड्याची खूण केली. नानासाहेबांनी बाहेर पाहिले, पण त्यांना कोणीच दिसले नाही. शेवटी निरुपायाने त्यांनी भाषणाला पुन्हा सुरुवात केली; पण आता त्यांची पट्टी बरीच खाली आली होती. ... "
"पंधरा मिनिटे बोलत राहूनही पाणी न आल्यामुळे निरुपायाने नानासाहेबांची मृत आत्म्याबद्दल प्रार्थना केली आणि भाषण संपवून ते खाली बसले. त्याबरोबर टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. अवघ्या पाऊण तासात भाषण संपवण्याचा हा प्रकार सगळ्यांना इतका अभूतपूर्व वाटला की, टाळ्यांचा कडकडाट होणे ही गोष्ट अगदी स्वाभाविक होती. या कडकडाटामुळे झोपी गेलेली भिंतीलगतची काही मंडळी दचकून जागी झाली. काही जण तर उठून एकदम चालूच लागले. त्यांना शेजार्यांनी हाताला धरून खाली बसवले." ................................................................................................ ................................................................................................